तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा अनेक प्रादेशिक भाषेमध्ये काम करणारा तुमचा आवडता अभिनेता आर्या नक्कीच तुम्हाला आवडत असेल. त्याने केलेल्या अनेक सिनेमातील भूमिकांबद्दल सर्वच आपण जाणून आहोत. सॉफ्टवेअर इंजिनिअर ते अभिनेता नंतर निर्माता असा त्याचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. आपण त्याला नेहमीच ऍक्शन चित्रपटात पाहिले असेलच पण त्याचे असेही काही रोमँटिक सिनेमे आहेत, जे पाहता क्षणी पुन्हा प्रेमाची जाणीव होते.
त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २००५ अरिंथम अरियमालुम सिनेमातून केली होती. त्याने कुत्त्ती हे निभावलेले पात्र आजही लोकांच्या स्मरणात आहे. ह्याच सिनेमासाठी त्याला फिल्म फेअरचा बेस्ट मेल डेबुट पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता. त्यानंतर त्याने अनेक भाषेतील सिनेमात काम केली आहेत. आजवर त्याचा प्रवास पाहता आर्याने ५० सिनेमात काम केलं आहे. त्याचा ५० वा सिनेमा बॉलिवूड मधील थ्रीदेव आहे. एवढेच काय तर त्याने १० सिनेमात निर्मात्याची भूमिका सुद्धा बजावली आहे.
पण आज आम्ही त्याच्या वयक्तिक आयुष्याबद्दल काही सांगणार आहोत, कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल. ९ मार्च २०१९ मध्ये त्याने सायेशा सोबत लग्न केलं. सायेशा दुसरी तिसरी कुणी नसून ती एक तमिळ सिनेमातील नावाजलेली अभिनेत्री आहे. २०१६ मध्ये तिने आपले बॉलिवूड मधील पदार्पण अजय देवगण सोबत शिवाय ह्या सिनेमातून केलं होतं. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात २०१५ मध्ये अखिल ह्या तेलगू सिनेमातून केली होती.
ह्यानंतर तिने शिवाय, वानामागन, कडईकुत्ती सिंगम, जुंगा, गजनिकांत, कप्पण ह्या सिनेमात कामे केली आहेत. २०२० मध्ये कन्नड सिनेमात ती Yuvarathnaa ह्या सिनेमातून कन्नड मध्ये पदार्पण करणार आहे. ह्या सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे.

गजनिकांत ह्या सिनेमात आर्या आणि सायेशा जवळ आले होते. दोघे प्रेमात होते आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ९ मार्च २०२० मध्ये त्यांनी हैदराबाद मध्ये लग्न केलं. आर्याचे सध्या वय ३९ आहे तर सायेशा वय २२ आहे. दोघांच्या वयात १७ वर्षाचा फरक आहे. तरीसुद्धा ते सध्या आनंदाने आपला संसार करत आहेत. म्हणतात ना खऱ्या प्रेमात वय कधीच मध्ये येत नाही.
2 comments
[…] रमण ह्यांची ती कन्या. आपण तिला अनेक तमिळ तेलगू सिनेमात लोकांना हसवताना […]
[…] […]