Home हेल्थ बोरं खाण्याचे फायदे

बोरं खाण्याचे फायदे

by Patiljee
3141 views

बोरे म्हणजे तसा पाहायला गेलात तर गावातील एक प्रसिद्ध फळ. ह्याची झाडे तुम्हाला बहुतेक ठिकाणी पाहायला मिळतील. लहानपणी बोराच्या झाडाखाली अख्खा दिवस काढणारी पोरं बघितली आहेत. हीच बोरे वेचून तर कधी न धुता तोंडात टाकली जायची. पण तरीही त्याची चव कधीच विसरता न येणारी आहे.

अशी ही बोरे चवीला गोड आणि आंबट अशी असतात. आंबट असली की एक डोळा मिटून ती खाल्ली जायची. या बोरांची सुकवून बोरकूट ही केला जातो. लहानपणी दुकानात तो ही मिळायचा आणि चवीने खायचोही. तर चला बघुया या बोरा पासून तुमच्या शरीराला कोणकोणते घटक मिळतात ते.

बोरं खाण्याचे फायदे

बोरांमधे भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते.

त्याचबरोबर कॅल्शिअमचे प्रमाण ही बऱ्यापैकी असते. त्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात.

बोरं

त्याचबरोबर शरीरासाठी आवश्यक असते प्रोटीन ही यात भरपूर प्रमाणत असते.

शिवाय फॉस्परस आणि कार्बो हायद्रेद ही यात पह्यायला मिळते.

याचबरोबर मुत्खड्यावर ही बोरे उपयोगी आहेत.

या बोरांच्या बिया जाळुन त्याची राख लिंबाच्या रसात मिसळून मुरम्यांवर लावा.

कर्करोगासारख्या घातक आजारा विरोधात लढण्यासाठी ज्या पेशींची आवश्यकता असते त्या तयार करण्याचे काम बोरे करते.

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी बोरे खाल्लेले उत्तमच आहे. यामुळे तुमची साखर नियंत्रणात राहते.

अशी ही मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेली बोरं नक्कीच आवर्जून खा.

आरोग्यविषयी हे आर्टिकल पण वाचा

Please follow and like us:

Related Articles

3 comments

निलगिरीच्या झाडाचे महत्त्व » Readkatha July 29, 2020 - 5:57 pm

[…] बोरं खाण्याचे फायदे […]

Reply
नाचणी खाण्याचे फायदे » Readkatha July 30, 2020 - 5:59 pm

[…] बोरं खाण्याचे फायदे […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल