म्हणतात की गणरायाचा आवडता फुल म्हणजे जास्वंद. तसे म्हणायला गेलात तर आताच्या काळात या जास्वंदाचे अनेक रंग निघाले आहेत. पण त्यातल्या त्यात लाल रंगाचं जास्वंद जास्त आकर्षक वाटतो. ही लाल रागाची फुले तुम्हाला सर्व ठिकाणी पाहायला मिळतात. ह्या फुलांची चव आंबट असते शिवाय यात व्हिटॅमिन सी चे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हे जास्वंद फुल तुमच्या त्वचेसाठी तसेच तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
जास्वंद फुलाचे फायदे
या फुलाचा रस काढून त्याचा रस केसांना चोळा. एक तासाने केस धुवा यामुळे तुमची केस मऊ आणि चमकदार होतात.
तुमच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडायला लागल्या असतील तर त्यासाठी या फुलाचा रस आणि त्यात थोडे तांदळाचे पीठ मिसळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही रोज जास्वंदीची ग्रीन टी प्या लवकर फरक जाणवेल.
जास्वंदीची ग्रीन टी सेवनाने आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी लोह, ताम्र, जस्त (झिंक), ब-१, ब-२ आणि क ही जीवनसत्त्त्वे इत्यादी घटक मिळतात.
तसेच हीच ग्रीन टी पिल्याणें तुमचा मधुमेह ही आटोक्यात राहू शकतो.
या चहाची चव आंबट असते आणि रंग लाल असतो.
ह्या आधी तुम्हाला जास्वंद फुलाचे हे महत्त्व माहित होत का? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आरोग्यविषयक हे आर्टिकल सुद्धा वाचा.
- जाणून घ्या अडुळसा वनस्पतीचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे
- मधुमालतीची फुले जाणून घ्या यात असते कोणकोणते घटक जे आपल्याला उपयोगी आहेत
- निलगिरीच्या झाडाचे महत्त्व जाणून घ्या. कदाचित आजवर हे वाचले नसेल