Home हेल्थ कोरफड या आरोग्यवर्धक झाडाचे एक तरी रोप घरी असावे

कोरफड या आरोग्यवर्धक झाडाचे एक तरी रोप घरी असावे

by Patiljee
73566 views
कोरफड

कोरफड कसेही खा म्हणजे भाजून खा किंवा तिचा रस प्या ही कोरफड आपल्या शरीराच्या कित्तेक भागांसाठी गुणकारी आहे. केसांपासून ते त्वचेपर्यंत अत्यंत प्रभावी औषध ठरणारी ही कोरफड तुमच्या घरी आहे का? नसेल तर आजच एखादे कोरफडचे झाड आणून कुंडी मध्ये लावा.

आता कोरफडीच्या गरामध्ये तुम्हाला कोणकोणते घटक मिळतात? तर व्हिटॅमिन ए’, सी’, बी1’, बी2’, बी3’, बी6’, फोलिक अॅसिड हे घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्याचप्रमाणे यामध्ये खनिजे ही भरपूर प्रमाणत असतात. मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम ही खनिजे आढळतात.

कोरफडचे फायदे

आता कोरफड आरोग्यदायी घटक असल्यामुळे खोकला आणि सर्दी यावर अचूक उपाय करते. त्यासाठी हा कोरफडीचा गर भाजून खाल्ला जातो. या कोरफडीमध्ये असणारे अँटि-वायरल आणि अंटि-बॅक्टेरियल घटक तुम्हाला स्वसणाच्या त्रासाला कारणीभूत असंते घटकांशी लढतात.

कोरफड तुमचे वजन घटवण्यात ही उपयोगी आहे. तुम्हाला वजन घटवायचे असेल तर कोरफडीचा रस प्या या रसामुळे मेटॅबॉलिक रेट वाढते आणि वजन आपोआप कमी होते.

गवती चहा पिण्याचे आहेत वेगवेगळे फायदे पाहूया काय काय आहेत ते

तुमच्या शरीरात असते विषारी घटक बाहेर पडण्यास ही हा कोरफडीचा रस खूप मदत करते.

कोरफडीचा रस पिल्यामुळे शरीरातील तुमच्या शरीरासाठी उपयुक्त बॅक्टरिया निर्माण होतात. हे बॅक्टरीया त्यामुळे तुम्हाला होणारा अन्न पचन त्रास सुरळीत होतो. शिवाय पित्ताचा त्रास ही कमी होण्यास मदत होते.

स्त्रियांच्या योनी मध्ये संक्रमण मुळे खाज येते. अशा वेळी कोरफडीचा रस उपयोगी आहे. योनी मार्गाजवळील अनेक समस्या याने दूर होतात.

कोरफडीच्या रसामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याची गुणवत्ता आहे. या रसामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे घटक तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

केसांच्या सर्व समस्यांवर कोरफडीचा गर काढून लावावा यामुळे तुमचे केस गळणे कमी होऊन दाट व मजबूत होतात.

कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावा यामुळे तुमचा चेहरा टवटवीत आणि सुरकुत्या ही कमी होतात. हे पण वाचा लसुण हृदय रोगासाठी आहे एक अत्यंत प्रभावी औषध, वाचा आणि असा उपयोग करा

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल