Home हेल्थ कोथिंबीर खाण्याचे फायदे

कोथिंबीर खाण्याचे फायदे

by Patiljee
5631 views
कोथिंबीर

कोथिंबीर आपल्या रोजच्या जीवनातील भाजी तशी आपण ही भाजी म्हणून खात नाही, फक्त चवीला वापरतो. पण ती भाजी या प्रकारात मोडते म्हणून तिला भाजीचं म्हणतो. कोथिंबीर भाजी किंवा खिचडी अन्य पदार्थांवर भूरर्भुळ्यावर त्या पदार्थाची चव तर वाढते पण त्या पदार्थाची पौष्टीकपणा ही वाढतो. तशी कोथिंबीरची वडी बहुतेक जणांना आवडते. तर चला बघुया या कोथिंबीर पासून काय काय फायदे मिळतात.

कोथिंबीर खाण्याचे फायदे

तुमच्या चेहऱ्यावर मुरमे येत असतील तर ह्यावर कोथिंबीरचा रस घेऊन त्यात हळद मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

कोथिंबीर ताका मध्ये टाकून प्यायल्याने अपचन उलटी, मळमळ, अतिसार यावर परिणामकारक आहे.

शरीरात उष्णतेमुळे होणारा दाह शमवणारी कोथिंबीर रोज पोटात जायला हवी.

डोळ्यांसाठी ही अत्यंत उपयोगी आहे ही कोथिंबीर व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणत असल्यामुळे याने डोळ्यांची निगा राखली जाते.

कोथिंबीर मध्ये प्रोटीन, कारबो हौद्रेद, वसा, फायबर तसेच कॅल्शिअम, पोटॅशियम,व्हिटॅमिन सी, फोस्परस हे महत्त्वाचे घटक आढळतात.

कोथिंबीरचा रस तुमच्या केस गळतीवर ही उपयोगी आहे. हा रस केसांना लाऊन मग एक तासाने केस धुवा. तसेच केसांना रस लाऊन दोन तास ठेवा आणि नंतर धुवा यामुळे केस सरळ होतात.

कोथिंबीर खाल्याने शरीरातील होणारी हार्मोन्सची कमी जास्त प्रोसेस थांबते आणि हार्मोन्स संतुलित राहतात त्यामुळे थायरॉईड सारखा आजार आपल्यापासून लांब राहतो.

मधुमेह असणाऱ्यांसाठी कोथिंबीर ही उपयोगी आहे यामुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

हे पण वाचा कोथिंबीर सुकवून वर्षभर खा बघा त्यासाठी काय आहे प्रक्रिया

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल