झी मराठी वरील लोकप्रिय मालिका का रे दुरावा सर्वांच्याच मनात एक वेगळं स्थान निर्माण करून गेली. प्रत्येक पात्र प्रेक्षकाच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी झालं होतं. त्यातलेच एक पात्र तुम्हाला चांगलेच आठवत असेल ते म्हणजे जुई. नेहमी ऑफिस मध्ये शांत असणारी ही अबोल जुई सर्वानाच भावली होती.
अर्चना निपाणकर ने साकारलेली जुई सर्वानाच आवडली होती. तिची ही पहिलीच मालिका होती हे कुणालाच माहीत नव्हते एवढा छान अभिनय तिचा ह्या मालिकेत पाहायला मिळाला होता. त्यानंतर तिने १०० डेज आणि राधा प्रेम रंग रंगली ह्या मालिकांमध्ये काम करून आपला ठसा उत्तमरित्या मराठी सिनेसृष्टीत रोवला.
ह्या लॉक डाऊन दिवसात अर्चनाने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे तिने लग्न केलं आहे. पार्थ रामनाथपूर सोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. ४ जानेवारीला त्यांचा साखरपुडा झाला होता. पण लॉक डाऊनमुळे लग्नाची तारीख पुढे पुढे ढकलण्यात आली होती. अखेर मुहूर्त साधत दोघेही लग्न बेडीत अडकले. तिने स्वतः आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत ह्याची माहिती सर्वांना दिली.
पार्थला योगा आणि क्रिकेटचे खूप वेड आहे. तर अर्चनाला अभिनयात रस आहे. ह्या दोघांची जोडी मात्र चांगली जमून आलीय. त्यांच्या भावी आयुष्यासाठी पाटीलजी मीडिया कडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.

हे पण वाचा गायिका कार्तिकी गायकवाडचे ठरले आहे लग्न, पाहूया कोण आहे तिचा जोडीदार
1 comment
[…] हे पण वाचा अभिनेत्री अर्चना निपाणकर अडकली विवाह… […]