Home कथा राक्षसी आत्मा

राक्षसी आत्मा

by Patiljee
1237 views

चहाचा वास रूममध्ये दरवळत होता. त्या वासेने झोपलेली श्रद्धा लगेच उठून बेडवर बसली. डोळे चोळत ती प्रश्न विचारली.

श्रद्धा -” गौरी … ४ वाजले का??”

गौरी दोन कप घेऊन किचन मधून बाहेर आली.

गौरी -” चहाच्या वासेने उठलीस ना?”

श्रद्धा -” अरे …चाय के लिये जान भी हाजिर है.”

गौरी -” पुरे पुरे… हे घे ..”

कप देत गौरी तिच्याजवळ बसली.

गौरी -” बाय द वे … ४:३० वाजले आहेत.”

श्रद्धा -” काय??”

हे ऐकताच श्रद्धा गडबडीत चहाचा एक घोट घेतली.

श्रद्धा -” आऊच…”

गौरी -” हळू हळू…. तोंड जळल ना??”

श्रद्धा -” होय… तुला लवकर उठवता येत नाही .”

गौरी -” तुला कित्येकदा उठवले . उठवताना उठली अशी श्रध्दा कसली…”

श्रद्धा –

गौरी चिडवत श्रद्धाला म्हणाली.

गौरी -” पण तू आता उठवायला का सांगितली होतीस ?”

श्रद्धा चहाची शेवटची घोट घेत म्हणाली.

श्रद्धा -” अग आज स्पेशल रिपोर्ट तयार करायचं आहे चॅनलसाठी ??”

गौरी -” कसलं स्पेशल ??”

श्रद्धा -” तू प्रतीक शेलारच नाव ऐकलीस??”

गौरी -” कुठ तर ऐकल आहे .

श्रद्धा – ” अग.. तो आपल्या देशातला वन ऑफ द बेस्ट परानोर्मल एक्स्पर्ट आहे .”

गौरी -” हो… टाइम्स ऑफ इंडियामध्येही त्यांचं नाव आलेलं होत .”

श्रद्धा -” ह्मम..”

श्रद्धा आवरायला उठली. कपडे बदलायला ती बाथरूममध्ये गेली .

गौरी -” परानोर्मल एक्स्पर्ट म्हणजे तेच ना ग.. म्हणजे आत्म्याला शोधायचं काम ..”

श्रद्धा – ” तस म्हणू शकतेस..”

श्रद्धा बाथरूमच्या आतून म्हणाली.

गौरी -” पण त्यांच्याशी तुझ काय काम आहे?”

श्रद्धा आवरून बाहेर येत म्हणाली.

श्रद्धा – ” अग …ते त्यांचं रिसर्च करायला हायवेच्या कडेचा जंगलामधील घरांमध्ये जाणार आहेत. मग मलासुद्धा त्यांच्यासोबत जाण्याची संधी भेटली.”

गौरी -” अच्छा … मग तू काय करणार आहेस तिथे??”

श्रद्धा -” ते त्यांचे रिसर्च करतील आणि ते करत असताना मी त्यांचं इंटरव्ह्यू घेईन. “

गौरी -” म्हणजे तू रात्री इंटरव्ह्यू घेणार ?”

श्रद्धा -” होय… इंटरव्ह्यू सक्सेस झालं की बघ चॅनलची टी. आर.पी कशी फाडेल.”

गौरी -” तुला भीती नाही का वाटणार?”

श्रद्धा -” आता एवढ्या जॉबसाठी चालेल ना..”

श्रद्धा डोळे मारत म्हणाली.

गौरी -” पण ते कसले रिसर्च करणार आहेत?”

श्रद्धा -” ते आत्मा आहे का नाही हे सायंटिफिक कन्सेप्टनुसार एक्सप्लेन करणार आहेत …”

गौरी -” पण काळजी घे … रात्र असणार आहे खूप बाहेर आणि थंडीसुद्धा खूप लागेल. स्वेटर वैगरे घेऊन जा… फोन लावत जा तासातासाला … “

श्रद्धा तुला मध्येच अडवत म्हणाली.

श्रद्धा – ” होय ग माझी आई… आता जाऊदेत का??”

 गौरी आणि श्रद्धा तशे रूममेट्स होते. गौरी तशी श्रध्दा पेक्षा वयाने मोठीच होती आणि खूपच जवळची मैत्रीणसुद्धा होती. श्रद्धा एका न्यूज चॅनल्ससाठी जर्नालिझम करत होती आणि गौरी इंजिनिअर होती. 

 श्रद्धा कॅमेरा आणि बाकीचे सामान घेऊन स्कूटीवर निघाली. ऑफिसमध्ये पोहचताच ती एडिटरला सगळी कल्पना देऊन ती हाइवेच्या दिशेने निघाली. 

 ठरलेल्या ठिकाणी पोहचायला तिला संध्याकाळचे सात वाजले. तिकडे पोहचली खरी पण प्रतीक अजुन आलेला नव्हता. फोन करण्यासाठी ती पर्सेमधून मोबाईल काढली खरी , पण नेटवर्क येत नव्हता. काहीशी नाराजीने ती मोबाईल पर्सेमध्ये ठेवली. 

हायवेच्या साइडला ती स्कूटीवर बसून ती वाट बघू लागली. वाहनाची दरवळ आता कमी झालेली होती. या ठिकाणी कोणी जास्त ये जा करत नव्हते. ती एकटीच तिथे वाट बघत होती. आता तिला भीती वाटू लागली होती. इतक्यात दुरून एक जीप येताना दिसली. ती जीप जवळ येताच तिला कळाल की प्रतीक त्याच जीपमध्ये बसला होता. वेळ पाहण्यासाठी ती मोबाईल काढली तर तीच स्क्रीन ब्लफ करू लागलं होतं . नेटवर्क अजुन आलेली नव्हती. जीप तिच्याजवळ येऊन थांबली. त्यामधून प्रतीक खाली उतरला. 

प्रतीक -” यू मिस श्रद्धा ??”

श्रद्धा -” येस… आय एम श्रद्धा “

ती हात पुढे करत म्हणाली. तो सुद्धा शेकहॅण्ड करत म्हणाला.

प्रतीक -” हाय… आय एम प्रतीक..”

श्रद्धा -” माहिती आहे..”

ती स्माइल करत म्हणाली.

प्रतीक -” सॉरी… तुम्हाला वाट पहावा लागला. “

श्रद्धा -” इट्स ओके..”

प्रतीक -” सो… आर यू रेडी?”

श्रद्धा – ” येस सर…”

प्रतीक -” ओके. एक काम करा . स्कूटी इथेच असुदेत , तुम्ही जीपमधून स्पोटवर चला. “

श्रद्धा -” इथे कोण येणार नाही ना?”

प्रतीक हसत म्हणाला.

प्रतीक -” इथे आता कोणी नाही येणार मिस श्रद्धा…”

तिला हे वाक्य जरा वेगळच भासल.

श्रद्धा -‘ म्हणजे?”

प्रतीक -” म्हणजे हे स्पॉट आता हांटेड आहे मिस श्रद्धा. त्यामुळे इथे कोण नाही येत.”

श्रद्धा -” ओ..”

श्रद्धा जीपमध्ये बसली . आतमध्ये अजुन एक जण होता.प्रतीक त्याची ओळख ओळख करून दिला.

प्रतीक -” मिस श्रद्धा.. हा जॉर्डन आहे. तो पण माझ्यासोबत रिसर्च करणार आहे.”

 श्रद्धा त्याला बघून हाय म्हणाली. तो फक्त एक स्माइल दिला . जीप हायवेवरून आता जंगलात शिरू लागली होती. रातकिड्यांचा आवाज आता मोठा गेला. थंडी वाढत जात होती. थोड्यावेळाने काही पडीक घर दिसू लागले. खूप अशे विटा आणि दगड इकडे तिकडे विखुरले होते. एका मोकळ्या जागी जीप थांबली. 

 श्रद्धा आपली सगळ सामान घेऊन बाहेर आली. प्रतीक आणि त्याचा साथीदार पण सर्वकाही सामान घेऊन बाहेर आला. 

श्रद्धा -” सो.. कुठ आहे तुमचा रिसर्च स्पॉट ?”

प्रतीक -” ते तिथे?”

 त्या दिशेनी श्रद्धा बघितली तर तिथे एक पडीक घर होत . त्या घराकडे बघताच श्रद्धाला भीती वाटायला सुरुवात झाली होती. 

श्रद्धा -” एवढं अंधार??”

प्रतीक -” रात्री अंधारच असते मिस श्रद्धा ..”

श्रद्धा -” ओके… इंटरव्ह्यू चालू करायचं ?”

प्रतीक -” हो… आम्ही आमचं काम करतो . ते करतानाच तुम्हाला इंटरव्ह्यू देतो. तुम्ही नाईट व्हिजन कॅमेरा आणलात ना?”

श्रद्धा – ” हो… सगळी व्यवस्था आहे माझ्याकडे..”

प्रतीक -” ओके … चालू करा.”

 श्रद्धा माईक आणि कॅमेरा चालू केली . कॅमेरा हातात घेऊन ती प्रतिकच्या मागे जाऊ लागली. प्रतीक आणि जॉर्डन त्यांचे मशिन्स सेट करू लागले. 

 श्रद्धा हातातून तिच्याकडे वळवून म्हणू लागली. 

श्रद्धा -” नमस्कार प्रेक्षक हो… तुम्ही पाहताय *** चॅनल आणि आता मी या इथे प्रतीक शेलार यांच्यासोबत आहे. हो.. हे तेच प्रतीक शेलार आहेत , जे आत्मा आणि सायन्स यांच्यातील फरक कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण एक अख्खी रात्र त्यांच्यासोबत घालवणार आहोत. त्यांच्यासोबत आपण त्यांचं या रिसर्चबद्दल बोलणार आहोत. “

प्रतीक सगळे एक्विपमेंट ( मशिन्स ) सेट करत होता. श्रध्दा त्याच्याकडे वळून म्हणाली.

श्रद्धा -” तर सर… सर्वात आधी आम्हाला सांगा की एवढ्या अंधारात तुम्हाला भीती नाही का वाटत?”

प्रतीककडे माईक येताच तो म्हणाला.

प्रतीक – ” पहिल्या रिसर्चसाठी मी जेंव्हा गेलो होतो. तेंव्हा एकदा भीती वाटली. पण त्यानंतर सवय होऊन गेली. “

श्रद्धा -” अच्छा … तर मग तुम्ही आम्हाला या मशिन्सबद्दल सांगता का?”

तिथे ३ मशिन्स होते.

प्रतीक -” नक्की.. हे आहे डिजिटल थर्मामीटर .”

श्रद्धा -” थर्मामीटर म्हणजे मला कळलं नाही … इथे कशासाठी लागेल थर्मामीटर??”

प्रतीक -” त्यासाठी तुम्हाला मी आत्मा म्हणजे काय हे सांगावं लागेल. “

श्रद्धा कॅमेरा आणि माईक व्यवस्थितपणे सांभाळत ऐकू लागली .

प्रतीक -” आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरात खूपशी एनर्जी आहे आणि जेंव्हा मरतो तेंव्हा ती एनर्जी काही प्रमाणात एका अनोळखी एनर्जी मध्ये रुपांतर होते. तुम्हाला ते लॉ माहितीच असेल की , ‘ Energy neither be created nor be destroyed , but it can transfer to one medium to another .’ यानुसार आत्मा म्हणजे एनर्जी . “

श्रद्धा स्वतःकडे माईक घेत म्हणाली.

श्रद्धा -” मग थर्मामीटर कशाला ?”

प्रतीक -” आत्मा किंवा स्पिरीट ही एनर्जी असली तरी खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे त्याला आपण अंधारातच अनभवू शकतो. ती एनर्जी वातावरणमधील एनर्जी काहीप्रमाणात शोषून घेत असते. त्यामुळे वातावरणातील तापमान काहीप्रमाणात खाली येते. त्या खाली येणार्या तापमानाला मोजायला आपण हा थर्मामीटर वापरणार आहोत आणि ही यंत्र खूप ॲक्कुरेट आहे. त्यामुळे आत्मा इथे आहे का नाही हे कळते .”

श्रद्धा -” अच्छा … अजुन तुमच्याकडे दोन मशिन्स आहेत . त्या बद्दल जरा सांगा .”

श्रद्धा त्याच्याकडे माईक धरत ऐकू लागली.

प्रतीक -” ही मशीन विशिष्ट फ्रिक्वेन्सी ओळखते . काही फरक जाणवला तर ती आपल्याला सतर्क करते आणि ही जी मशीन आहे , यानुसार आपण त्या एनर्जी शी संवाद साधू शकतो. दुसरी मशीन सर्वांकडे नसते. बाकीचे तुम्ही बाजारात तुम्ही घेऊ शकता .”

श्रद्धा -” म्हणजे दुसऱ्या मशीन मुळे आपल्याला आत्म्याशी संवाद साधतो??.. ते कसे?”

प्रतीक -” हो.. आम्ही जे काही प्रश्न त्या आत्म्याला विचारतो . ती एनर्जी या मशीनमधली लाईट जाळतो. मग आम्हाला कळत की ती एनर्जी काय म्हणत आहे. आम्ही प्रश्न असेच विचारतो की त्याच उत्तर फक्त हा किंवा नाही या स्वरूपाचे असेल. “

श्रद्धा -” ओ… ही एक्सपलाईनेशन बघून मला आता संवाद बघायचा आहे. चालू करायचं ?”

प्रतीक – ” हो… सगळी मशिन्स रेडी आहेत. फक्त आता तापमान कधी खाली कोसळतो त्याची वाट बघायची. “

 श्रद्धा कॅमेरा तशीच ऑन ठेवून प्रतीक आणि जॉर्डनसोबत वाट पाहत उभी होती. जॉर्डन डिजिटल थर्मामीटर मध्ये सतत तापमान चेक करत होता. 

 रात्रीचे १ वाजू लागले होते. अचानक सर्वांना थंडी वाजू लागली. जॉर्डन थर्मामीटर बघत प्रतिकला म्हणाला. 

जॉर्डन – ” Buddy… It’s 7 degree .”

प्रतीक -” ओके…”

श्रद्धा – ” म्हणजे?”

प्रतीक -” आता कदाचित इथे स्पिरीट आहे .”

श्रद्धा -” मग आता ?”

प्रतीक – ” आता आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात.”

श्रद्धा – ” ओके….”

 श्रद्धा कॅमेरा सेट केली. प्रतीक एक मशीन त्या पडीक घरात ठेवला आणि सगळे बाहेर आले. जेणेकरून फक्त मशीन त्यांना दिसावी. 

प्रतीक -” इथे कोण आहे का ??”

श्रद्धा त्याच्याकडे आश्चर्याने प्रतीककडे बघू लागली.

प्रतिक -” जर कोणी असेल तर संकेत द्या.”

सगळे त्या मशीनकडे लक्ष देत होते. श्रद्धा कॅमेरा स्वतःकडे घेत त्या मशीनवर फोकस केली.

प्रतीक -” कोणी असेल तर संकेत द्या.”

 तेवढ्यात त्या मशीन ची बल्ब जळाली. ते बघून श्रद्धाला आश्चर्य वाटलं. ती तशीच कॅमेरा धरून होती. 

प्रतीक -” जॉर्डन… चेक द फ्रिक्वेन्सी .”

जॉर्डन-” Yeah… It’s a spirit.”

प्रतीक -” ओके… “

प्रतीक अजुन प्रश्न बोलू लागला.

प्रतीक -” जे कोणी आहे . ते इथे राहत होता का?”

परत त्या मशीनची लाईट जळाली.

प्रतीक -” तुम्ही इथे फ्री आत्मा आहात का?”

त्यावर ती बल्ब जळाली नाही. थोडा वेळ वाट पाहून परत प्रतीक म्हणाला.

प्रतीक -” तुम्ही इथे फ्री आत्मा आहात का?”

तरीही बल्ब जळाली नव्हती.

प्रतीक – ” तुमच्यावर कुणाचातरी आदेश चालतो का?”

हा प्रश्न केल्यावर ती बल्ब लगेचच जळाली. हे बघून प्रतीकच्या तोंडावर थोडी भीती दिसू लागली होती. हे श्रद्धाला वेगळच वाटलं. 

श्रद्धा -” काही झालं का?”

कॅमेरा त्याच्याकडं करत ती म्हणाली.

प्रतीक -” एका आत्म्यावर आदेश चालणं , हे आपल्यासाठी चांगलं नाही. “

श्रद्धा -” का ?”

प्रतीक -” एका आत्म्यावर आदेश फक्त डेमन्स करत असतात. म्हणजे राक्षस आत्मा.”

श्रद्धा -” ते सुद्धा असतात?”

प्रतीक -” हो… आणि ते ओळखण सोप नसत . कारण शेकडोच्या वर तशे आत्मे असतात. ते इतकी निगेटिव्ह एनर्जी असती , की आपल्याला जीवाची दक्षता घ्यावे लागते.”

एवढं बोलून प्रतीक जॉर्डनला परिस्तिथीची जाणीव करून दिली. तोसुद्धा आता घाबरलेला होता . ते बघून श्रद्धाच हृदय मोठमोठ्याने धडकू लागलं. गौरीला फोन करावं म्हणल की नेटवर्क नव्हती.

तेवढ्यात सगळ्यांना पेट्रोलच वास येऊ लागलं. श्रद्धा लगेचच म्हणाली. 

श्रद्धा -” पेट्रोलच वास येऊ लागलंय.”

 प्रतीक आणि जॉर्डन एकदम जीपच्या दिशेनी धावू लागले. त्यांच्यामागे श्रद्धासुद्धा पळू लागली. तीच कॅमेरा अजुन चालूच होता. तिथे पोहचताच त्या जीपला अचानक आग लागली. प्रतीक डोक्यावर हात ठेवत फक्त बघत उभा होता. 

जॉर्डन -” Now we are all gone .”

त्याच हे बोलण ऐकुन श्रद्धा म्हणाली.

श्रद्धा -” म्हणजे ?”

प्रतीक -” आपण आता गेलो..”

श्रद्धा -” अर्थ नाही विचारले . “

प्रतीक घाबरत म्हणाला.

प्रतीक -” डेमन्स जे असतात . त्यांना आणखीन आत्मा हवे असतात. आता आपण इथे फसलो , तर ती आपल्याला मारण्यासाठी काहीसुद्धा करू शकतो.”

श्रद्धा पूर्णपणे घाबरली होती.

श्रद्धा -” मग आता?”

प्रतीक -” आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवं. “

 श्रद्धा तीच बाकीचं सामान घेऊन तयार झाली. प्रतीक आणि जॉर्डन ही तयार झाले आणि गडबडीत ते जंगलातून बाहेर जाऊ लागले. झाडाझुडपातून कशी तरी वाट काढत ते पुढे जाऊ लागले. त्यांचा आधार आता फक्त टॉर्च आणि कॅमेराची उरलेली फोकस लाईटच होती. 

टॉर्चच्या जेमतेम प्रकाशामधून ते वाट काढत होते. जात असतानाच मधेच कोणीतरी पाठी लागल्याचा अंदाच श्रद्धाला झाला. ती मागे वळली , तर तिथे कोणीच नव्हतं. ती तिथेच उभी पाहल्यावर प्रतीक तिला उदेशून म्हणाला. 

प्रतीक -” मिस श्रद्धा… ती डेमोनिक एनर्जी आहे. ती स्वतःकडे ओढण्यासाठी काहीही करत. तू लक्ष देऊ नकोस . चल इथून.”

 तेवढ ऐकुन ती परत त्यांच्यामागे जाऊ लागली. पाऊले आता थकत होतीत , पोटात कावळे ओरडत असताना ते चालत जात होते. दूर कुठेतरी कोल्हे ओरडत होते. त्या रात्रीच्या वेळी ते खूप भयानक वाटत होत .

 सगळे थकत आले होते . म्हणून हळूहळू जात होते. अचानक जात असताना जॉर्डन एका जागी स्तब्ध थांबला. त्याला बघून दोघेही आश्चर्याने हळूहळू पुढे सरकले. अचानक जॉर्डन वेगाने पळू लागतो. प्रतीक आणि श्रद्धा दोघेही त्याच्या मागे पळत सुटतात. जॉर्डन खूप वेगाने पळत पुढे गेला होता. त्याच्या मागे जाता जाता दोघेही थकले होते. प्रतीक त्याच नाव घेत ओरडतो . कुठूनही काहीही रिप्लाय येत नाही. तसेच ओरडत ते पुढे जातात. 

 असेच पुढे जाताच त्यांना काही हालचालींचे आवाज ऐकू आले. ते वारंवार आवाजाच्या ठिकाणी बघत असले तरी त्यांना काही दिसत नव्हतं. अचानक श्रद्धाच्या हातातील कॅमेराची फोकस लाईट बंद चालू होऊ लागली. ते पाहून श्रध्दा लगेच त्याला मारून चालू करण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली. शेवटी ती लाईट बंद झाली. सगळीकडे अंधकार पसरली होती. रातकिड्यांचा आवाज सगळीकडे घुमू लागला. पुढचं काहीच दिसेनासं झालं. 

 इतक्यात कुणाचातरी हसण्याचा आवाज घुमू लागला. श्रद्धाच पूर्ण शरीर घामाने भरल होत. 

प्रतीक -” श्रद्धा .. जागेवरून हलू नकोस.”

श्रद्धा -” हो..”

 तरीही ती फोकस लाईटला मारून चालू करण्याचा प्रयत्न करू लागली. जितकी जोरात ती मारत होती. तितकी जोरात हसण्याचा आवाज वाढत होता. अचानक ती फोकस लाईट जळू लागली. पुढच दृश्य बघून दोघांना धडकी भरली. पुढे जॉर्डन हसत हसत त्याच्याकडील चाकूने स्वतःची मांडीचा मास काढून खात होता. ते बघून श्रद्धा जोरात ओरडली. प्रतीक जोराने ओरडू लागला. 

प्रतीक -” जॉर्डन .. जॉर्डन..”

तरीही त्याला काही फरक पडत नव्हता. श्रद्धा तशीच घाबरून थांबली होती. तिचे हात पाय थरथरत होते.

प्रतीक -” श्रद्धा… तो आता पॉसेस झाला आहे. त्याला इथेच सोडून आपल्याला जायला हवं.”

 ती फक्त ऐकत होती आणि होकारार्थी मान हलवली. प्रतिक पळत सुटला . त्याच्या मागोमाग श्रद्धासुद्धा पळत सुटली. 

 वेगाने दोघेही पळत सुटले. तेवढ्यात आकाशात शेकडो कावळे ओरडत होते . तरीही दोघेही पळत सुटले. त्यांच्या मागे काही कावळे लागले आणि त्यांच्यावर वार करू लागले. तरीही ते दोघे पळत सुटले. काही क्षणात एक मोठा आवाज कुठून तरी आला आणि त्याच क्षणी सगळे कावळे मारून पडू लागले. सगळीकडे कावळेच पडू लागले.

 पळत पळत ते दोघं एका मोकळ्या जागी आले. मग दोघे थोडा आराम म्हणून थांबले. आत सगळीकडे शांत वातावरण झालं होत. 

 त्याच वेळी प्रतीक काहीतरी पुटपुटू लागला. काही मंत्र तो म्हणत होता. श्रद्धा त्याच्यामागे जाऊन प्रतीक म्हणून हाक मारू लागली. तरीही मंत्र चालूच होते. जस तो मागे वळला. त्याच्या तोंडावर वार झाले होते. त्यातून रक्त खाली पडत होता. तो तरीही मोठीशी हसणारी तोंड करून मंत्र म्हणत होता. तो श्रध्दा कडे जात होता. श्रद्धा मात्र मागे जाऊ लागली. कॅमेरा आणि फोकस चालूच होती. मागे जाता जाता श्रद्धा खाली पडली. तो तसाच पुढे येऊ लागला होता. श्रद्धा एकदमच ओरडू लागली. तेवढ्यात तिची फोकस लाईट बंद चालू होऊ लागली. ती फोकसला मारू लागली. तो तसा पुढे येऊच लागला. एकदम ती लाईट बंद झाली. ते बघून एकदमच प्रतीक हसला. श्रद्धा मोठ्याने ओरडली. ती इतकी जोरात ओरडली की ती बेशुध्द झाली. 

   जेंव्हा तिचे डोळे उघडले . तेंव्हा तिला एक फॅन तिच्यावर फिरत असलेला पाहत ती एकदमच उठली. ती हॉस्पिटल मध्ये होती. तिच्याजवळ गौरी बसलेली होती. 

गौरी -” अग उठली.. देवाची कृपा… तू हायवेच्या कडेला पडली होतीस. कोणीतरी तुला बघून थेट इथे आणले. मग मला फोन लावून इथे बोलावले. “

श्रध्दाला काय चाललंय हे कळत नव्हतं.

गौरी -” काल कुठे होतीस ??”

श्रद्धा -” काल… काल मी प्रतीक सोबत होते. तो कसा आहे ??.. कुठे आहे ??”

ती अढकळत म्हणू लागली.

गौरी -” अग काय म्हणतेस तू… कालच सकाळी प्रतीक शेलार अपघातात मरण पावला.”

श्रद्धा शॉक मध्ये म्हणाली.

श्रद्धा -” काय??”

गौरी -” हे बघ.”

ती वर्तमानपत्र श्रद्धाला दिली. त्यातली माहिती वाचताच तिला अजुन एक शॉक बसला.

श्रद्धा -” मग मी काल कुणासोबत होते??

गौरी -” तेच विचारत होते मी..”

श्रद्धा बाजूला असलेली कॅमेरा बघितली. त्यातली व्हिडिओ बघू लागली.

 त्यात फक्त ती आणि जॉर्डन दिसत होता . बाकी कोणीही दिसत नव्हत. फक्त ती आणि जॉर्डन... मग प्रतीक कुठे गेला??

 मग तिला कळून चुकलं की तो बाकी दुसरा तिसरा कोणी नसून तो राक्षसी आत्मा होता. ती चकित होऊन गौरीला बघितली आणि तिला घट्ट मिठी मारली.

समाप्त

ह्या पण कथा वाचा.

लेखक – ऋषिकेश मठपती

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

हा भाग छान वाटलं असेल , तर शेअर करा… धन्यवाद …

Please follow and like us:

Related Articles

1 comment

लॉक डाऊन मधली ती भयाण रात्र » Readkatha September 27, 2021 - 10:10 am

[…] राक्षसी आत्मा […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल