Home संग्रह २६/११ बद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी

२६/११ बद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी

by Patiljee
687 views
26/11

२६/११ हा दिवस काळा दिवस म्हणून ओळखला जातो, त्याचं कारण अगदीच सगळ्यांना ठाऊक असेल. किती निष्पाप लोकांचा बळी गेलो होता त्या दिवशी, किती पोलिस अधिकारी शहीद झाले होते त्या दिवशी.

अजूनही ते आठवलं, ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं तरी अंगावर काटा येतो. त्या रात्री कोणाला झोप लागली नसेल, सारखी अस्वस्थता जाणवली असेल. सगळ्यांच्याच बाबतीत असं झालं असेल.

असं म्हणतात की, आपलीच माणसे आपला विश्वासघात करतात तसच काहीस झालं होतं त्यादिवशी. कसाबने अशी कबुली दिली होती की त्यांना दोन भारतीयांनी हाताने तयार केलेले नकाशे पुरवले होते.

या हल्ल्यादरम्यान अमेरिकेचे सागरी कॅप्टन आणि दक्षिण आफ्रिकेचे सहा माजी कर्मचारी हे ताज हॉटेलमधे उपस्थित होते यांनी ताज हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने १५७ लोकांना मार्गदर्शन करून बाहेर काढण्यात यश मिळवले.

हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांची देखिल मदत घेण्यात आली होती परंतु जेव्हा हेलिकॉप्टर नरिमन पॉईंट च्या बिल्डिंग वर उतरवायचे होते तेव्हा सुरुवातीला ते दुसऱ्याच एका चुकीच्या बिल्डिंगवर उतरविण्यात आले.

या आणि अशा खूप गोष्टी आहेत ज्या त्या दिवशी घडल्या होत्या आणि आपल्याला अजून देखिल ठाऊक नाहीत. कितीतरी असे निष्पाप प्राण गेले आहेत जे योगायोगाने म्हणा किंवा त्यांच्या दुर्दैवाने तिथे होते.

आपल्या देशाचे जे रक्षक त्या दिवशी शहीद झाले, ज्या सामान्य लोकांचा तिथे बळी गेला, त्यांच्या जवळच्या लोकांचे दुःख कदाचित आपल्याला कळणार नाही, आजही त्यांना ते सगळं डोळ्यासमोर उभं राहत असेल.

कोणतीही गोष्ट हिंसेने प्राप्त होत नाही हे जितकं खर आहे तितकंच हे देखिल खरं आहे की, आपल्या देशाच्या आणि देशवासीयांच्या संरक्षणासाठी आपण तो मार्ग देखिल स्वीकारू.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल