Home हेल्थ फणसाचे फायदे

फणसाचे फायदे

by Patiljee
2857 views
फणसाचे फायदे

फणस या फळात दोन जाती आढळतात. एक बरका आणि दुसरा कापा. खायला दोन्ही प्रकार मधुर एकदा फणस कापला की त्याचा वास शेजाऱ्यांना आल्याशिवाय राहत नाही. या फणसावर वरून जरी काटे असले तरी आतून मात्र खायला एकदम मऊ आणि गोड असतो. थोडक्यात काय तर याचा वास दडत नाही.

या फणसाचे अनेक प्रकार बनवले जातात जसे की फणसाची पोळी, फणसाचे वेफर्स, कच्च्या फणसाची भाजी अतिशय छान लागते. वट पौर्णिमेला वाना मध्ये ठेवायला फणसाचा गरा हा असतोच. अशा या फणसाचे अजूनही भरपूर असे फायदे आपल्या शरीराला मिळतात ते तुम्ही आज जाणून घ्या.

फणसाचे फायदे

फणसामध्ये विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, लोह, कॉपर,झिंक असे घटक असतात. जे आपल्या शरीराला शरीराच्या विविध आजारांवर खूप उपयोगी आहेत.

फणस खाल्यामुळे डोळ्यांचे काही विकार असतात ते कमी होण्यास मदत होते.

ज्यांना मधुमेह हा आजार आहे अशा लोकांनी या फणसाच्या पांनाचा रस काढून तो प्यावा आटोक्यात येतो.

तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांनी ही ह्याच पानाचा रस प्यावा. त्यामुळे रक्तदाब नॉर्मल होतो. तसेच सोडियमच प्रमाण ही गर्यांमधे कमी असते.

तुम्हाला पोट साफ होत नाही किंवा अपचनाचा त्रास असेल तर पिकलेल्या फणसाची गरे खा.

तुम्हाला जर थायरॉइडचा त्रास असेल तर नेहमी फणसाचे सेवन करा. त्यामुळे फणसांमध्ये असते कॉपर थायरॉइडचां ग्रंथींचा स्त्राव नियंत्रणात आणते.

फणासातील घटकांमध्ये कर्क रोग विरोधी घटक असतात. तसेच क्षय रोग विरूद्ध लढण्यास ही घटक यामध्ये असतात.

फणस खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये तसेच फणस गरम असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी याचे जास्त सेवन करू नये.

कच्च्या फणस मध्ये थायमिन, फायबर, जीवनसत्व ए आणि सी तसेच नियासीन फॉलेट हे गुण असतात.

फणसाचे फायदे वाचलेत आता आरोग्यविषयक अजून काही आर्टिकल वाचा.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल