Home हेल्थ हात भाजल्यावर प्रथोमचार

हात भाजल्यावर प्रथोमचार

by Patiljee
2201 views
हात भाजल्यावर प्रथोमचार

घरात काम करता करता नेहमीच स्त्रियांना आणि पुरुषांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. त्यातच एक म्हणजे भाजणे. स्वयंपाक घरातील विजेची उपकरणे यांचा चटका लागणे, गरम पाणी तसेच तवा, गरम भांडी यांचे चटके लागणे किंवा प्रत्यक्षपणे हात जालावर भाजणे, अचानकपणे कपडे पेट घेतात.

या अशा कारणांमुळे घरातील व्यक्तीला भाजले जाते आणि पहिल्या प्रथम आपल्याला कळत नाही काय करावे? नुसते बघत राहण्यात काहीच अर्थ नसतो. आपले उपाय आपण घरातल्या सामनातून ही करू शकतो त्यासाठी बघुया काय काय करायला हवे.

हात भाजल्यावर प्रथोमचार

घरातील जास्त लहान मुलांना तसेच स्त्रियांना भाजल्याचा प्रकार आढळतो. आपण त्यांना त्यासाठी डॉक्टरांकडे नेने घरजेचे आहे. पण तिकडे नेण्या अगोदर त्या व्यक्तीवर आपल्याकडून काहीतरी प्रथोमोचार करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या व्यक्तीची शरीराची आग होणे किंवा दाह होणे कमी होऊ शकते.

पहिल्या प्रथम जी व्यक्ती जळाली आहे ती खूप घाबरलेली असते. तिला त्यावेळी मानसिक आधाराची गरज असते. आपण तिला धीर द्यायला हवा, काही वाईट होणार नाही याची हमी द्यावी. त्यामुळे कदाचित ती व्यक्तीची मनातील थोडी भीती कमी होईल.

जी व्यक्ती भाजली आहे तिचे शरीर जळल्यामुळे तिच्या शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तसेच शरीराचे तापमान कमी करण्याचे काम करायचे आहे. त्यासाठी तिचे शरीर थंड राहील ही व्यवस्था करावी. त्या व्यक्तीचा जो भाग जळाला आहे तो पूर्ण पाण्यात बुडवावा. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या शरीराची आग कमी होत नाही तोपर्यंत असे करावे.

जळालेल्या ठिकाणी कपडे चिकटले असतील तर आपण काढू नये त्यामुळे त्या व्यक्तीला अधिक इन्फेक्शन होऊ शकते.

भाजलेल्या ठिकाणी काहीच लावू नका. तेल किवा मलम वगैरे अजिबात लावू नका. फोड आल्यास ते फोडू नका, जखमेवर वारंवार हात लावू नका.

चेहरा भाजला असल्यास त्यावर थंड पाण्याचा फडका गुंडाला. शरीरावर असणारे सर्व दागिने काढा कारण नंतर अंगावर सूज येणे प्रकार घडतात.

रुग्णाला जखमा मुले जास्त आग होत असेल तर अशा वेळी जखमेवर बर्फाचा चुरा कापडात बांधून ठेवावा.

हे ही आर्टिकल वाचा

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल