Home हेल्थ नारळाचे मोदक रेसिपी

नारळाचे मोदक रेसिपी

by Patiljee
1499 views
मोदक

शनिवारी म्हणजेच २० ऑगस्ट रोजी आपल्या घरात बाप्पा विराजमान होणार आहेत. गेले काही महिने आपण एवढे काळजीत काढले आहेत की बाप्पा येण्याने आपल्या सर्वांच्याच घरात एक वेगळाच आनंद निर्माण होणार आहे. जगभरात ह्या विषाणू ने एवढा प्रकोप माजवला आहे की गणेशाच्या आगमनाने एक नवीन सुरुवात होईल असे आपल्याला सर्वांना वाटतं आहे.

दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होणार गणेशोत्सव यावर्षी मात्र एवढ्या दिमाखात साजरा होणार नाहीये. पण ह्यात सुद्धा आपण आपल्या बाप्पासाठी बरच काही करू शकतो. तुम्ही तुमच्या बाप्पाला काय नैवद्य द्याल हे आधीच ठरवून सुद्धा ठेवलं असेल, बरोबर ना? आज आम्ही तुम्हाला असाच एक नैवद्य साठी पदार्थ कसा बनवायचा हे शिकवणार आहोत. जो तुमच्याही आवडीचा आहे.

नारळाचे मोदक कसे तयार करायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना? चला तर पाहूया काय आहे पद्धत.

मोदक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • गूळ २ कप
  • तांदळाचे पीठ २ कप
  • गावठी तूप १ चमचा
  • मीठ एक चमचा
  • वेलची पावडर १/२ चमचा
  • किसलेले नारळ २ कप

मोदक तयार करण्याची कृती

सर्वात आधी नारळ किसून घ्या. आणि त्यामध्ये गूळ वेलची टाका, शक्य असल्यास गावठी तूपही टाका. त्याने एक वेगळ्या प्रकारचा सुगंध येतो.

मोदकाची पारी करण्यासाठी तांदळाचे पिठाला भाकरी सारखी उकड घ्या. त्यात मीठ आणि गावठी तूप टाका आणि झाकण ठेऊन चांगली वाफ घ्या. उकड घेतलेलं पीठ काढून मळून घ्या. हातात पीठ घेऊन पारी बनवा त्यात सारण भरा हे आणि पुढे तुम्हाला हवा तसा आकार द्या. बनवून झालेले मोदक चाळणी मद्ये ठेवा ही चाळण एका टोपात थोडे पाणी घालून चांगली २०मी. दनदनुन वाफ घ्या मोदक तयार.

अशा प्रकारे तुमचे मोदक तयार असतील. खाली दिलेले आर्टिकल सुद्धा वाचा

८०० रुपयाच्या आतमध्ये गणेश उत्सवासाठी मुलींसाठी उत्तम ड्रेसेस. एकदा नक्कीच पाहा

जास्वंद आणि बाप्पा

Please follow and like us:

Related Articles

1 comment

बटाटा खाण्याचे फायदे » Readkatha September 2, 2020 - 5:48 pm

[…] नारळाचे मोदक रेसिपी […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल