Home संग्रह भारतातील VIP झाड

भारतातील VIP झाड

by Patiljee
4215 views
झाड

एखाद्या सेलेब्रिटी मागे तुम्ही अनेक अंगरक्षक पाहिले असतील. पण तुम्हाला असे ऐकायला मिळाले की एका झाडासारखी अंगरक्षक तैनात असतात, एक दोन नव्हे तर अनेक पोलिस अंगरक्षक ह्या झाडाच्या अवतीभवती फिरत असतात.

तुम्हाला वाचून धक्का बसेल पण ह्या झाडाच्या देखरेखी साठी एका वर्षाला १२ ते १५ लाख रुपये खर्च होतात. सलामतपूर ह्या छोट्याश्या गावात हे झाड स्थित आहे. सलामतपूर हे भोपाळ मध्ये आहे. ह्या झाडाला एवढी वीआयपी ट्रीटमेंट मिळते की ह्याला लागणारे पाणी सुद्धा रोज स्पेशल टँकरने नगरपालिकेतून येतं.

झाडाला कीड किंवा इतर आजारांना रोखण्यासाठी दर आठवड्याला कृषी विभागाचे अधिकारी येऊन ह्या झाडाची तपासणी करतात. पर्यटन स्थळांसारखं ह्या झाडाला सुद्धा बघण्यासाठी लोकांची गर्दी असते. पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ह्या झाडाला एवढी वीआयपी ट्रीटमेंट का दिली जातेय?

श्री महींद्रा राजपक्ष ह्या माजी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीनी २१ सप्टेंबर २०१२ रोजी जेव्हा भारत दौरा केला होता तेव्हा हे झाड त्यांनी स्व हाताने लावलं होतं. हे झाड साधेसुधे नसून गौतम बुद्धांना ज्या झाडाखाली मोक्ष प्राप्त झाला होता. त्या झाडाची ही फांदी आहे. आता ह्याच फांदीचे मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आहे. जवळजवळ वीस फूट हे झाड उंच झाले आहे.

म्हणून हे झाड भारतासाठी खूप खास आहे. गौतम बुद्धांचे अस्तित्व ह्या झाडामध्ये आहे म्हणून हे झाड खूप जास्त जपलं जातेय.

हे पण आर्टिकल वाचा

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल