नवी मुंबईत सद्ध्या करोना पॉसिटीव्ह रुग्णाची संख्या दिसेंदिवस वाढत चालली आहे. कामोठे, कोपर खैरणे, बेलापूर, नेरूळ, पनवेल अशा ठिकाणी नव्याने रुग्ण आढलून येत आहेत. आज पनवेल महानगरपालिकेच्या भागा मध्ये सुद्धा करोना पॉसिटीव्ह रुग्णाची १३ ने वाढ झाली आहे.
नवीन पनवेल इथे आज सहा करोना पॉसिटीव्ह आढलून आले आहेत. ह्यात चिंतेची बाब अशी की ह्या रुग्णातील चार रुग्ण फळविक्रेते आणि दोन रुग्ण किराणा दुकान विक्रेते आहेत. आता हे फळ विक्रेते कुणा कुणाच्या संपर्कात आलेत? कुणा कुणाला त्यांनी फळे विक्री केली आहे. ह्याचा पोलीस शोध घेत आहेत. हे अवघड काम असले तरी त्या फळ विक्रेत्याकडून कुणी कुणी फळे विकत घेतली आहेत अशांनी समोर यावे असे आव्हान सुद्धा केलं गेलं आहे.
APMC मार्केट मध्ये फळ खरेदी करायला गेल्यानंतर त्यांना हा संसर्ग झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. काल खारघर मध्ये ३२ वर्षीय महिलेचा करोना मुळे मृत्यू झाला. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मृत्यूचा आकडा ८ वर जाऊन पोहोचला आहे. ह्यात दिलासादायक बातमी अशी समोर आली आहे की आज तीन रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या घरी सुद्धा गेले आहेत.
तिकडे उरण शहरात सुद्धा करोना पॉसिटीव्ह रुग्ण वाढत आहेत. करंजा गावात अधिक रुग्णाची वाढ झाली आहे. उरण मध्ये १२६ करोना पॉसिटीव्ह रुग्णाची नोंद आतापर्यंत झाली आहे.