Home कथा ऑनलाईन ओळख

ऑनलाईन ओळख

by Patiljee
842 views
ऑनलाईन ओळख

कोनसे कपडे पहनू मैं, ये टाईम निकला जा रहा है, फिर याद आया मुझको की उसको ब्लॅक कलर बडा प्यारा है, फिर ब्लॅक शर्ट औंर जीन्स पहनकर दिखता तो मैं भी सुंदर था औंर पाच मिनिट के अंदरही मैं ऊबर कैब के अंदर था.

आज सहा महिन्यांनी माझ्या आणि तिच्या भेटीचा दिवस ठरला होता. ह्या भेटीसाठी मी खूप वेळ पाहिली आणि अखेर आज तो दिवस आयुष्यात आला होता. कैबमध्ये सुद्धा छान रोमँटिक गाणं (ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करे) माझ्या फिलिंग सोबत मॅच करत होते. अचानक मन परत भूतकाळात रमलं.

हॅलो जयदीप मी साबेरा, आज माझे ऑडिशन आहे तुमच्या ऑफिस मधून कॉल आला होता. किती वाजता यायचं आहे ते सांगितले नाही म्हणून दिलेल्या तुमच्या ह्या नंबरवर कॉल केला. सांगाल का मला किती वाजता येऊ शकते. सॉरी तुम्ही चुकीचं नंबर डायल केला आहे एकदा नंबर चेक करा आणि परत कॉल करा. (मी बोललो). तिने सॉरी म्हणून फोन ठेऊन दिला.

पण हा फोन करून तिने माझ्या हृदयाची तार छेडली होती. किती नाजूक आणि कोमल आवाज होता तो असं वाटतं होतं सारखं ऐकत बसावं. मला तिला परत कॉल करण्याचा मोह आवरला नाही. म्हणून मी पुन्हा त्याच नंबर वर कॉल केला पण फोन बिझी आला म्हणून मी शांत बसलो. थोड्या वेळात पुन्हा मी फोन केला, बऱ्याच वेळ रिंग वाजली आणि अखेर तिने फोन उचलला.

ती : हॅलो कोण?

मी प्रखर आताच तुम्ही मला wrong नंबर म्हणून कॉल केला होतात.

ती : अच्छा सॉरी हा घाई गडबडीत झालं ते.

हो हो काहीच हरकत नाही, काय झालं ऑडिशनच तुमच्या?

ती : अरे वा तुमच्या लक्षात राहिलं वाटतं! काही खास नाही त्यांना मॉडर्न मुलगी पाहिजे होती आणि मी त्यांच्या कॅटेगरी मध्ये बसत नव्हती सो रिजेक्ट केलं त्यांनी.

अहो चालायचे, कधी ना कधी आपल्याला पण योग्य गोष्ट मिळतेच फक्त त्यासाठी एक वेळ यावी लागते.

ती : Ohh हो छान बोलता की तुम्ही, चला आता ठेवते फोन मला कामे करायची आहेत घरातली.

तिने असे बोलून फोन ठेवला पण तिच्या मनाचे दरवाजे कुठेतरी माझ्यासाठी उघडले होते. असे फक्त मलाच वाटतं होतं बर का.

रात्री दहाच्या सुमारास माझ्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज झळकला,खरतर ह्या मेसेजची मला अजिबात ग्वाही नव्हती की ती समोरून मला मेसेज करेल पण तरीही तिने मेसेज केला होता. मी काही वेळ फक्त तिच्या त्या मेसेज कडे आणि ऑनलाईन असलेल्या टेक्स्ट मध्ये पाहत बसलो. तिचा परत मेसेज आला जेवलात का? खरतर प्रत्येक मुलासाठी हा प्रश्न म्हणजे नेहमी I Love You असाच असतो.

मी सुद्धा रिप्लाय केला हा आताच झालं जेवण तुम्ही जेवल्या का? तिने सुद्धा हो आणि smily ईमोजी पाठवून होकारार्थी मान हलवली. तू मला अहो जाओ काय करतोस, किती छान आहे माझं नाव साबेरा तेच म्हण की. अहो तुमचं नाव छान आहे पण लगेच कसे अरे तू रे करायचे म्हणून अहो जाओ करतोय. पण प्रयत्न करतो अरे तू रे करायचा.

इथूनच आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. आधी एक तास, नंतर दोन तास, तर कधी कधी दिवसभर आम्ही चाट मध्ये गप्पा मारत बसायचो. पण ती कधीच मला कॉल करत नव्हती. तिचा आवाज ऐकायची माझी इच्छा झाली की व्हॉईस नोट पाठवायची. अशीच तर वेडी होती माझी साबेरा. पण मी कधीही तिला भेटायचा विषय काढला की नेहमी मला नाही म्हणायची. तिच्या मते जेवढी पहिली भेट लांब नेऊ शकतो तेवढीच भेटायची ओढ आणि उत्सुकता वाढेल. पण तिला सांगणार कोण की मी तिच्या भेटीसाठी खूप आतुर होतो.

अचानक एक दिवस तिने सकाळी पहाटे चार वाजता मला फोन केला. कधीही फोन न करणारी माझी साबू आज अचानक एवढ्या सकाळी फोन करते म्हणून मला थोड वेगळं वाटलं. पण तिच्या बोलण्यात तसे काही जाणवले नाही. तुझी खूप जास्त आठवण आली म्हणून तुझा आवाज ऐकावा वाटला म्हणून कॉल केला. त्या दिवशी आम्ही सकाळी सात वाजेपर्यंत बोलत होतो. वेळेचे बंधन कधीच प्रेम युगुलाना नसते हे तुम्हाला काही वेगळे सांगायची गरज नाही.

साबेरा ची एक गोष्ट मला अजिबात आवडत नव्हती. तिचे माझ्यावर प्रेम तर खूप होतं पण ती फक्त दुपारी जास्त बोलायची. रात्री फक्त गुड नाईट एवढाच मेसेज असायचा. माझ्या घरी खूप स्त्रिक्ट आहे सर्व असे नेहमी म्हणायची. पण काही दिवसापासून तिचे मेसेज येणे मला बंद झाले. मी बऱ्याचदा तिला मेसेज केला पण मेसेज डिलिव्हर होत नव्हते.

मी कॉल सुद्धा केला पण तो ही तिने ब्लॉक केला होता. नक्की काय झालं आहे मला काहीच कळायला मार्ग नव्हता. एक, दोन, तीन, पाच, दहा, पंधरा दिवस गेले तरी तिचा काहीही थांगपत्ता नव्हता. मी खूप टेन्शन मध्ये होतो. अखेर एक दिवस तिने एवढाच मेसेज केला. हाय, मला उद्या तुला भेटायचे आहे, पनवेल बस स्टॉप दुपारी एक वाजता.

तिच्या ह्या मेसेज ने मी खूप जास्त आनंदित झालो होतो पण भीती सुद्धा वाटतं होती की नक्की अचानक ह्या भेटी मागे काय भानगड आहे. सर पनवेल आलं, असे म्हणत कॅब ड्रायव्हर ने मला भूतकाळातून बाहेर काढलं. तिला यायला अजून पंधरा मिनिट उशीर होता म्हणून मी जाऊन बस स्टॉप वर तिची वाट पाहत बसलो पण मी पाहतोय की ती माझ्या आधीच येऊन एका बाकावर बसली होती.

आकाशातून एक सुंदर अप्सरा जणू त्या बाकावर विराजमान झाली होती. तिच्या ड्रेस ची ओढणी हवेने हळुवार उडत होती, तिने घातलेले ते लांब टाचाचे बुट त्याच्या सौंदर्यात अजून जास्त भर घालत होते. मी फक्त तिच्याकडे पाहताच राहिलो. अखेर तिचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि ती बाकावरून उठून माझ्याकडे आली.

काय रे किती उशीर कधीपासून तुझी वाट पाहतेय मी, चल ये माझ्या गाडीत बसू मग ठरवू. मी मात्र मनातल्या मनात स्वतः शी पुटपुटलो हीची स्वतः ची गाडी आहे ती पण फॉर्चूनर. हा माझ्यासाठी धक्काच होता कारण ह्या आधी तिने ह्याबद्दल मला काहीच सांगितले नव्हते. आम्ही गाडी मध्ये बसताच ती अलगद माझ्या मिठीत शिरली तिचे ते दोन्ही हात माझ्या पाठीवर रेंगाळत होते.

मी म्हणेन माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर क्षण होता. ती उबदार मिठी मला खूप जास्त भावली. पण मी पाहिले तर माझी साबू माझ्या मिठीत शिरून रडत होती. मला काहीच कळले नाही नक्की काय झालं. मला आधी वाटलं की नकळत मी चुकीचा स्पर्श तर नाही ना केला पण नंतर तिनेच बोलायला सुरुवात केली.

प्रखर मी आज तुला असे काही सांगणार आहे जे ऐकून तुला माझा खूप राग येईल, कदाचित तू इथून निघून पण जाशील पण आता मला हे सहन नाही होत आहे. तुझ्यापासून आता लपवणे मला कठीण जातेय. मी फक्त तिच्याकडे पाहत बसलो होतो आणि ती हुंदके देत मला सर्व काही सांगत होती.

सोना तुला वाटतेय तसे काही नाही रे. तुझी साबू जरी तुला वाटतेय तुझी आहे पण ती तुझी नाहीये. ती आधीच कुणाची तरी झाली आहे. माझं लग्न झालेय. लग्नाला दोन वर्ष झालीत आणि मी नवऱ्या सोबतच राहते. पण प्लीज ती वेगळा अर्थ नको काढूस माझ्या प्रेमाचा. मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम केलं आहे, केलं म्हणण्यापेक्षा मला तुझ्यावर आपोआप प्रेम झालं.

तू खूप गोड आहेस रे.. आणि माझ्या संसारात मी सुखी नाहीये त्यामुळे नकळत तुझ्याकडे कधी ओढली हे मलाही कळलं नाही. स्वतः पेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करते मी पण मला माहित आहे मी खुप वाईट वागळे तुझ्याशी. हे सर्व तुला आधीच सांगायला हवं होतं. तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य आहे. जर तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर मी माझ्या नवऱ्याला सोडून तुझ्याकडे यायला तयार आहे. आणि तुला माझ्याशी संबंध ठेवायचे नसतील तरीही मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईल. कारण मला फक्त तुला सुखात पाहायचे आहे मग त्या सुखाचे कारण मी नसले तरी चालेल.

मला तिच्या ह्या बोलण्याने काहीच सुचत नव्हते. सर्व भूतकाळ डोळ्यासमोर फिरत होता. तिचे फोनवर माझ्याशी न बोलणे, रात्री कधीच चाट न करणे, कधीही भेटायला न येणे ह्यामागचे कारण आता समोर आलं होतं. माझी ऑनलाईन ओळख झाली खरी पण मला ती ह्या वळणावर आणून सोडेल असे वाटले नव्हते मित्र मैत्रिणींनो अशा परिस्थितीत मी काय करायला हवं? सर्व विसरून मी साबेरला स्वीकारू की तिने माझा विश्वासघात केला म्हणून तिच्या आयुष्यातून निघून जाऊ. मला तुमच्या उत्तराची गरज आहे. जे जे ही कथा वाचत आहे त्या सर्वांनी कमेंट करून मी काय करू पुढे ते सांगा.

ह्या पण माझ्या काही निवडक कथा वाचा

लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल