Home हेल्थ तुम्हालाही नेहमी आळस येत असेल तर हे उपाय करा आणि आळस घालवा

तुम्हालाही नेहमी आळस येत असेल तर हे उपाय करा आणि आळस घालवा

by Patiljee
610 views

आपल्यापैकी कित्तेक जणांना नेहमीच कोणतीही गोष्ट करताना आळस येतो आणि म्हणून तो गोष्ट आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. ही सवय आपल्याला लहान पणापासून लागलेली असते. जेव्हा आपल्या पेक्षा मोठी माणसे आपल्याला काही लहान सहान काम सांगतात तेव्हा ते काम करण्यास तुम्हाला इतका आळस येतो की तुम्ही ते काम करण्यास नकार देता. लहान पणी ठीक होते पण आता तुमचे काहीतरी करून दाखवायचे वय आहे आणि त्यामुळे या वयात आळस अंगात असणे ही गोष्ट तुमच्यासाठी कधीही घातक असू शकते आणि म्हणून हा आळस आपण कसा काय घालऊ शकतो ते आज आपण पाहूया.

पहिली गोष्ट म्हणजे तुमचं शरीर हे काम करण्यासाठी नेहमी उत्साही असायला हवे त्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात काय खाता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही जर नेहमीच बाजारातले तळलेल फास्ट फूड खात असाल तर त्याच्यामुळे तुमच्यात नेहमीच आळस राहील यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदल करायला हवा. हिरव्या भाज्या, फळ, ड्राय फ्रूट खा यामुळे तुमच्यात नेहमीच उत्साह असेल. तुमचा आळस यामुळे दुर होण्यास मदत होईल. कधीतरी बाहेरचे खाणे ठीक आहे पण वारंवार बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे तुमच्या शरीराच्या दृष्टीने घातक आहे.

माणूस आळशी कधी बनतो जेव्हा त्याच्यापुढे करण्यासारखे असे काहीच नसते, त्यामुळे तुम्ही जरी आयुष्यात यशस्वी असाल तरीही तुमच्या समोर अजुन पुढे जाण्याचे ध्येय ठेवा. हे ध्येय समोर ठेवल्याने नक्कीच तुमच्या कामाला दिशा मिळेल. तुम्ही त्या वाटेने चालायची सुरुवात कराल. नुसते बसून न राहता काहीतरी करण्याची उमेद तुमच्यामध्ये निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही नेहमीच तुम्हाला अजुन पुढे जायचे आहे काहीतरी करायचे आहे मोठं मोठे ध्येय आपल्या नजरेसमोर ठेवा. त्यामुळे तुमच्या मेंदूला ही चालना मिळेल आणि आळसही दूर होईल.

सकाळी उठल्यावर आपले मेंदू ताजे टवटवीत असते त्यात आपण जे भरतो तेच तो दिवसभर करणार आणि म्हणून आपल्याला दिवसभरात काय काय महत्वाची कामे करायची आहेत ते सकाळचं तुमच्या मेंदूमध्ये फिट बसवा आणि ती कामे करण्यावर जास्त भर द्या त्यामुळे तुम्ही आणि तुमचा मेंदू दोघेही दिवसभर कामे करण्यात गुंग असणार आणि त्यामुळे तुमचा आळस ही झपाट्याने लांब पळेल.

नेहमी हुशार माणसासोबत मैत्री करा तुम्हाला आयुष्य काहीतरी करून दाखवायचे आहे किंवा नोकरीत पुढे जायचे आहे तर अशा वेळी तुमच्या सानिध्यात असणाऱ्या हुशार लोकांच्या नेहमी सानिध्यात रहा. त्यामुळे तुम्ही त्यांच्या सारखे व्हाल त्यांच्यातील सतत सक्रिय राहण्याचे गुण तुमच्या ही उतरतील आणि यामुळे तुम्ही आळशी न होता अधिक पुढे जाल.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल