लिंबू तसे म्हणायला गेलात तर एक फळ आहे. पण याचे उपयोग आपण सरबत करण्यासाठी शिवाय जेवणाची चव वाढवण्यासाठी करतोच. आजारामध्ये तोंडाला चव राहिलेली नसते. तेव्हा लिंबाचा वापर करून आपण दोन घास जास्त खाऊ शकतो. लिंबू चाटल्याने तोंडाला चव येते.
थकवा आल्यास लिंबू सरबत सेवन करणे उत्तम तसेच लिंबाचे लोणचे ही बहुतेक लोकांना आवडते. लिंबाची एक तरी फोड जेवणाच्या ताटात असायला हवी त्याच्यामुळे मिळतात तुमच्या शरीराला भरपूर फायदे पहा.
लिंबू खाण्याचे फायदे
पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लिंबामध्ये भरपूर प्रमाणत सी जीवनसत्व असतात. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि सध्याच्या काळात प्रतिकार शक्ती वाढणे खूप महत्त्वाचे आहे.

लिंबाचा रसने खाल्लेले अन्न पचायला लागते आणि सौचांस ही साफ होते.
तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर अशा वेळी सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्या. चरबी हळूहळू वितलायला सुरुवात होते.
तुमच्या अंगाला काही कारणाने खाज सुटली असेल तर अशा वेळेस खोबरेल तेल मध्ये थोड लिंबू पिळून मिश्रण तेथे चोळावे आणि गरम पाण्याने अंघोळ करावी
उलटी सारखे होत असेल तर लिंबाची फोड चाटत बसा.
अजीर्ण झाले असेल तर यावर ही लिंबू रस पिणे उत्तम आहे.
पित्त झाले असल्यास रोज लिंबाचा रस करून प्या.
डोक्यात खरपा झाला असल्यास म्हणजे कोंडा झाला असल्यास खोबरेल तेलात लिंबू मिसळा आणि हे मिश्रण डोक्याला चोळा एक तासाने केस धुवा.
असा हा सर्वगुण संपन्न लिंबू आपल्या नेहमीच्या आहारात असणे गरजेचे आहे.
हे पण वाचा
4 comments
[…] लिंबू खाण्याचे फायदे […]
[…] लिंबू खाण्याचे फायदे […]
[…] लिंबू खाण्याचे फायदे […]
[…] लिंबू खाण्याचे फायदे वाचा […]