लसुण रोजच्या फोडणीला हवाच. याचा वासाने चार घास जास्त जातात. भाजी असो किंवा मटण मच्छी प्रत्येक पदार्थासाठी लसणाची फोडणी द्यायलाच हवी. याला एक विशिष्ठ वास असतो. खर तर लसूण कच्चा खायला सर्वानाच आवडत नाही कारण हा कच्चा खायला इतका तिखट असतो आणि त्याचा उग्र वास संपूर्ण तोंडात पसरतो तो लवकर जात नाही, तोंड भाजते.
महत्वाचे म्हणजे काय तर याची कच्ची चव तशी कोणाला आवडत नाही. पण भाजीमध्ये टाकलेले लसूण सर्वांना आवडतो. ज्यांना कच्चा खायला आवडतं नाही त्यांनी भाजून किंवा थोड्याशा तेलात तळून खा. चला तर बघुया आज लसूण खाण्याचे फायदे
लसूण खाण्याचे फायदे
लसुण खाण्याने तुमच हृदय निरोगी राहते. त्यासाठी सकाळी उठल्यावर दोन पाकळ्या लसूण खा. यामुळे तुमचं कॉलेस्ट्रॉल ही नियंत्रणात राहते. शिवाय रक्ताच्या गाठी होत नाही त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
लसणाची एक पाकळी रोज खाणे आपल्याला मिळतात अ, ब आणि क जीवनस्त्व. जे आपल्या शरीरातील आवश्यक आहेत. तसेच आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे गुणधर्म ही मुबलक प्रमाणत असतात.
लसुणच्या सेवनाने तुमच्या रक्तात असणारे इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुमची साखर आटोक्यात राहायला मदत होते.

लसणाचा काढा सर्दी आणि खोकल्यावर अत्यंत गुणकारी आहे.
लसणाचे नियमित सेवन करा यामुळे कर्करोगाच्या आजाराचा धोका टळतो.
सिरोसियसच्या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो शिवाय समस्या दूर होते.
लसुण खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून आपले रक्षण होते.
लहान बाळांना सर्दी खोकला झाला असेल तर अशा वेळी लसुनाच्या माळा ओवून त्या गळ्यात आणि हातात बांधाव्यात.
लसूण मध्ये लोह. मुबलक प्रमाणात असते त्यामुळे टाकायची कमतरता भरून निघते.
आरोग्याविषयी हे आर्टिकल सुद्धा वाचा.
- मोड आलेले हरभरे खाल्ल्याने कोणकोणते फायदे आहेत बघा
- नाचणी खाल्ल्याने मिळतात आपल्या शरीराला मुबलक फायदे. वाचा
- कडीपत्ता ताटातून जेवताना बाजूला काढला जातो पण बघा तो खाल्याने काय फायदे मिळतात