Home हेल्थ आंबेहळदचे हे उपयोग तुम्हाला माहीत नसतील

आंबेहळदचे हे उपयोग तुम्हाला माहीत नसतील

by Patiljee
20932 views
आंबेहळद

खरं तर आंबे हळदीला आपल्या नॉर्मल हळदी सारखी बाजारपेठ नाही आहे. त्यामुळे ही हळद बाजारपेठेतून हद्दपार होण्याची भीती आहे. आंबे हळद ही दिसायला साधारण आपल्या हळदी सारखीच असते. पण आपण हळद जशी रोजच्या जेवणात वापरतो तशी या हळदीचा वापर प्रामुख्याने त्वचेसंबधी केला जातो.

म्हणजे काय तर तुम्ही ही हळद त्वचेवर औषध म्हणून लावू शकता. शिवाय या हळदीचा अनेक त्वचा विकारावर उपयोग आहे चला तर पाहूया.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मुका मार लागला असेल आणि त्या ठिकाणी सूज आली, रक्त काळे पडले असल्यास अशा ठिकाणी आंबेहळद उगाळून लावावी फरक पडतो. काहीजण त्यात फटकी म्हणजे तुरटी मिसळून लावतात.

आंबेहळद

शरीराच्या कोणत्याही भागात लचकले असल्यास किंवा मुरगळणे किंवा सूज आली तर तर ही आंबे हळद उगाळून लावली जाते याने दुखणे कमी होते.

हीच हळद उगाळून त्यात थोडी साय मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा चेहरा उजळण्यासाठी मदत होते.

शरीरावर कोणत्याही प्रकारची गाठ आली असेल तर त्या जागी ही आंबेहळद उगाळून लावावी फरक पडतो.

चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील किंवा काळे डाग पडले असतील तर आंबे हळद घेऊन त्यात थोड गुलाब पाणी मिसळा हे मिश्रण चेर्यावार लावा.

हे पण हेल्थ आर्टिकल वाचा

Please follow and like us:

Related Articles

3 comments

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल