Home कथा आज तिचं लग्न आहे

आज तिचं लग्न आहे

by Patiljee
861 views

कुणाच्याही आयुष्यात असा दिवस येऊ नये की आपल्या आवडत्या व्यक्तीच्या तिच्या लग्नात जाऊन तिला गिफ्ट द्यावं ते सुद्धा चेहऱ्यावर हसू ठेऊन. किती दुःखद क्षण असतो ना हा? तरीही हसू ठेऊन तिच्या सुखासाठी आपल्या हॅप्पी दाखवणे गरजेचं असतं. आज तिचं लग्न आहे. ती म्हणजे माझी अक्षता. अक्षता म्हात्रे आज अक्षता गावंड होणार.

एवढ्या वर्ष आपण एका मुली साठी झुरत असतो आणि कुणी अनोळखी व्यक्ती येऊन त्या मुलीला आपल्या आयुष्यातून अगदी सहजतेने घेऊन जातो. यात चुकी कुणाची? तुमची? तिची? की दुसऱ्या कुणाची? या प्रश्नाला कधीच उत्तर नसते. किंबहुना त्या उत्तरासाठी हातातून वेळ सरून गेलेली असते.

तिचं लग्न झालं, मोठ्या थाटामाठात तिचा नवरदेव घोड्यावर बसून तिला घेऊन जाण्यासाठी आला. एवढा गडगज श्रीमंत तिचा नवरा पाहून आपण तिला सुखी ठेवू शकलो असतो का? हा प्रश्न डोक्यात चालूच होता पण खरंच सुखी ठेवण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो की प्रेम? मला विचाराल तर प्रेम, नात्यातले स्वातंत्र्य, जगण्याचे स्वातंत्र्य, हवं तसे राहण्याचे स्वातंत्र्य दिलं की आपला माणूस आयुष्यभर आपल्या सोबत सुखी राहतो. असो.

मी लिहिलेल्या कथा व्हिडिओ रुपात पहायच्या असतील तर इथे क्लिक करा.

रिसेप्शन चालू होतं. हातात तिला देण्यासाठी आणलेलं गिफ्ट. खरंच मी तिला हे देऊ का? आठवेल का तिला ही गोष्ट? जरी आठवली तरी आता काय फरक पडतो. नकळत मन भूतकाळात हरवलं. तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मी लेखक म्हणून नवखा असलो तरी तिला माहित होतं की भविष्यात मी चांगला लेखक म्हणून नावारूपास येणार. सतत मला म्हणायची लेखकजी लिहत रहा तुमची संधी तुमची वाट पाहतेय. पण सतत हाती पडलेले अपयशामुळे मला संधी या शब्दापासून लांब नेलं होतं.

पण ती नेहमी म्हणायची आकाशात संधीचा एक फुगा नेहमी फिरत असतो. ज्याला तो दिसेल त्याने तो फोडायचा. जर तुला तो दिसला तर तो फोडण्यासाठी बंदूक शोधत बसलास तर तो फुगा उडून दुसऱ्याकडे जाईल आणि त्या वेळात दुसरा कुणी तो फुगा फोडून मोकळा होईल. त्यासाठी तुझी बंदूक नेहमी लोड करून ठेव. एकदा का संधीचा फुगा दिसला की लगेच फोडून टाक.

म्हणून माझ्या आयुष्यात नेहमी चांगलं लिहावं म्हणून तिने महागडा असा पारकर पेन मला गिफ्ट दिला होता. पुढे जाऊन अनेक वर्ष मी संधीची वाट पाहिली पण हाती नेहमी प्रमाणे निराशा आली. तिने सुद्धा माझी खूप वाट पाहिली पण शेवटी नशिबात काही वेगळेच वाढून ठेवलं होतं. तिच्या घरचांच्या दबावाखाली तीने अखेर एका मुलाला लग्नासाठी होकार देऊन टाकला. तिचेही बरोबर आहे, किती दिवस माझ्यासाठी थांबणार?

आता आपल्या कथा तुम्ही ऑडियो रुपात पण ऐकू शकता इथे क्लिक करून पाहा.

साखरपुडा झाला आणि मी काहीच करू शकलो नाही. तिच्याकडूनही जास्त काही प्रयत्न होताना मला जाणवले नाहीत. पण तिने मला खूप वेळा दिला होता. त्या वेळेत मी माझ्या आयुष्यासोबत काहीच करू शकलो नाही मग तिलाही दोष देऊन काहीच फायदा नव्हता. अखेर भूतकाळातून बाहेर पडलो. स्टेजवर पोहोचताच तोच पारकर पेन मी तिला गिफ्ट दिला. याच पेनाने आज एका मालिकेसाठी प्रोजेक्ट साईन करून आलो होतो.

म्हणतात ना नशीब पण कधी आणि कशी साथ देईल सांगता येत नाही पण आपल्या सोबत असलेली माणसे तेव्हा आपलीच असतील का नाही याबद्दल थोडी शंका आहे. मी तिला गिफ्ट दिलं आणि माझ्याकडे पाहून किंचित हसली आणि दुसऱ्या पाहुण्यासोबत बोलण्यात व्यस्त झाली. माझा चाप्टर तिने क्लोज केला होता आणि आता आजपासून मला माझ्या नवीन पर्वाला सुरुवात करायची होती.

ही कथा सुद्धा वाचा.. तिची माझी अधुरी प्रेमकहाणी

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)

Related Articles

2 comments

मैत्री प्रेम लग्न घटस्पोट - Readkatha June 22, 2022 - 5:00 pm

[…] आज तिचं लग्न आहे […]

Reply
मैत्री प्रेम लग्न घटस्फोट भाग २ - Readkatha June 29, 2022 - 5:14 am

[…] आज तिचं लग्न आहे […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल