Home प्रवास नवीन वर्षाला तुम्ही कुठे जाणार फिरायला, येथे जा खूप सुंदर ठिकाण आहे

नवीन वर्षाला तुम्ही कुठे जाणार फिरायला, येथे जा खूप सुंदर ठिकाण आहे

by Patiljee
268 views

कोकण हे फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भात शेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि विविध प्रकारची जातिवंत मासळी ही कोकणातली ‘नगदी पिकं’ मानली जातात. म्हणून दरवर्षी नाताळ आणि कोकण येथे पर्यटकांची भरपूर गर्दी असते. कोंकणातील समुद्रकिनारे हा पॉईंट पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो आणि म्हणून गोव्या नंतर सिंधुदुर्गला येण्याचा कल पर्यटकांमध्ये जास्त दिसून येतो.

Source Google

आपल्या देशातीलच नाहीत तर विदेशातील लोक ही या ठिकाणी अगदी आवडीने फिरायला येत असतात. हा काळ सुट्ट्यांचा असल्यामुळे अगोदरपासूनच पर्यटक या ठिकाणी येऊन वस्ती करत असतात. कोकणातील किनारे पर्यटकांनी गजबजून गेलेत. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल झाली आहेत. परदेशात आणि गोव्यात ज्या सुविधा मिळतायत त्याच सुविधा आता कोकणात देखील मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाकडे वळू लागलयेत.

नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी मालवण, तारकर्ली, देवबाग, देवगड, भोगवे, शिरोडा, चिवला समुद्र किनार्‍यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. यासाठी यावेळी हॉटेल, घरगुती राहण्याची सोय असलेली ठिकाणे पर्यटकांनी या आधीच हाऊसफुल्‍ल झाली आहेत. आणि म्हणून आजच्या पिढीला समुद्राच्या चंद्रकोरीसारख्या रेखीव आणि शांत किनाऱ्यावर राहता येण्याचं सुख अनुभवावंसं वाटणं साहजिकच आहे.

मग आता कसली वाट पाहत आहात जर तुम्हालाही नवीन वर्षाचे स्वागत निसर्गाच्या सान्निध्यात करायचे असेल तर एकदा कोकणला नक्कीच भेट द्या.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल