Home हेल्थ उत्तम आरोग्य राखण्यासाठी केळी खाणे गरजेचे आहे.

उत्तम आरोग्य राखण्यासाठी केळी खाणे गरजेचे आहे.

by Patiljee
30091 views
केळी

केळी हा फळ तुम्हाला सफरचंद या फळा इतका महाग वाटत नसला तरी यामध्ये आढळणारे गुणधर्म जवळ जवळ सफरचंद सारखेच आहेत. सफरचंद आपल्या तरी रोज खायला परवडणारे मुळातच नाही पण हा रोज दोन केली आपल्या खिशाला परवडणारी आहेत. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की केळी खाल्ल्याने लठ्ठपना येतो हे सगळे गैरसमज दूर ठेवा आणि बिनधास्त केळी खा.

केळी खाण्याचे फायदे

केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा दिवसभराचे कार्य करण्यासाठी गरजेची आहे. तुम्ही जर दोन केली खाल्ली तर जवळ जवळ दोन तास तरी काम करण्याची ऊर्जा तुम्हाला मिळते.

केळी खाल्ल्याने तुमचे मन शांत होते यासाठी ज्यांना मानसिक त्रास होतो किंवा जे डिप्रेशनचे शिकार झाले आहेत अशांनी रोज केळ्यांचे सेवन केलेले उत्तम.

महत्वाचे म्हणजे लहान मुलांना नाष्टा केल्यानंतर केळ खायला द्यावे. या केल्यात भरपूर पोटॅशियम असते जे लहान मुलांची बुद्धी तल्लख ठेवण्यास मदत करते.

तुम्हाला जर अनेमिया असेल म्हणजे शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर केळी नक्की खा. केळ्यामधे तुम्हाला लोह मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे तुमची शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

केल्यामध्ये मिठाचे प्रमाण भरपूर कमी असते त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांनी खाल्ले तरी चालते.

केळी आणि सफरचंद या दोघांची गणना केली तर केळी मध्ये सफरचंद पेक्षा चार पट अधिक प्रोटीन असते. पाचपट व्हिटॅमिन ए आणि लोह असते, शिवाय दुपटीने कार्बोहायद्रेद असतात. तसेच तीन पटीने फोस्परस असते. आणि इतकी पोषक घटक जर रोज मिळणार असतील तर रोज केळी खाणे उत्तम आहे.

पण सध्या पावडर आणि केमिकलने पिकवलेली केली बाजारात विकायला असतात. त्यापेक्षा गावठी केली खाणे उत्तम. महत्वाची काळजी म्हणजे ज्यांना दमा आहे अशा लोकांनी केली मुळीच खाऊ नये हिवाळ्यात त्यांना खोकला वाढू शकतो.

मग वाट कसली पाहत आहात रोज किमान एक तरी केळ नक्की खा. तुमच्या शरीरासाठी ते चांगले आहे.

हे पण वाचा

Please follow and like us:

Related Articles

2 comments

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल