Home हेल्थ दररोज चालण्याचे फायदे

दररोज चालण्याचे फायदे

by Patiljee
46454 views
चालण्याचे फायदे

दररोज नियमित व्यायाम तसेच चालणे हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाचे आहे. पूर्वी लोक भरपूर मेहनतीची कामे करायची. आताही काही ठिकाणी लोक अशीच अंग मेहनतीची कामे करताना दिसतात. त्यामुळे ती लोक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. पण आपली कामे दिवसभर बसून एका खुर्चीत किंवा महिलांना ही दिवसभर बसून कामे शिवाय यासाठी अंगमेहनत ही कमी लागते.

त्यामुळे अनेक आजार आपल्याला जडतात. त्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे. नाहीतर कमी कमी ३० मिनिटे चालणे हे आपल्या शरीर साठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मिळतात तुमच्या शरीराला अनेक फायदे.

चालण्याचे फायदे

घराबाहेर गवतावर किंवा सध्या गार्डनमध्ये सहज ३० मिनिटे तुम्ही चालू शकता. शिवाय चालणे हा व्यायाम काही कठीण नाही सर्वानाच जमते.

शिवाय चालण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही सहज आणि सोपा असा हा व्यायामाचा प्रकार आहे.

चालण्याने तुमचे शरीर चपळ राहते तसेच तुम्ही नेहमी तंदुरुस्त राहता.

चालताना कधी चालायचे हा प्रश्न सर्वानाच पडत असेल तर सकाळच्या स्वच्छ हवेत चालणे शरीर साठी अधिक चांगले आहे.

सकाळचे कोवळे उन आपल्या शरीराला मिळते. त्यामुळे डी जीवनसत्व हे आपल्या शरीराला मिळते त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात.

चालल्यामुळे तुम्हाला झोप ही चांगली लागते. शिवाय शरीरात असणारे उष्मांक जे रोजच्या रोज बाहेर पडायला हवे ते जळले जातात.

चालल्यामुळे तुमची नको असलेली चरबी जास्त वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.

पचन क्रिया सुधारते शिवाय पोटाचे आजार कमी होतात.

नियमित चालल्याने हृदय संबंधीचे आजार कमी होतात.

पाठीचे तसेच कमरेचे आजार ही कमी होण्यास मदत होते.

असे अजुन भरपूर फायदे आहेत जे आपल्याला नियमित चालल्यामुळे मिळतात.

चालण्याचे फायदे वरवर छान दिसत असले तरीसुद्धा जोपर्यत आपण वेळ काढून चालत नाही तोपर्यंत काहीच साध्य होऊ शकत नाही.

हे पण वाचा

नाचणी खाल्ल्याने मिळतात आपल्या शरीराला मुबलक फायदे. वाचा

नीरा पिण्याचे फायदे जाणून घ्या. गुणकारी आहे

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल