आपल्याला अय्यर माहीतच असेल. अत्यंत लोकप्रिय ठरलेली ही मालिका म्हणजे तारक तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेतील अय्यर हा आपल्याला मालिकेमध्ये अक्षरशः साऊथ इंडियन बोलणारा हा कलाकार चक्क मराठी आहे हे तुम्हाला ही माहीत नसेल पण ही गोष्ट खरी आहे की हा मराठी आहे. त्याने या मालिकेमध्ये एका साऊथ इंडियन व्यक्तीचे अभिनय केले आहे.
तनुज महाशब्दे हा सांगतो की ही भूमिका करताना त्यात इतकी सवय झाली आहे की घरात ही बोलताना तोंडातून साऊथ इंडियन बोली निघते. पण आता त्यातून निघण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करत आहे. तनुज महाशब्दे यांना जेव्हा हा रोल करायची ऑफर आली होती तेव्हा हा अभिनेता चक्क साऊथ फिरायला गेला होता. तेथील लोकांचा अभ्यास केला. ती लोक कशी बोलतात कशी रागावतात याचा ही अभ्यास केला. साऊथचे हे पात्र वाढवण्यासाठी त्यांनी पडोसन हा चित्रपट तब्बल 100 वेळा पाहिला आहे.
आता जरी तो एक अभिनेता असला तरी त्याच्या हातात लेखनाची कला ही आहे. त्याने आहट आणि सी आय डी या लोकप्रिय मालिकांचे ही लिखाण केले आहे. पण आता अभिनय करता करता लिखाणाला पूर्ण विराम आला आहे. तसेच त्यांचा पहिला पाया हा नाटकाचा आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी नाटके केली आहेत. ते सांगतात की कोणत्याही कलाकाराला नाटक केल्याने त्यांना यातून खूप काही शिकायला मिळते.
लहान असताना ही त्यांनी नाटका मध्ये काम केले आहे. तेव्हा त्यांना रावणाची भूमिका करायला मिळाली होती. त्यांचे म्हणणे होते की मी काळा असल्याने दुसरी भूमिका मिळणे माझ्यासाठी खूप अवघड होते. तारक मेहता का उलटा चष्मा या मालिके बाबत बोलताना ते सांगतात की या मालिकेच्या सेटवर पोचल्यावर घरी आल्यासारखे वाटते तिथे सर्वच एकमेकांची सुखात आणि दुःखात मदत करतात.