सध्या भाज्या घेण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे, भाजी दिसायला उत्कृष्ट दिसत असली तरी तीच्या वर असणारा धोकादायक व्हायरस हा तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही, त्यामुळे भाज्या घेताना वेळीच काळजी घ्या. जरी हा व्हायरस आपल्या डोळ्यांना दिसत नसला तरी त्याच्यामुळे आपल्याला किती धोका आहे हे वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे भाज्या घेतल्या तरी त्यांचा वापर आपल्या जेवणा मध्ये कसा आणायचा हे आपण आज बघणार आहोत.
जेव्हा आपण मार्केट मध्ये या भाज्या घेण्यासाठी जातो तेव्हा आपल्या अगोदर त्या भाज्या घेताना किती तरी लोकांना त्या भाज्यांना हात लावलेला असतो. त्यामुळे अर्थातच त्या भाज्यांना एखाद्या संक्रमित व्यक्तीने जर का स्पर्श केला असेल तर त्या भाज्यांवर ही हा खतरनाक व्हायरस असू शकतो आणि तुम्हालाही त्याचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सुरक्षिततेसाठी हातात काहीतरी घाला जेणेकरून भाज्यांना हाताचा स्पर्श होणार नाही. किंवा भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि चांगल्या शिजवून घ्या चांगल्या प्रकारे शिजल्यामुळे त्यातून होणारा व्हायरसचा धोका टळतो.
पॅक बंद म्हणजे फ्रोजन अन्न ही सध्या खाणे टाळावे हे अन्न कमीत कमी तापमानात ठेवलेले असते. त्यामुळे अशा तापमानात हा व्हायरस टिकून राहतो. अशा प्रकारच्या अन्नाच्या पॅकमध्ये व्हायरस प्रवेश नाही करत. पण त्या पॅकेटच्या बाहेर हा व्हायरस असू शकतो त्यामुळे यांच्यातून ही आपल्याला धोका आहे.