Home संग्रह ये फेविकॉल का जोड है तुटेगा नही’ हाच दावा या पीडिलाईट कंपनीच्या मालकाचा

ये फेविकॉल का जोड है तुटेगा नही’ हाच दावा या पीडिलाईट कंपनीच्या मालकाचा

by Patiljee
295 views

तर मित्रानो शरीरावर घाव पडल्याशिवाय कुणीही मोठा होत नसतो. म्हणजे मनुष्याला या जगात मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि म्हणूनच कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. त्याकरिता तुमची विचार करण्याची पद्धत ही मोठी असायला हवी. तर आज आपण अशा व्यक्तीविषयी सांगणार आहोत त्याचे नाव आहे फेविकॉल नावाने प्रसिद्ध असलेले पीडिलाईट इंडस्ट्री चे मालक बळवंत पारेख यांच्याबद्दल. मित्रानो आता तुम्हाला पीडिलाईट या नावाबद्दल माहीत नसेल पण फेविकॉल, एम सील, फेवी क्विक आणि डॉक्टर फिक्षिट हे सर्व पीडिलाईट या कंपनीचे प्रॉडक्ट आहेत. तर आपण बळवंत पारेख याच्यांबद्दल माहिती करून घेणार आहोत या व्यक्तीने या कंपनीची सुरुवात सुमारे 58 वर्षांपूर्वी केली होती.

Source Google

त्यांचा जन्म 1925 साली गुजरात मधील भावनगर जिल्यातील महुवा या गावी झाला होता त्यांनी आपली सुरुवातीचे शिक्षण आपल्या गावीच घेतले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबई ला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी गव्हर्मेट कॉलेजमधून लॉ ची डिग्री घेतली. याच दरम्यान त्यांचं लग्न कांताबेन नावाच्या मुलीशी झाले. तर बळवंत पारेख यांच्या खोटे बोललेले आवडत नसे आणि त्यांनी ज्या करीयर का सुरुवात केली होती त्यामध्ये खोटे बोलयला तर लागते त्यामुळे ते या पेशात जास्त काळ राहू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी प्रिंटिंग प्रेस मध्ये कामगार म्हणून काम करायला सुरुवात केली. नंतर पुढे जाऊन ते एका लाकडाच्या दुकानात जाऊन काम करायचे. पण जो व्यक्ती मागे न पाहता सतत पुढे जाण्यासाठी धडपडत असतो त्यातील हे एक होते त्यांनी आपल्या कष्टाने करोडोंची कंपनी उभारली. आता तर त्यांचे हे प्रॉडक्ट संपूर्ण भारतात आणि येथील प्रत्येक घरात उपयोगात आणले जातात.

एक दिवस त्यांची भेट एका इन्वेंस्टर सोबत झाली त्यांना पारेख मधली जिद्द दिसून आली त्याच्याच मदतीने पारेख यांनी वेस्टर्न कंपनीची सायकल आणि सुपारी विकण्याचे काम सुरू केले. त्यातून त्यांना भरपूर नफा मिळू लागला ही गोष्ट त्यावेळची होती जेव्हा भारताला स्वतंत्र मिळून काही वर्षे झाली होती. त्यानंतर एकदा असेच फिरत असताना लाकडाच्या दुकानाजवळ येऊन थांबले तेथील कामगारांना लाकूड जोडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती. कारण पाहिले काय असायचे तर जनावरांच्या चरबी पासून बनवलेले गोंद याचा वापर करत असत. ते पहिल्यांदा उपयोगात आणण्यासाठी खूप प्रमाणात उकळायला लागायचे. आणि यातून खूप घाण वास ही यायचा.

या समस्येपासून काहीतरी नवीन उपाय बनविण्यासाठी पारेख यांनी खूप रिसर्च केले. आणि खूप मेहनतीने त्यांनी गोंद बनवले. त्यानंतर 1959 मध्ये त्यांनी पीडिलाईट कंपनीचा सुवासिक असा फेविकॉल तयार केला. फेविकॉल चे शेवटचे अक्षर कॉल हा जर्मन शब्द याचा अर्थ दोन वस्तूंना जोडणारा असा होतो. शिवाय जर्मनीची एक कंपनी याच प्रकारचा एक प्रॉडक्ट मोविकॉल नावाने बनवत होती. या नावाने इंस्पायर होऊन पारेख यांनी आपल्या गोंदला नाव फेविकॉल असे दिले. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेऊन जर तुम्ही बिझनेस ला सुरुवात केली तर तुमचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यानंतर फेविकॉल ने भारत देशात प्रसिद्धी मिळवली शिवाय आज काळाच्या गरजेनुसार या कंपनीने नवीन प्रॉडक्ट उत्पादित करण्यास सुरुवात केली. तर बळवंत पारेख हे 2013 ला हे जग सोडून गेले.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल