Home कथा भूतकाळ

भूतकाळ

by Patiljee
3284 views

आज पाच वर्षांनी माझी पुन्हा एकदा धोदानी ह्या गावात बदली झाली होती. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. पहिल्यांदा जेव्हा माझी इथे ट्रान्सफर झाली होती तेव्हा मी शिक्षकी पेशात नवीन होतो. पण आज पुन्हा एकदा ह्याच गावात आल्यावर अगदी जसे हे गाव सोडून दिलं होतं तसेच मला भासत होतं. शहरात एवढा बदल झाला असताना ह्या गावात मात्र तील मात्र बदल झालं नव्हता. पण हाच न झालेला बदल मला हवाहवासा वाटत होता.

हाताच्या बोटावर मोजण्या इतकी इथली लोकसंख्या, विजेचा तर कधी थांग पत्ताच नाही. कधी असते तर कधी नसते. शाळेच्या विश्राम गृहात पोहोचल्यावर मी आशा ताईना ओळखले. काय ताई आज पुन्हा एकदा गावठी कोंबड्यांचा बेत करणार ना माझ्यासाठी?. काय सर तुम्ही अजून विसरला नाहीत मला आणि माझ्या जेवणाला. ऐकुन बरं वाटलं. मी गालातल्या गालात हसलो आणि रूम मध्ये शिरलो. माझी रूम आशा ताईंनी चकाचक करून ठेवली होती.

मला ह्या गावातल्या माणसाची हीच एक गोष्ट खूप मनापासून आवडते. ह्यांच्याकडे पैसा खूप कमी असला तरी माणुसकी भरभरून आहे. खिशात पैसा नसला तरी तुम्हाला ते सुखी ठेऊ शकतात. मला आधीच माहीत होत इथे विजेचा किती तुटवडा असतो म्हणून मी सोबत पॉवर बँक घेऊनच आलो होतो. मोबाईलवर मूवी पाहता पाहता गावठी कोंबड्यावर ताव मारत ती रात्र ढकलली. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता शाळा भरणार होती. मी लवकरच शाळेत जाऊन पोहोचलो.

भूतकाळ

पाच वर्ष आधीच्या शाळेत बदल जाणवत होता. आलो होतो तेव्हा शाळा फक्त नावाला होती, ना भिंती होत्या, ना बसायला मुलांना बेंच, पण हा तेव्हा त्या मुलांमध्ये शिकण्याची ओढ मात्र खूप होती. पण आता मात्र शाळा विटांनी रचली गेली आहे. मुलांना बसायला बेंच आले आहेत. भूतकाळात रमलेला असताना एक चार ते पाच वर्षाची मुलगा वर्गात येऊन हजर राहिली. मी घड्याळात पाहिले तर शाळा भरायला अजून पंधरा मिनिट अवकाश होता. मी त्या मुलीला तिच नाव विचारलं? तिने गुलाब म्हणून सांगितलं.

पहिलं प्रेम एवढं *Stupid* का असतं? की आपल्याला जगाचे सुद्धा भान राहत नाही. ही कथा वाचल्यावर तुम्हाला सुद्धा तुमचा पहिला *Crush* आठवेल

किती छान नाव होत गुलाब, अगदी गुलाबाच्या फुला सारखी गोड मुलगी होती ती. ना चेहऱ्यावर कोणताच मेकअप ना केसात महागडा तेल, अगदी साधी सरळ आणि गोंडस होती ही गुलाब. तिचे डोळे खूप बोलके होते. पाहता पाहता वर्गात मुलांचा सुळसुळाट सुरू झाला. १७ मुळे हजर होती आणि दोन मुले आज गैरहजर होती. सर्वांनी नवीन शिक्षकांना म्हणजे मला वेगवेगळ्या झाडांची फळे तर कुणी फुले आणली होती. आजचा दिवस खूप छान गेला. नवीन मुलांसोबत ओळख आणि त्यासोबत गप्पा मारताना दिवस कधी संपला पत्ता सुद्धा लागला नाही.

सर्व मुलांना कुणाचे बाबा तर कुणाची आई तर काहींचे आणि आजोबा घ्यायला आले होते. पण गुलाब मात्र अजूनही आपल्या कुणाच्या ओळखीतल्या व्यक्तीच वाट पाहत होती. मी तिच्या जवळ गेलो आणि विचारलं “बाळा कोण येणार आहे तुला न्यायला की मी येऊ घरी सोडायला?” नको सर, येईल माझी आई, कितीही उशीर झाला तरी ती येणार नक्की. गुलाब.. अग ये गुलाब.. असा माझ्या कानी आवाज आला आणि मी मागे वळून पाहिले तर सुगंधा होती.

सुगंधा.. माझी सुगंधा. पाच वर्षांपूर्वी जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा हे गाव, इथले पूर्ण जंगल मला तिनेच तर दाखवले होते. माझ्यापेक्षा चार वर्ष लहान होती पण गोष्टी अशा काही करायची की मीच ऐकत राहायचो. तिला समोर पाहताच मी खूप खुश झालो. अरे सुगंधा, गुलाब तुझी मुलगी आहे? तेव्हाच तिच्या डोळ्यातील बोळकेपणा कुठेतरी पहिल्या सारखा वाटत होता. तिने हळूच माझ्याकडे पाहिले आणि होकारार्थी मान हलवली. काय करतात हीचे बाबा? गावातलेच आहेत का की बाजूच्या गावातले?

वीस वर्षांनी गावी गेले आणि पुन्हा एकदा त्याच जुन्या आठवणी डोक्यात घर करू लागल्या

तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हटलं तुम्ही आहात तिचे बाबा आणि एवढे बोलून निघून गेली. एक क्षण मला धक्काच बसला पण मन मात्र भूतकाळात रमून गेल्यावर आठवले. अनेक रात्री मी सुगंधा सोबत व्यतीत केल्या होत्या. माझ्यासाठी ती फक्त एक त्या वेळची सोबतीन होती पण असे काही असेल मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. पण सुगंधाने सुद्धा ही गोष्ट मला का नाही सांगितली? कदाचित तिलाही वाटले असेल मी तिला स्वीकारणार नाही. पण आता गुलाब माझी मुलगी आहे कळल्यावर मी काय करणार होतो. कारण शहरात सुद्धा आता मला दीड वर्षाची मुलगी आहे.

तुम्हाला काय वाटतं मित्रानो अशा परिस्थितीत कथेतील नायकाने काय केलं पाहिजे? तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Please follow and like us:

Related Articles

2 comments

माझी सावत्र आई » Readkatha July 3, 2020 - 5:42 pm

[…] त्या दिवसापासून मी तिला आई बोलायला लागलो जरी मला तिने जन्म दिला नसला तरी माझ्यासाठी ती एक आईच आहे. आपण हा विचार करतो की माझी दुसरी आई आहे. पण नात्याला नंबर देण्याचे काम सुद्धा आपणच देतो. पहिली किंवा दुसरी हे कोण ठरवतं? ते आपणच ठरवतो ना. मुळात नातं हे आपण अंगात मोजुच शकत नाही. कारण नातं हे फक्त नातं असतं. ही पण कथा वाचा तुमचा भूतकाळ कधी आणि कसा तुमच्या समोर … […]

Reply
पावसाळा आणि तिची आठवण » Readkatha July 6, 2020 - 5:33 pm

[…] त्या सरी पाहून मन पुन्हा एकदा भूतकाळात डोकाऊ पाहत होत. मागच्या वर्षी ह्याच […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल