बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना NCB म्हणजेच (नार्कोटिक्स कॉन्ट्रोल ब्युरो ) कडून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून NCB चे धाडसत्र सुरूच आहे, लोखंडवाला, अंधेरी, वर्सोवा या ठिकाणी हे धाडसत्र सुरू आहे, त्यामध्ये बॉलीवूड मधील स्टार्स शी काँनेक्शन असलेल्या भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना अटक करण्यात आली आहे.
हर्ष आणि भारतीच्या प्रोड्कॅशन हाऊस आणि घरामध्ये 86.5 ग्राम गांजा सापडला असल्याने भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणीत आणखी भर पाडली आहे. एका ड्रग्स चेन मध्ये सहभागी व्यक्तीच्या बोलण्यात भारती सिंगचे नाव आल्याने तिच्या राहत्या घरी रेड टाकण्यात आली. वर्सोवा, लोखंडवाला, आणि अंधेरी इथे रेड टाकण्याचा काम अजूनही सुरूच आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरण जरी आता बंद झाले असले मात्र तरीही NCB ला ड्रग्स काँनेक्शन प्रकरणात अनेक गोष्टींचा शोध लावण्यात यश आले आहे मात्र तरीही अजूनही मूळ चैन पर्यन्त पोहोचता आले नाही आहे. अजूनही तपासात फक्त साईड बायर सापडले आहेत असे सांगण्यात येत आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अनेक धागेदोरे हाती लागत असताना असूनही या चैन च्या फक्त काही भागांचाच आम्ही उलगडा करू शकलो आहोत असे NCB कडून सांगण्यात येते. यातील स्पेसिल टास्क दिल्ली आणि गोवा इथेही कार्यरत असून तपासात तितकीशी गती मिळली नाही. अटक केलेल्या सर्व जणांची जाब आणि स्टेटमेंट घेण्यात आले असून त्यावरून जवळजवळ 23 जणांना अटक करण्यात आली आहे. यात अटक केलेल्या लोकांच्या जबाबा वरून जवळपास तीन डझन च्या वर घरांवर छापे मारण्यात आले आहेत.
मात्र हाय कोर्टाने नवीन निर्णय सूनवल्यावर काम अजून वाढले आहे. कोणतेही ठोस पुरावे असल्या शिवाय अटक केलेल्या लोकांचे जाब हे फायनल म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. पुराव्यांसाठी या जाबाबांचा वापर होऊ शकत नाही. हे स्टेटमेंट ग्राह्य धरले जाणार नाहीत, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
मागील आठवड्यात अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गीब्रेला आणि तिचा भाऊ यांना अटक करण्यात आली होती. त्यात ग्याब्रिला हिचा सलग 12 तास जबाब नोंदवण्यात आला. अर्जुन रामपाल याचीही सहा तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ही लागोपाठ छापे सुरूच असून आता पर्यत 36 वेगवेगळ्या जागी छापे मारण्यात आले आहेत.
हर्ष आणि भारती यांच्या घरातून काही प्रमाणात ड्रग्स मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा भारतीने आम्हाला इथे फक्त काही जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे असे सांगितले. NCB च्या धाड छाप्यात त्यांच्या राहत्या घरी काही प्रमाणात ड्रग्स सापडले असल्याचं माध्यमांकडून कळते आहे. याचमुळे याच्या चौकशी साठी हर्ष आणि लिंबाचिया यांना समन्स बजावण्यात आले होते. अटकेनंतर जबाब नोंदवण्यासाठी त्यांना बोलवण्यात आल्यावर मात्र त्यांच्याकडुन समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचं सांगितले जाते.
याच प्रकरणात अर्जुन रामपाल याच्या गर्लफ्रेंड ग्याब्रिलाची सलग 12 तास उलट तपासणी करण्यात आली होती. आणि त्यानंतर अर्जुन रामपाल याचीही 6 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अर्जुनाने आपण कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर वर्तन केले नसल्याचे सांगितले तसेच त्याच्या घरी ज्या गोळ्या सापडल्या त्या ही प्रामाणित असल्याचा दावा त्याने केला आहे.
याच काळात मात्र बॉलीवूड कर यावर कुठल्याही प्रकारची टिपण्णी करायला तयार नाही आहेत, याविषयी कुनीही कुठल्याही प्रकारे भाष्य केले नाही. कुठल्याही पार्टी अथवा सेलिब्रेशन विषयी ऐकले नाही कारण NCB च्या धडक कारवाई ने सगळ्याच सिलिब्रेटींच्या तोंडचं पाणी पाळवलं आहे. एका पाठोपाठ एक बड्या अभिनेत्यांची नावं समोर आल्याने त्यांच्या चमकदार करिअर ला गालबोट लागल्यासारखे आहे.