Home कथा आंटी

आंटी

by Patiljee
24445 views
आंटी

चाळीत आमच्या बाजूलाच नवीन जोडपं राहायला आलं होत. शेजारी असल्यामुळे आईने आग्रह केला की जाऊन त्यांना विचार काही मदत लागली तर सांगा म्हणून, मनात नसताना सुद्धा मी जाऊन त्यांच्या घराचं दार वाजवलं. आतून एक स्त्री टॉवेलने केस पुसत बाहेर आली. जरी ती चाळीशीतली असली तरी कोणत्याही तरुण मुलीला लाजवेल अशीच होती. तिचे लोभस सौंदर्य अगदी पाहण्यासारखे होते. अजयची नजर त्यांच्याकडे खिळून बसली पण आपण कुठेतरी चुकतोय म्हणून त्याने मान खाली घालून त्यांना प्रश्न केला की मी अजय बाजूच्याच घरात राहतो. आईने निरोप धाडला आहे काही लागले तर सांगा.

त्यांनी हसत अजयला आदराने आत घरात बोलावले पण त्याने नाही म्हणून तिथून पल काढला. अजयबद्दल सांगायचं झालं तर तो २५ वर्षाचा तरुण, इंजिनिअरिंग करत आहे. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याचे आई बाबा ह्या चाळीत गेली अनेक वर्ष राहत आहेत. मुंबईच्या ह्या बदलत्या काळानुसार सुद्धा त्यांची चाळ जमिनीत आपले पाय घट्ट रोवून उभी होती. ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इथल्या लोकांची आपापसातील माणुसकी. अशातच कुणी इथे राहायला आलेय म्हटल्यावर त्यांना निराश करणार नव्हते

त्या महिलेचे ते सुंदर रूप सारखे अजयच्या डोळ्यासमोर येत होते. असेच काही दिवस सरकत गेले. काही महिन्यातच अजय आणि त्या महिलेची चांगलीच गट्टी जमली होती. तिचे मिस्टर कामावर गेले की अजय त्यांच्या घरात जाऊन बसायचं. तासनतास गप्पा मारणे, टीव्ही पाहणे अशा गोष्टी घडतच होत्या. अजय त्यांना आंटी म्हणायचं. पण हे सर्व होत असताना अजयच्या मनात काही वेगळेच होते. एवढ्या महिन्याच्या ओळखीत त्याला हे कळून चुकलं होतं की लग्नाला एवढी वर्ष होऊन सुद्धा त्यांना मुलबाळ नव्हतं. ह्याचाच फायदा अजयने घेण्याचे ठरवले होते.

रोज बोलण्या बोलण्यात तो आंटीसोबत फ्लर्ट करायला लागला होता. पण तो लहान आहे म्हणून साधना(आंटी) ने नेहमी दुर्लक्ष केले. पण इथे मात्र अजयच्या मनात वासना निर्माण झाली होती. कधी एकदा संधी मिळतेय आणि मी आंटीवर तुटून पडतोय, असेच नेहमी त्याच्या मनात होते. अखेर एक दिवस त्याला संधी मिळाली. मिस्टर दोन दिवसांसाठी बाहेरगावी कामानिमित्त गेले असता हीच ती वेळ म्हणून रात्री अकराच्या सुमारास साधनाच्या घरात घुसला. अरे अजय आज एवढ्या रात्री? काही काम आहे का? नाही आंटी ते अंकल नाहीत ना घरात म्हणून म्हटलं तुम्हाला काही हवं नको ते पाहावे. म्हणून आलो.

अरे काही नकोय अजय मला हे बघ आताच जेवण झाले आणि बिग बॉस बघत आहे. अर्धा तास बाकी आहे. ते झाले की झोपी जाईल. अरे वा मस्तच की मी पण पाहतो थोडा वेळ मग आणि जाऊन सोफ्यावर बसला. दोघेही बिग बॉस पाहण्यात व्यस्त झाले. पण अजयने आज मनाशी ठाम निर्णय ठरवला होता की काही झालं तरी आज आंटी सोबत रात्र काढायची. आंटी थोडा चहा द्याल का बनवून झोप येतेय म्हणून त्यांनी साधना जवळ आग्रह धरला. त्याच्या आग्रहाखातर ती किचन मध्ये शिरली. आता मात्र अजयचा स्वतः वरचा बांध सुटला. तो सुद्धा साधनाच्या मागे जाऊन उभा राहिला.

हळूच जाऊन त्याने साधनाला मागून मिठी मारली. तिचे हाथ घट्ट पकडले. हे अचानक काय करतोय अजय म्हणून साधना भडकली. अजय तुला अक्कल आहे का? काय करतोय हे तू? मला हे अजिबात आवडले नाही. आंटी तुम्ही मला खरंच खूप आवडता, मला माहित आहे तुम्हाला मुल होत नाहीये. आपल्यात काही झाले तर नक्कीच ह्याचा फायदा तुम्हालाही होईल त्यामुळे तुम्ही विरोध करू नका. आता मात्र साधनाच्या रागाचा बांध फुटला होता त्याने अजयच्या जोरात कानशिलात लगावली.

आजवर तू लहान आहेस म्हणून मी तुझ्या प्रत्येक चुकावर पांघरूण घालत आलीय. पण तू कधी असेही वागशील असे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मला मुल नाही होत म्हणून मी असे काही करेल असा विचार तरी कुठून आला तुझ्या मनात? जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी पूर्णपणे सर्वस्वी माझ्या नवऱ्याची झाली आणि खरी स्त्री तीच जीला प्रेम करण्यासाठी एक पुरुष पुरेसा ठरतो. ह्या अशा क्षणिक सुखासाठी मी कधीही माझ्या लिमिट क्रॉस करु शकत नाही.

आमच्या नवरा बायकोच्या नात्यात एवढी वर्ष मुलाचे सुख नाही तरी आम्ही खुश का आहोत माहीत आहे का तुला? आमच्यात असलेले नात्याचे बंधन, आम्ही एकमेकांना प्रत्येकाचे स्वातंत्र्य दिलं आहे. आमच्यातले असलेलं प्रेम विश्वास ह्या गोष्टी मुले आम्ही अजूनही एकमेकावर खूप प्रेम करतोय. तुझ्या ह्या अशा वागण्याने तू पूर्णपणे माझ्या नजरेतून उतरला आहेस. चल चालता हो माझ्या घरातून. आता मात्र अजयची मान शरमेने खाली गेली होती. तो काहीच न बोलता तिथून निघून गेला.

मित्रानो माझ्या त्या सर्व मुलांना एकच सांगणे आहे की कोणतीही लग्न झालेली महिला किंवा विधवा महिला जर एकटी असेल तर असे समजू नका की फक्त वासना तुमच्या मनात येईल. योग्य विचार करा कारण तुमच्यावर अशी वेळ आली तर तुम्ही काय कराल? स्वतः ला त्या ठिकाणी ठेऊन विचार करा. कथा जरी कल्पनिक असली तरी अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळत असतील. तुमचे ह्या कथेवर काय मत आहे? हे आम्हाला कमेंट द्वारें कळवा.

का केलं मी लग्न?

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Please follow and like us:

Related Articles

3 comments

Nivas Gorad January 21, 2020 - 3:54 am

Khup chan ahe story ya madhe ajun Ek gost chukun add karavi ki vartman kal ya mulani striyankade Kay mhanun baghvae Ek Aai bahin maitrin

Reply
Lalit s Zambare January 22, 2020 - 6:16 am

Nice story i like ur thought is my pleasure

Reply
आता मी काय करू? » Readkatha August 16, 2020 - 12:40 pm

[…] हि पण कथा वाचा आंटी […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल