Home कथा एक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे

एक विचित्र अनुभव : प्रवासात भेटलेला गे

by Patiljee
6087 views

आपल्याच एका पेज वरील एका मुलाचा एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्याने त्याचे नाव नमूद करायला सांगितले नाही. पण त्याच्यासोबत घडलेला हा प्रकार खरंच अंगावर काटे आणणारा आहे.

ऑफिसचा आज तिसरा दिवस होता आणि मला पनवेल मधील काही फारसे माहीत नव्हते. कारण इकडे येण्याचा योग कधी आलाच नव्हता. एका चांगल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू निघाल्या आहेत म्हणून इकडे आलो आणि सिलेक्ट झालो. कंपनी छान होती आणि अपेक्षेपेक्षा जास्त पगार मिळाल्याने मी सुद्धा खूप जास्त खुश होतो.

पण माझे घर अलिबागमध्ये असल्याने पनवेल टू अलिबाग असा मोठा प्रवास मला करावा लागत होता. पहिल्या दिवशी बाईक घेऊन आलो पण अंतर खूप आहे आणि पेट्रोल एवढे महाग झाल्याने गाडी काही आपल्या खिशाला परवडणार नाही ह्याचा अंदाज मला आला. दुसऱ्या दिवशी बसने प्रवास केला. तो सोयीस्कर वाटला. पण माझ्या ऑफिस जवळून कमीतकमी एक किमी चालल्याने बस स्टॉप लागत होता त्यामुळे ते पायपीट करणे सुद्धा सवईचे करून घ्यायचे होते.

आज तिसरा दिवस होता, एक इकडेच काम करणारा मित्र म्हणाला की येणाऱ्या जाणाऱ्या बाईक  किंवा कार वाल्यांना थांबवत जा काही रोजचे प्रवास करतात ते नक्की थांबवतात. म्हणून मी आज प्रत्येक गाडीला हात करत होतो. दहा मिनिटाच्या सखोल प्रयत्नाने एक कार वाला समोर येऊन थांबला. माझ्यासाठी आज तो देवच होता कारण मुसळधार पावसाने जणू थैमान घातले होते.

मी त्याला अलिबाग म्हटले तर त्याने सुद्धा होकारार्थी मान हलवली आणि मला बसायला सांगितले. तो अलिबागला जाणार तर नव्हता पण पेण शहराच्या अलीकडे सोडतो तुला असे सांगून गाडीला सुरू केली. अजूनही ह्या जगात चांगली माणसे आहेत ह्याचा प्रत्यय मला आला. त्याने माझे नाव विचारले काय करतो कुठे राहतो घरी कोण कोण असते इकडे कुठे जॉब करतो असे भलीमोठी प्रश्नांची यादी समोर धरली. मी सुद्धा त्याच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देत होतो.

अशाने प्रवास सुध्दा लवकर संपेल आणि प्रवासात कंटाळा सुद्धा येणार नाही म्हणून मी ही गप्पा मारत बसलो. गाडीचा गैर बदलताना अनेकदा त्याने माझ्या मांडीला, हाताला, गाळाला अनेक वेळा स्पर्श केला. काहींना सवय असते म्हणून मी पण ही गोष्ट इग्नोर केली. त्याने मला विचारले गर्लफ्रेंड आहे का नाही? मी म्हटले नाही अजून तरी म्हणजे होती एक पण आता आम्ही नाही सोबत. तर तो म्हणाला अरे एवढा सुंदर आहेस गर्लफ्रेंड असली पाहिजे ऊब मिळते त्याने.

त्याच्या ह्या शब्दाने मी थोडा भांबावालो ऊब मिळते म्हणजे ह्याला नक्की काय म्हणायचे आहे. पण मी पण जास्त विचार न करता हसून विषय टाळून नेला. गाडी कर्नाळा खिंडीत आली आणि त्याने गाडीचा स्पीड थोडा कमी केला. गाडी थोडी बाजूला घेत आडोश्याला लावली. त्याच्या कारच्या खिडक्या पण आतून काळया रंगाच्या असल्याने बाहेरून लोकांना काही दिसत नव्हतं. एखाद्या ड्रायव्हरने गाडी थांबवली म्हणजे तो एक नंबरला जाणार हे मला माहीत होत पण इथे मात्र वेगळेच झालं.

त्याने माझा हाथ घट्ट पकडला आणि खेचून माझी बोटं त्याच्या ओठांवर लावली. मी हाथ हिसकावून घेतला. काय करतोय तू? मी रागात पण थोडा घाबरूनच म्हटलं. तो जे म्हणाला तेव्हा मात्र मी खूप जास्त घाबरलो. ऐक ना तू खूप सुंदर आहे. पाहताक्षणी कुणालाही आवडशील असा आहेस. फक्त पाच मिनिटे देशील मला तुझ्या प्यांटची चैन खोलून तुझा लिंग काढ ना बाहेर मला त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि सरळ त्याने त्याचा हाथ माझ्या पँट वर फिरवायला सुरुवात केली.

मी रागाच्या भरात जोरात एक त्याच्या कानशिलात लगावली आणि गाडीचा दरवाजा खोलून मागे पुढे न बघता पुढे धावत राहिलो. एवढा मी आयुष्यात कधीच घाबरलो नव्हतो. त्याची ती नजर, स्पर्श एकदम किळसवाणा वाटतं होता. कमीतकमी एक ते दोन किलोमीटर मी फक्त धावत होतो आणि पुढे गेल्यावर एका विक्रम मध्ये बसून आधी पेन मग बस ने अलिबाग गाठले. तेव्हापासून ठरवले आजपासून कुणाकडून लिफ्ट मागायची नाही. सरकारी बस ने जायचे सरकारी बस ने घरी यायचं मग येताना कितीही वेळ झाला तरी चालेल. मला मान्य आहे तो गे असेल पण त्याने हे ही समजायला पाहिजे की समोरचा पण तसाच आहे का? असे वागणे कितपत योग्य आहे हे तुम्हीच कमेंट मध्ये सांगा.

माझ्यासोबत घडलेला हा सुद्धा अनुभव वाचा आजच्या सारखा भयाण दिवस मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलाच नव्हता.

समाप्त

लेखक : पाटीलजी आवरे उरण, रायगड

Please follow and like us:

Related Articles

2 comments

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल