Home विचार मैत्री की प्रेम?

मैत्री की प्रेम?

by Patiljee
6232 views
मैत्री की प्रेम

तुमच्या सोबत सुद्धा कधी ना कधी असे झालेच असेल ना? आयुष्यात एक अशी मैत्रीण असते जिच्यावर आपण मनापासून प्रेम करतो पण कधी व्यक्त होऊ शकत नाही. ह्या चारोळी त्या सर्वांसाठी. मैत्री की प्रेम?

तुझ्या माझ्या नात्याला काय नाव देऊ समजेना?
मैत्री म्हटलं की प्रेम आड येते,
प्रेम म्हटलं की मैत्री आड येते,
कसा सोडवू हा तिढा, माझे मलाही कळेना.

पाटीलजी

कधीतरी वाटते सांगून मोकळे व्हावे तुला की तू फक्त माझी मैत्रिण नाहीस त्यापलीकडे ही काही तुझ्याबद्दल वाटतं, पण कदाचित तुझा चेहरा समोर आल्यावर माझे मन मलाच थांबवते की मनातले सांगितले काही तुला तर तू लांब तर नाही जाणार, एक चांगली मैत्रीण तर मी नाही गमावणार?

हे असे तुमच्याही मनात कधी ना कधी आलेच असेल ना? मग खरंच तुम्हीही तुमच्या मैत्रिणीवर मनापासून प्रेम केलं आहे. पण तुम्ही कधी व्यक्त नाही केलेत आणि आजही फक्त एकतर्फी प्रेम करत आहात? बरोबर ना? पण तुम्ही इथे चुकत आहात.

तुमच्या सारखा मी सुद्धा ह्याच परिस्थितीतून गेलो आहे पण वेळ गेल्यावर जेव्हा मला अक्कल आली तेव्हा मी माझ्या भावना व्यक्त केल्या. आणि माझे नशीब चांगले म्हणून आज ती माझ्यासोबत माझी हक्काची व्यक्ती बनली आहे. म्हणून मी तुम्हाला हे स्वअनुभवातून सांगत आहे.

तुमचं ही तुमच्या मैत्रिणीवर प्रेम असेल तर वेळ न दडवता विचारून टाका. कारण तुम्ही नेहमी असाच विचार करता की जर मी तिला माझ्या मनातली भावना सांगितल्या आणि तिला माझ्याबद्दल काहीच वाटतं नसेल तर मी आमची मैत्री खराब होईल. पण इथे तुम्हाला रिस्क घ्यावीच लागणार कारण ९०% अशा मुली असतात ज्या कधीच स्वतःहुन तुम्हाला प्रपोज करणार नाही.

मैत्री की प्रेम

तुम्ही तुमच्या मैत्रिणीला प्रेमाची कबुली दिली आणि तिने नकार दिला तर तुमची मैत्री नक्कीच काही दिवस खराब होईल. बोलणे बंद होईल, मेसेज बंद होतील, भेटणं बंद होईल पण हे फक्त काही दिवस असेल. जर तिचे तुमच्यावर प्रेम नसेल तर तिच्या निर्णयाचे स्वागत करून तुम्ही पुन्हा एकदा मैत्री करू शकता. पण हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.

पण ह्या उलट तुम्ही प्रपोज केलं आणि तिने होकार दिला तर तुम्ही खुश तर व्हाल पण स्वतःला येडे समजाल की मी आधी का नाही प्रपोज केलं? म्हणून मित्रानो अजूनही वेळ गेली नाहीये. तुमच्या मनातील ज्या काही भावना तुमच्या मित्र किंवा मैत्रिणी विषयी असतील तर आताच जाऊन व्यक्त करा. नाहीतर वेळ निघून गेल्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची जोडीदार होताना पाहणे, ह्यापेक्षा वाईट काही नसतं.

ह्या मराठी कथा पण वाचा.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल