Home हेल्थ मूळव्याध घरगुती उपाय

मूळव्याध घरगुती उपाय

by Patiljee
56753 views
मूळव्याध

मूळव्याध हा आजार बहुतेक लोकांमध्ये दिसून येतो. काहींना याचा त्रास कमी असतो तर काहींना सहन ही होत नाही इतका असतो. काहींना त्यातून रक्त जाते. मूळव्याधी होण्यामध्ये आपली अयोग्य खाण्याची पद्धत चुकीचा आहार जबाबदार असते. यात गुदद्वारच्या रक्त वाहिन्यांना आलेली सूज म्हणजे मूळव्याध तसेच गावठी भाषेत त्याला कोम म्हणतात.

हा एक गुदद्वार आजार आहे. मूळव्याध अशा ठिकाणी असल्यामुळे कधी कधी लोकांना डॉक्टर कडे जाण्यास ही लाज वाटते. त्यामुळे ते त्रास सहन करत राहतात. यासाठी आज आपण काही घरगुती उपचार पाहणार आहोत.

मूळव्याध घरगुती उपाय

मूळव्याध झाल्यावर त्यातून काही जणांना रक्त पडते, सौचाला बसल्यावर खूप त्रास होणे म्हणजे त्या ठिकाणी आग होने तसेच अतिशय वेदना होतात. तसेच त्या ठिकाणी सतत खाज येते, बसण्याचा त्रास होतो बसल्यावर आग होते, सौच्याच्या वेळेस फुगवटा बाहेर येतो. अशी काही लक्षणे ही मुळव्याध झालेल्याला दिसून येतात.

मूळव्याध

मुख्य कारणे काय आहेत हे तुम्हाला माहीत हवे त्यासाठी तुम्ही जास्त करून तेलकट, आणि अती तिखट खाणे सोडायला हवे.

अती जागरण करणे तसेच जेवणाच्या वेळा सतत बदलणे वेळेवर न जेवणे, नेहमी बाहेरचे मैद्याचे आणि तिखट तेलकट खाणे.

नेहमी बसून काम करणे, शरीराची हालचाल कमी करणे. तसे च नेहमी शीळे अन्न खाणे.

उपाय

पाहिले तर जिरे भाजून घ्या त्याची बारीक पावडर करा. ही पावडर एक चमचा पाण्यातून रोज रात्री झोपताना घ्या.

मुळा चांगला बारीक वाटून घ्या. त्यात थोड मध मिसळा याचे सेवन नियमित करा.

कांदा खाणे हे मूळव्याधीवर अत्यंत योग्य उपाय आहे. तसेच कांदा भाजा आणि त्याची पेस्ट बनवून ती त्या आलेल्या सूज वर लावा.

जेवणात बदल करा, भाज्या भरपूर खा, तसेच दूध आणि ब्राऊन राइसचे सेवन करा.

ज्या ठिकाणी सूज येऊन दुखत असेल तुम्हाला लगेच आराम हवा असेल तर त्या ठिकाणी बर्फाचा शेक द्या. बर्फ फडक्यात बांधून शेकवा.

कोरफडचा गर काढून तो त्या ठिकाणी लावावा. त्यासाठी कोरफडचे एक तरी झाड दाराशी हवे. तसेच लिंबाचा रस ही उपयोगी आहे पहिल्यांदा थोडी आग होते पण नंतर बरे वाटते.

जास्त रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आरोग्यविषयक हे आर्टिकल सुद्धा वाचा

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल