आपणही आपल्या रोजच्या जीवनात अशा काही वस्तू वापरतो ज्या खरोखर आपल्यासाठी खास आणि भाग्यवान असतात. जेणेकरून काहीही झाले तरी त्या वस्तू आपण आपल्यापासून दूर करत नाही. कारण त्यांच्यामुळे कदाचित आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत आणि ते क्षण सहजरीत्या कोणालाही सुटत नाहीत. अशीच एक वस्तू अशोक सराफ यांच्याकडे आहे. जिला ती आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची मानतात ती आहे त्यांची अंगठी.
अशोक सराफ गेले कित्तेक वर्ष यांनी मराठी फिल्म इंडस्ट्री गाजवली. त्यांनी आपली हसून हसून पुरेवाट लावली तर कधी रोमँटिक गाण्यांनी तर कधी बिनधास्त फायटींगने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पाहायला गेलो तर त्यांच्या चित्रपटाची यादी खूप मोठी आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मालिका मध्येही काम केले आहेत. त्यांची हम पांच ही हिंदी मालिका अजूनही स्मरणात आहेत.
ते म्हणतात तुम्हाला वाटेल मी अंधश्रद्धाळू आहे पण तस मुळीच नाही आहे. माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या त्यामुळे मला या सगळ्यांवर विश्वास ठेवणे भाग आहे. जवळ जवळ १९७४ साली अशोक सराफ यांचा एक मेक अप मन होता त्यांचा चांगला मित्र होता. त्याची सोने आणि चांदीची पेढी होती, त्याचे नाव विजय लवेकर होते. त्याने एक दिवस चार चांदीच्या अंगठ्या आणल्या आणि अशोक सर यांना देत म्हणाले यातील कोणतीही एक घ्या. त्यांनी एक आंगठी घेतली आणि बोटात घातली. ती अंगठी अशोक सरांच्या बोटात बरोबर बसली पण खरंच ही अंगठी त्याच्यासाठी लकी ठरली.

अंगठी घातल्याच्या तिसऱ्या दिवशीच त्यांना पांडू हवालदार हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाने अशोक सराफ यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत जवळ जवळ पन्नास वर्ष ती अंगठी त्यांच्या हातात आहे. ती अंगठी ते कधीच आपल्यापासून दूर करत नाहीत. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या लग्नाची अंगठी हातातून हरवली पण ही अंगठी मात्र ते कधीही बोटातून काढत नाहीत अगदी कितीही महत्वाचे कारण असले तरीही.
शर्मिष्ठा हीचा झाला आहे साखरपुडा बघा कोण आहे तिचा जोडीदार? काय करतो? कधी करणार आहेत लग्न?
2 comments
[…] […]
[…] […]