Home करमणूक अमीर खान ह्यांचा मोठा मुलगा जुनैद खान ह्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे

अमीर खान ह्यांचा मोठा मुलगा जुनैद खान ह्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे

by patiljee
954 views

सध्या नेपोटीसम वर बॉलीवुड मध्ये तुफान चर्चा सुरू आहे. आपण स्टार आहोत मग आपला मुलगा सुद्धा बॉलीवुड मध्ये स्टार होणार अशी प्रत्येक दिग्गज कलाकारांची इच्छा असते. बॉलीवूड मध्ये सध्या तुम्ही पाहिले तर कपूर, भट, खान आणि अजून बरेच असे कुटुंब ह्याच क्षेत्रात आहेत. आपण त्या कलाकारांना आणि त्यांच्या मुलांना सुद्धा जाणून आहोत. ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मीडिया अशा स्टार किड्स ना डोक्यावर घेते.

अगदी लहान वयापासून ते काय करतात? कुठे शिकतात? कुठे पार्टी करतात? कुणासोबत फिरतात? कुठे जिमला जातात? कुठल्या अवॉर्ड शो मध्ये जातात? अशा सर्व बातम्या मसाला लाऊन आपल्यासमोर सादर केल्या जातात. त्यामुळे आपल्याला हे चेहरे परिचयाचे आहेत. पण काही दिग्गज कलाकार असेही ह्या क्षेत्रात आहेत जे खूप प्रसिध्द आहेत पण आपल्या मुलांना त्यांनी ह्या झगमगत्या दुनियेपासून लांब ठेवलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराच्या मुलाबद्दल सांगणार आहोत ज्याला खूप कमी लोक ओळखतात.

अमीर खान ह्यांचा मुलगा जूनैद खान सध्या २७ वर्षाचा आहे. अमीर आणि रिना दत्ता ह्यांचे ते पहिले दांपत्य आहे. पण आमिरने आपल्या मुलाला नेहमीच कॅमेरा पासून लांब ठेवले. त्याचमुळे तो कसा दिसतो? काय करतो? ह्याबद्दल कुणालाच पुरेशी माहिती नाहीये. अमीर प्रमाणे तो बॉलीवूड मध्ये कार्यरत तर आहे पण एक अभिनेता म्हणून नव्हते तर दिग्दर्शक म्हणून, आता तुम्ही म्हणाल त्याने कोणता सिनेमा दिग्दर्शित केला आहे तर त्याने पिके ह्या सिनेमातही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

सध्या तो आमिर आणि आमिरची दुसरी पत्नी किरण राव ह्यांच्या सोबत राहतोय. ह्या अगोदर तुम्ही जूनैद बद्दल माहित होतं का? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. हे पण वाचा साऊथ फिल्म अभिनेता मुरली शर्मा त्याची पत्नी आहे मराठी अभिनेत्री, बघा कोण आहे ती

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: Content is protected !!