Home हेल्थ शेवग्याच्या झाडाची पाने

शेवग्याच्या झाडाची पाने

by Patiljee
16275 views
शेवग्याच्या झाडाची पाने

शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. गावा ठिकाणी बरेच लोक ही भाजी खाताना दिसतात आणि खरंच ही भाजी इतकी औषधी आहे की यामुळे अनेक आजार कमी होतात. हे तुम्हाला माहीत नसेल. दिसायला ही भाजी एकदम साधी पाने अगदी गोल गरगरीत मेथीच्या भाजी सारखी असतात.

या झाडाची पाने सुकवून त्याच्यावर विशिष्ठ प्रक्रिया करून ती पावडर अनेक रोगांवर औषध म्हणून वापरली जाते. शेवग्याचा कच्चा पाला थोडा तुरट आणि कडवट चवीला असतो पण भाजी मात्र चांगली बनते. जर तुम्हाला ही भाजी खायला आवडतं नसेल तर याची पावडर मार्केट मध्ये मिळते ही पावडर थोडी तुमच्या भात,पोळी किंवा भाजी यात मिसळा आणि मिळवा तितकेच गुणधर्म.

शेवग्याच्या झाडाची पाने

सर्व प्रकारच्या वात विकारांवर शेवग्याचा पाला अत्यंत उपयोगी औषध आहे.

जेवल्यावर सतत तुमच्या पोटात गॅस पकडत असेल तर तुम्ही या शेवग्याच्या पानांची भाजी हमखास खा.

पालक खायला सर्वानाच आवडत नाही पण यात असणाऱ्या घटकांनी परिपूर्ण असा हा पालक खायला तर हवाच. वाचा

ही भाजी उच्च रक्तदाब असणाऱ्यांना आणि मधुमेह असणाऱ्यांना ही गुणकारी आहे. त्यामुळे तुमच्या आहारात ही भाजी असू द्या. कोलेस्टेरॉल कमी होते तसेच रक्त गोठाण्याची प्रक्रिया कमी होते त्यामुळे हार्ट एटॅक्टचा धोका कमी होतो.

शेवग्याच्या भाजी पेक्षा शेवग्याच्या वाळलेल्या पानांचा पावडरी मध्ये जास्त गुणधर्म असतात.
ही वाळलेल्या पणांनची पावडर वर्षभर टिकते.

या पणानांमधे लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे शरीरातील लागणारे रक्त निर्मितीचे काम करते.

झिंकचे प्रमाण असल्यामुळे तुमचे केस गळायचे कमी होतात.

जीवनसतत्व अ असल्यामुळे हे तुमचे डोळे निरोगी ठेवते.

वांगी ह्या भाजीत असणारे महत्वाचे घटक आज पाहा

या पावडर मध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढण्याची ताकद आहे.

झाडाचा पालाचा हा अँटी फगल अँटिवायरल, अँटिबॅक्टेरीएल असल्यामुळे हे तुमच्या शरीरातील जंतू संसर्ग नष्ट करते. त्यामुळे जखमा लवकर भरून येतात.

लहान मुलांचे कुपोषण कमी करण्यासाठी या पानाचा उपयोग होतो.

क्षय रोग झालेल्या आजारावर औषध म्हणून या शेवग्याच्या झाडांची पाने आणि शेंगा यांचा सतत आहारात समावेश केल्यास तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि रोगी या आजाराशी लढण्यास समर्थ होतो.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल