माझे घटस्फोट होऊन आज दोन वर्ष तरी झाले असतील. लग्न तसे अरेंज मॅरेज होते पण इतर मुलीनं प्रमाणे मी सुद्धा भावी संसाराचे खूप सारी स्वप्न पाहिली होती. नव्याचे नव दिवस म्हणतात तसे काहीसे काही दिवस चांगले गेले. आम्ही छान महाबळेश्वरला फिरायला गेलो, चार दिवस तिथेच वस्ती केली. पहिल्याच रात्री नवऱ्याने माझ्यासमोर कबुल केलं होतं की मला रोज थोडी तरी घ्यावी लागते नाहीतर झोप येत नाही.
लग्ना अगोदर आम्हाला असे सांगण्यात आले होते की मुलगा निर्व्यसनी आहे पण स्वतः नवऱ्याने हे कबुल केलं म्हणून मला जास्त राग आला नाही. पहिल्याच रात्रीपासून ते व्यसन करतात हे मला कळून चुकले होते. एका प्रायव्हेट कंपनी मध्ये ते कार्यरत होते. तिन शिफ्ट मध्ये काम करायचे. पण सेकंड शिफ्ट असली की खूप त्रास व्हायचा त्यांना आणि मलाही कारण कंपनी पासून आमचे घर दोन तास लांब होते. मग त्यांना घरी यायला रात्रीचे एक ते दीड वाजायचे.
पण मी देखील हा त्रास हसत मुखाने सहन करत होते कारण घरात बोलणारे कुणीच नव्हतं. माझे सासू सासरे गावी राहत होते. त्यामुळे इथे फक्त आमच्या राजा राणीचा संसार सुरू होता. काही महिने छान मस्त गेले पण नंतर मात्र माझ्या नवऱ्याने त्याचे गुण दाखवायला सुरुवात केली. घरी खूपच उशिरा दारू पिऊन येणे. कितीही उशिरा आला आणि माझी तयारी असली किंवा नसली तरी पिसाटलेल्या कुत्र्यासारखे माझ्या शरीराचे लचके तोडणे. हे सर्व करताना त्यात प्रेम कमी आणि वासना जास्त होती.
ही कथा सुद्धा वाचू शकता
मारून झोडून हे सर्व करणे कितपत योग्य होते ह्याचे उत्तर मला आजही कळले नाही. त्या व्हिडियो पाहून तसेच प्रकार आपल्या पत्नी सोबत करणे ह्यावरून तो किती नराधम होता हे मला कळून चुकले होते. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एक दिवस त्याने रात्री त्याच्या मित्राला घरी बोलावले. दोघांनी सोबत मद्यपान घेतल्या नंतर त्याच्या मित्राने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. मी खूप विरोध केला पण लाजीरवाणी गोष्ट की माझ्या नवऱ्याने सुद्धा त्याला ह्यात मदत केली.
ती रात्र मी कशी काढली ह्याचे उत्तर कुणीही देऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी नवरा कामावर गेल्यानंतर हाताला लागेल ते सामान घेऊन मी माझे माहेर गाठले. आई बाबांनी घडलेला प्रकार सांगितला पण त्यांनी माझे काहीही ऐकले नाही. त्यांच्या मते नवरा बायको मध्ये असे वाद होत असतात. काही महिन्यांनी सर्व ठीक होईल तू परत सासरी जा तुझ्या, चार महिन्यांनी मुलगी परत नवऱ्याला सोडून माहेरी आले असे लोकांना कळले तर शेजारी पाजारी, नातेवाईक आमच्याकडे पाहून हसतील. काय किंमत राहील मग आपली समाजात?
त्याने हे बोलणे ऐकून मला त्यांचा सुद्धा तिरस्कार व्हायला सुरुवात झाली. स्वतःच्या मुली सोबत काय घडल हे माहीत असून सुद्धा त्यांना समाज काय म्हणेल ह्याची चिंता जास्त आहे, मग अशा ठिकाणी राहून माझा काहीच फायदा नाहीये, परत त्या नाराधमाकडे गेले तर माझे आयुष्य नर्क करून टाकेल तो. म्हणून मी माझा निर्णय स्वतः घेतला. पुण्याला जाऊन एकटीच स्थायिक झाली. जास्त शिक्षण नसल्याने नोकरी चांगली मिळणे कठीण होत म्हणून लोकांच्या घरात धूनी भांडी करून स्वतःला सावरले.
आज ह्या गोष्टीला दोन वर्ष झाली आहेत. जे काही आहे ते माझे स्वतःचे आहे. आणि माझ्या ह्या एकटीच्या आयुष्यात मी खूप जास्त सुखी आहे. माझा नवरा आणि आई बाबा आणि नातेवाईक ह्या सर्वांशी संबंध तोडून स्वतंत्र जीवन जगत आहे. इथे आजूबाजूला मिळालेलं शेजारी झालेल्या मैत्रिणी नेहमी म्हणतात की अजून तुझे वय झाले नाहीये पुन्हा एकदा लग्नाचा विचार कर पण एवढं सर्व झाले असताना पुन्हा लग्नाचा विचार करणे म्हणजे जळत्या आगीत उडी मारण्यासारखे आहे. कधी कधी मनात असा विचार असतो की प्रत्येक महिलेचे लग्नानंतरचे आयुष्य असेच असेल का?
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)
2 comments
[…] हे सुद्धा वाचा लग्नानंतरचे आयुष्य (Life after marriage) […]
[…] लग्नानंतरचे आयुष्य […]