Home हेल्थ आवळा खाण्याचे फायदे

आवळा खाण्याचे फायदे

by Patiljee
14770 views
आवळा

आवळा हा एक फळ आहे हे सर्वानाच माहित आहे. आवळा हा रंगाने हिरवट पिवळसर असतो. आवळ्याचे तुम्ही वेगवेगळे पदार्थ खात असाल त्यात म्हणजे आवळ्याची सुपारी, लोणचे, सरबत, मोरावळा इत्यादी आहेत. या आवळ्यात अनेक महत्त्वाचे घटक आहेत. जे आपल्या शरीरातील उपयोगी आहेत.

त्यात पित्तशामक, केशवर्धक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि तसेच मधुमेह, कॅन्सरसाठीही या आजारांवर अत्यंत उपयोगी मानला जातो.  त्याचप्रमाणे अनेक आजार म्हणजे ज्वरनाशक, स्नायू वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, तसेच दात मजबूत ठेवणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा असा हा आवळा अत्यंत गुणकारी औषध आहे.

आवळा खाण्याचे फायदे

आवळे खाताना नेहमी चाऊन चाऊन खावे. यामुळे तुमचे दात पहिल्यापेक्षा जास्त मजबूत होतात.

आवळा

तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल तर अशावेळेस आवळे खाणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

आवळ्याचे चूर्ण मधातून या मिश्रणाचे चाटण करा यामुळे तुमचा घसा साफ होतो.

आवळ्याचा रस रोज घ्या. याच्या सेवनाने तुम्हाला हृदय रोग असेल तर फायदेशीर आहे. त्याचबरोबर कॉलेस्ट्रॉल ही कमी होते. त्यामुळे तुम्ही जर तुमचे हृदय मजबूत ठेवायचे असेल तर आवळा खा किंवा आवळ्याचा रस प्या.

आवळा

सर्दी झाली असेल तर आवळ्याचा रसात मध मिसळा आणि हे मिश्रण सर्दी बरी होईपर्यंत खा फरक पडेल.

तुम्हाला मळमळ, अपचन याचा त्रास कधी कधी तर काही जणांना नेहमीच होत असतो. अशा वेळी आवळा खा किंवा रस प्या. पोटात गॅस ही पकडत नाही.

तुम्हाला जर नेहमी चिरतरुण दिसायचे असेल तर नेहमी आवळा खा.

आरोग्याविषयी हे आर्टिकल सुद्धा वाचा

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल