Home कथा माझी सावत्र आई

माझी सावत्र आई

by Patiljee
4777 views

मी सध्या इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतो आहे. माझ्या आईला जाऊन जवळ जवळ दोन वर्ष झाली असावीत आणि माझ्या बाबांनी आज माझ्यासाठी नवीन आई आणली. खरतर ती माझ्यासाठी आई नव्हतीच कारण माझी आई ही मला जन्म देणारी, मला रात्री अंगाई गाऊन झोपवणारी, काही चुकले तर ओरडणारी माझ्या त्या आईची सर हिला तर कधीच येणार नाही. मला तर तिच्यापेक्षा जास्त माझ्या बाबांचा आज खूप राग आला होता. कारण त्यांनी माझ्यासाठी घरात नवीन व्याप आणून ठेवले होते.

मला माझ्या आईची कमतरता नक्कीच जाणवत होती. पण असं नाही ना की, माझ्या आईच्या जागेवर कोणालाही आई म्हणून हाक मारेल. माझे बाबा बोले की हिला आजपासून आईच बोल पण माझ्या तोंडातून आई तिच्यासाठी निघणे कठीण च होते. माझे बाबा लग्न झाल्या पासून अगदीच खुश होते. पण त्याचाही त्रास मला व्हायचा कारण ह्या अशा बायका कुठपर्यंत चांगल्या राहू शकतात ते ही मला माहीत होते.

क्षणिक सुख मिळवण्यासाठी लॉजवर जाता, मग वाचाच हे पूर्ण कथानक.

खरं तर आल्या दिवसापासून ती किती चांगली आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न करत होती आणि ते मला दिसत ही होत पण तरीही मला ती नकोच होती. कारण ती कितीही केलं तरी माझी सावत्र आई होती. माझ्या आवडी निवडीचा ती नेहमी विचार करायची. मला काय खायला आवडते हे बाबांना विचारून तिने जणू लिस्ट बनवली होती. पण मला हे काहीच नको होत. कारण ही माझी खरी आई कधीच होऊ शकत नव्हती.

माझे मित्र परिवार घरी आल्यावर त्याची आपुलकीने विचारपूस आणि त्यांच्यासाठी खायला बनवायची. तरीही मी कधी तिला प्रेमाने आई म्हणून हाक मारली नाही. कारण हिने किती माझ्यासाठी केले तरी ही माझी खरी आई नव्हती ना? माझा कपाट ही रोज नीट नेटका लावायची. कारण मी कधीच माझा कपाट नीट ठेवला नव्हता. माझी रूम ही अगदी व्यवस्थित लावायची पहिल्यांदा मला हे आवडले नव्हते तेव्हा मी तिला खूप बोललो होतो. पण तरीही ती तीच काम करायची.

सावत्र आई

अजूनही मला आठवतो आहे तो दिवस त्या दिवशी मी माझा मित्राच्या बर्थ डे पार्टीला गेलो होतो आणि रात्र असल्यामुळे मला दगड दिसला नाही आणि माझा अपघात झाला. माझा पाय आणि उजवा हात फ्रॅक्चर होता. त्या दिवशी मला माझी खरी आई मिळाली. खरी म्हणजे तीच आई पण तिची माया मला इतके दिवस कळलीच नाही. अपघात झाल्या दिवसापासून तिने माझी अंघोळ घालण्या पासून ते जेवण भरवण्यापर्यंत सर्व काही केले, अगदी माझ्या आई ने केले असते तसेच तिने केले माझ्यासाठी. मला तरी जन्म दिला नसला तरी तिची आईची माया खोलवर होती.

त्या दिवसापासून मी तिला आई बोलायला लागलो जरी मला तिने जन्म दिला नसला तरी माझ्यासाठी ती एक आईच आहे. आपण हा विचार करतो की माझी दुसरी आई आहे. पण नात्याला नंबर देण्याचे काम सुद्धा आपणच देतो. पहिली किंवा दुसरी हे कोण ठरवतं? ते आपणच ठरवतो ना. मुळात नातं हे आपण अंगात मोजुच शकत नाही. कारण नातं हे फक्त नातं असतं. ही पण कथा वाचा तुमचा भूतकाळ कधी आणि कसा तुमच्या समोर उभा राहील हे तुम्हीही सांगू शकत नाही

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Please follow and like us:

Related Articles

3 comments

Darshan Nate July 5, 2020 - 6:52 pm

Aai hi aai asate. Aatma ani Ishwar yanch ekroop mhanje Aai. Aplayala thech lagali kinva aplayala kahi lagal tari aapan Aai ashi haak marto mhanun jagat aaichi maya samajnyasathi Aai vhave lagate. Saglya goshti aapan aailach sangato kadhi kahi adchan ali tar aapan aailach adchanitun kasa marg kadhayacha he tich sangate mhanun Aai hi aapali Guru ahe mhanun kadhi aaicha niradaar karu naka karan aaila deleli jakham hi aaplya bhavishyachyat tyachi mothi jakham milel.

Reply
दिल बेचारा मध्ये संजना सांघीच्या आईचा हा अवतार तुम्ही पाहिला नसेल » Readkatha July 27, 2020 - 6:14 pm

[…] त्यांनी कधी कठोर तर कधी प्रेमळ आईची भूमिका साकारली आहे. पण त्यांचा हॉट […]

Reply
बाबा » Readkatha August 16, 2020 - 5:30 am

[…] माझी सावत्र आई […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल