जसं की लोक म्हणतात की इथे जे अभिनेते ज्यांनी आजवर चित्रपट क्षेत्रात अनेक चित्रपट केले अशा अभिनेत्यांच्या मुलांनाही सहजरित्या काम मिळते पण बाहेरून हे लोक स्टार होण्यासाठी येतात त्यांना खूप गोष्टीचा सामना करावा लागतो ही गोष्ट जरी खरी असली तरी तो अभिनेता किंवा अभिनेत्री स्वतच्या अभिनयाने पुढे जातात प्रेक्षक ठरवत असतात की कोणता अभिनेता एक उत्कृष्ट कलाकार आहे. आज आपण अशाच बाप लेकाची ओळख करून देणारं आहोत जे या क्षेत्रात प्रसिद्ध तर झाले पण त्यांची मुले लोकांवर आपली जादू नाही दाखवू शकले.
जावेद जाफरी
जावेद ने बॉलिवुड मध्ये अनेक चित्रपट केले आणि तो प्रेक्षकांच्या मनात आपली जागा ही करू शकला पण त्याचा मुलगा निजान जाफरी त्याने बॉलिवुड मधील मलाल या चित्रपट मधून एन्ट्री केली होती. दिसायला तसा हँडसम आणि स्मार्ट असा हा अभिनेता याचा अभिनय ही बऱ्यापैकी चांगला आहे पण हा अभिनेता प्रेक्षकांच्या मनात तितकीशी जागा करू शकला नाही. पण भविष्यात अनेक सिनेमे तो करेल तेव्हा नक्कीच तो प्रकाशझोतात येईल.
परेश रावल
परेश रावल याने बॉलिवुड मध्ये अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत जसे की व्हिलेन आणि बापाची भूमिका ही त्याने अगदी चोख पने बजावली आहे. पण त्याला सर्वात जास्त प्रेक्षकांनी एका कॉमिक रोलच्या भूमिकेत पसंत केले आहे. त्याची दोन्ही मुले आदित्य रावल आणि अनिरुद्ध रावल यांनी कदाचित तुम्ही ओळखत असालही या त्याच्या दोन्ही मुलांनाही या इंडस्ट्री मध्ये हवे तसे यश मिळाले नाही.
जॉनी लिव्हर
जॉनी लिव्हर एक कॉमेडी हिरो म्हणून याची बॉलिवुड मध्ये चांगलीच छाप आहे. अनेक चित्रपटांमधे त्याचे अभिनय आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या या अभिनयाला प्रेक्षकांनी ही भरपूर दाद दिली आहे. पण त्याचा मुलगा जेसी लिव्हर याने 12 वी नंतर आपले शिक्षण सोडले होते. तो लहानपणापासून सतत आजारी असायचा कारण त्याला लिव्हरचा कर्करोग होता पण आता तो आपल्या फिटनेस वर संपूर्ण लक्ष देत आहे. त्याने बॉलिवुड चित्रपट “ये साली आशीकी” यातून एन्ट्री केली होती. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. वार सिनेमात सुद्धा ऋतिक रोशन सोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे.
बोमन इराणी
बोमन इराणी या अभिनेत्याला तुम्ही सगळे ओळखत असाल. त्यांनी अनेक चित्रपट मध्ये काम केले आहे. मुन्ना भाई एम बी बी एस या चित्रपट मधून तो लोकांना जास्त आवडला. त्यांना दोन मुल आहेत दानेश आणि कायोजे ही दोन मुळे आहेत. यातील कायोजे याने दोन चित्रपट केले आहेत. त्याने स्टूडेंट ऑफ द इअर आणि यंगिस्तान हे दोन चित्रपट केले. यानंतर तो बॉलिवुड मधून गायब झाल्यासारखा वाटतो.
नसिरुद्दीन शहा
नसिरुद्दीन शहा बॉलिवुड मधील एक मुरलेला सुपरस्टार पण त्याचा मुलगा विवान शहा हा काही बॉलिवुड मध्ये तितकासा आपले नाव कमवू शकला नाही. त्याचा चित्रपट हॅपी न्यू इअर हा चित्रपट आलेला पण त्यातून तो लोकांना जास्त आवडला नाही.
सनी देओल
सनी देओल याने बॉलिवुड मधील थोड्या फार चित्रपट पण हिट असे चित्रपट दिले पण त्याचा मुलगा करण देओल याने पल पल दिलं के पास हा चित्रपट मधून काम केले होते. याचे निर्देशन सनी देओल याने केले होते. पण हा चित्रपट ही प्रेक्षकांच्या मनात घर करू शकला नाही.
विनोद मेहरा
80 व्या शतकांमधील हा अभिनेता त्यावेळी अनेक कारणांनी लोकांच्या चर्चेत होता. त्याचा मुलगा रोहन मेहरा याचा चित्रपट बाजार हा सुधा बॉक्स ऑफिस वर फ्लॉप ठरला.