आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार आणि या महिन्यात आपण प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन देवाला बेलाची पाने वाहतो. पण ही बेलाची पाने आपल्या दृष्टीने ही किती औषधी आहेत हे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील. महत्वाचे म्हणजे माणसाच्या अंगी जे महत्वाचे तीन दोष आहेत म्हणजेच वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष संपुष्टात अनानायचे सामर्थ्य हे ह्या बेला मध्ये आहे.
बेलाचे उपयोग
तुम्हाला जुलाब किंवा पोटात आव पडत असेल अशा वेळी बेलाचे फळ अत्यंत उपयोगी आहे. या बेलाचे फळ त्याचे गर हे जुलाब आणि आव यावर औषधी आहे. बेलाचा मुरंबा ही यावर रोज खाल्याने आराम मिळतो.
बेल आणि दुर्व्याचे पाणी मिसळून प्या यामुळे अनेक आजार निघून जातात. म्हणजे रक्त शुद्ध होते तसेच मधुमेह, ताप आल्यावर बडबड करणे, तसेच मेंदूचे आजार ही कमी होतात.
उष्ण ते मुळे तोंड नेहमी येत असल्यास उपाय करा बेलाचे पान किंवा बेलाचे फळ काहीही पाण्यात उकळवा आणि या पाण्याने गुळण्या करा.

आम्लपित्त झाला असल्यास बेलाच्या पानांचा रस किंवा फळाचा रस तीन ते चार वेळा एक चमचा दिवसभरातून घ्या. पोटात जंत झाले असल्यास बेलाच्या फळाचा रस पिण्यास द्यावा.
बेलाचे हे उपयोग ह्या आधी तुम्हाला माहित होते का? आम्हाला नक्की सांगा.
हे पण वाचा दोन ते चार दिवस झाले मला सौचास झाली नाही, मी काय करू? हा प्रश्न तुम्हाला ही पडत असेल मग वाचा
2 comments
[…] […]
[…] […]