Home हेल्थ कडीपत्ता खाण्याचे फायदे

कडीपत्ता खाण्याचे फायदे

by Patiljee
37644 views
कडीपत्ता

वरण, भाजी, उपमा, कांदेपोहे, चिवडा, खिचडी यांमध्ये कडीपत्ता हा या पदार्थांमध्ये चवीसाठी वापरला जातो. पण हे पदार्थ खाताना मात्र कडीपत्ता एखाद्या खड्या प्रमाणे बाजूला काढला जातो. असे का तर आपली त्याच्याकडे बघण्याची वृत्ती चांगला नाही लागत, अशी समजूत असल्या कारणाने आपण तो ताटातून बाजूला काढून ठेवतो.

पण हाच कडीपत्ता जेवणात मात्र न चुकता घालतो कारण त्याचा येणारा वास आपल्याला आवडतो. म्हणून आज आम्ही सांगणार आहोत की हाच कडीपत्ता खाल्याने कोणते फायदे मिळतात जेणेकरून तो बाजूला न काढता खाण्याचा प्रयत्न कराल.

कडीपत्ता खाण्याचे उपयोग

कडीपत्ता मध्ये भरपूर प्रमाणत लोक असते ज्याची आवश्यकता आपल्या सर्वानाच असते. त्याचबरोबर अ आणि क जीवनसत्व तसेच आयोडीनाचे भरपूर प्रमाण असते.

कडीपत्ता मध्ये अधिक प्रमाणत फायबर असते. त्यामुळे तुम्हाला जर मधुमेहाचा आजार असेल तर नक्की खा. यामुळे तुमची साखर नियत्रणात राहते.

ज्या लोकांचे वजन जास्त आहे आणि त्यांना आपले वजन कमी करायचे आहे अशांनी सकाळी उपाशी पोटी कडीपत्त्याची पाने चाऊन खावी.

यकृत निरोगी राहण्यासाठी या पानाचा रस गरम करून घ्यावा.

कडीपत्ता

जुलाब लागले असल्यास कडीपत्त्याच्या पानांचा रस प्या. लवकर आराम मिळेल.

ज्यांना अपचन,गॅसचा त्रास होतो अशांनी कडिपत्त्याची चटणी त्यात सैंधव मीठ टाकून जेवणानंतर खावी.

तुमचा कोलेस्टेरॉल वाढला असेल तर अशांनी उपाशी पोटी कडीपट्ट्याची पाने चावून खावी.

स्त्रियांसाठी केसगळतीवर कडीपत्ता उपयोगी आहे तो खाल्ल्याने केस लांब, काळे, घनदाट आणि त्याच्यात होणारा कोंडा निघून जातो. त्याचप्रमाणे हाच कडीपत्ता वळवावा आणि त्याची पावडर खोबरेल तेलात टाकून हे तेल केसांना लावा आणि दुसऱ्यादिवशी केस धुवा.

कडीपत्ता तुम्ही आजवर जेवणातून कितीतरी वेळा बाहेर काढून ठेवला असेल. पण आता तसे अजिबात करू नका. यावेळी फेकून न देता खायला शिका.

हे पण आर्टिकल वाचा

Please follow and like us:

Related Articles

2 comments

नाचणी खाण्याचे फायदे » Readkatha July 30, 2020 - 5:59 pm

[…] कडीपत्ता खाण्याचे फायदे […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल