Home हेल्थ अतिसार म्हणजे हगवण किंवा जुलाब लागण्यास काय घरगुती उपाय कराल पहा

अतिसार म्हणजे हगवण किंवा जुलाब लागण्यास काय घरगुती उपाय कराल पहा

by Patiljee
8016 views
जुलाब

सध्या पावसाळा चालू आहे आणि या मोसमात पोटाचे विकार जास्त होतात. जास्त करून जुलाब होण्याची शक्यता असते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही समस्या भेडसावत असते. अचानक जुलाब झाले तर काय करावे हा प्रश्न सर्वानाच पडतो? जुलाबा मुळे माणूस इतका हैराण होतो की त्याला काहीच खायची इच्छा नसते. अशा वेळी तुम्ही नेमके काय कराल की जेणेकरून तुम्हाला लवकर आराम मिळेल.

जुलाब झाल्यावर हे उपाय करा

सतत जुलाब करत राहिल्याने शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मीठ, साखर,पाणी मिसळून हे सतत प्यावे.

पोटात गेलेलं अन्न न पचल्यामुके पोट फुगते दुखते आणि अस्वस्थ वाटू लागते ही समस्या तुमच्या पचनसंस्थेचे विकार घडून आल्यावर येते.

पहिल्या प्रथम आपण एक काढा घेऊ शकतो. त्यात थोडी बडीशोप, जिर, आले, कडीपत्ता घालून एक उकळी आणून गाळून हे पाणी प्या.

एक घरगुती उपाय म्हणजे एक चमचा आल्याचा रस घ्या. त्यात चिमूटभर मीठ टाका आणि हे मिश्रण घ्या त्यामुळे पोटात दुखणे ही थांबेल आणि जुलाब ही.

हगवण लागली असेल तर एक चमचा गावठी तूप घ्या. त्यात थोडी साखर मिसळा हे मिश्रण खा.

लहान बाळांना जुलाब होत असतील तर डाळिंबाची साल उगाळून त्यात थोड मध किंवा साखर मिसळून द्या. त्यासाठी साल डाळिंब आणल्यावर सुकवून ठेवा.

एक ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा मोहरी टाका आणि एक तास झाकून ठेवा त्यानंतर गाळून हे पाणी प्या.

मेथीचे चिमूटभर दाने जिभेवर ठेवा आणि कोमट पाणी प्या.

काही केल्या तुमची हगवण थांबत नसेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे पण वाचा लिंबू खाण्याचे फायदे

Please follow and like us:

Related Articles

2 comments

गावठी तूप खाण्याचे फायदे » Readkatha July 27, 2020 - 6:26 pm

[…] जुलाब होत असतील तर तूप आणि साखर खावी आराम पडतो. […]

Reply
रिया जाधव September 28, 2021 - 1:07 pm

छान माहिती पूर्ण लेख वाचण्यासाठी भेटला,धन्यवाद.

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल