आपण सर्वच लोक करोना पासून खबरदारी घेण्यासाठी सर्वच नियम पाळत आहोत. पुन्हा पुन्हा हात धुणे, लांब अंतर राखणे, बाहेर न पडणे, बाजारातून सामान आणल्यावर धुऊन घेणे अशा सर्वच खबरदारी आपण घेत आहोत. पण एक अशी गोष्ट आहे जी काही भारतीयांनी सुधारली नाही तर आपल्या देशातून कधीच करोना हद्दपार होणार नाही.
आपल्या भारतात तंबाखू गुटखा खाणाऱ्यांची संख्या हद्दिपेक्षा जास्त आहे. ह्यातले काही लोक एवढे महारथी आहेत जे रस्त्यात कुठेही थुंकतात. त्यामुळे जर ह्यातून कुणी करोना रुग्ण असेल तर हा विषाणू पसरायला वेळ लागत नाही. क्षणार्धात हा विषाणू पसरू शकतो. म्हणून ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी ह्या थुकनाऱ्यानवर कडक कारवाई केली पाहिजे.
सध्या भारतात अनेक राज्यात थुंकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जो कुणी थुंकताना दिसेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. पण तरीही अजूनही काही लोक जागोजागी थुकत आहेत. तंबाखू किंवा गुटखा खाणे हे वाईटच आहे पण हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. पण तुम्ही खाऊन रस्त्यात कुठेही थुंकता ही अतिशय घाणेरडी गोष्ट आहे. जसे तुम्ही बाहेर कुठेही थुकता तसे घरात एकदा थुकून पाहा बघा तुम्हालाच त्याची किती घाण वाटेल. म्हणून आताच वेळ आहे ह्या गोष्टी थांबण्याची.
सध्या आपल्या देशाची परिस्थिती खूप गंभीर आहे. आपण ह्यातून सावरू ह्यात काही शंका नाही पण आपण आताच करोना सोबत जगायला सुरुवात केली पाहिजे तरच आपण ह्यातून लवकर वर येऊ शकतो. करोना सोबत जगणे म्हणजे तरी नक्की काय तर कुठेही बाहेर पडताना काळजी घ्या, ज्या वस्तूला हात लावाल तिथे करोना आहे असेच समजून चाला. तरच तुम्ही वेळोवेळी हात धुवून काढाल. Sanitiser ची बॉटल नेहमीच सोबत असलीच पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर मास्क असलाच पाहिजे.
सरकार प्रत्येक गोष्टी आपल्याला घरी येऊन सांगू तर शकणार नाही. काही गोष्टी आपण स्वतः आत्मसात केल्या पाहिजेत. ज्या प्रकारे सध्या कुठेही थुकण्यावर बंदी आहे अशीच बंदी हे सर्व थांबल्यावर असली पाहिजे. तरच आपला परिसर स्वच्छ दिसेल.
1 comment
[…] […]