Home बातमी ६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर

६०+ वय असेल तर पुणेकर सावधान, गंभीर अहवाल आला समोर

by Patiljee
1832 views
पुणे

पुणे : संपूर्ण भारतात ३३ लाख ८७ हजार ५०१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ह्यात ७ लाख ४२ हजार २३ सक्रिय केसेस आहेत आणि २५ लाख ८३ हजार ९४८ लोक कोरोना पासून मुक्त झाली आहेत. तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ६१ हजार ५२९ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सर्वच राज्यात आणि तिथल्या शहरात कोरोनाने थैमान घातले आहे.

अशीच एक महत्त्वाची बातमी पुण्यातून आली आहे. पुण्यामध्ये सध्या २८ हजार १४२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहेत. ह्यात १३ हजार ४०६ लोकं बरं होऊन आपल्या घरी परतली तर ८७२ लोकांचा ह्या रोगाने बळी घेतला. पण एका आलेल्या रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की ६०+ वयोगटाच्या वर असलेल्या व्यक्तींना लागण जास्त प्रमाणात होत आहे.

वाचा : आगरी दादुसला कोरोनाची लागण

पिंपरी चिंचवड ह्या महानगरपालिकेने केलेल्या एका सर्वेनुसार ६० किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ९२२ प्रौढांना कोरोनाची लागण झालेली समोर आलं आहे. ३५०० लोकांची पिंपरी चिंचवड महानगरपलिके मार्फत तपासणी करण्यात आली ह्यात ९२२ ६०+ वयोगटातील लोक पॉझीटिव आले आहेत.

पुण्यातील आयुक्त सौरभ राव ह्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले आहे की आम्ही एक अँप तयार केलं आहे ज्याचं नाव वयश्री आहे. जिथे सर्व वयस्कर लोकांची माहिती मिळते. ह्या आधी आम्हाला प्रत्येक घरघरात जाऊन विचारपूस करून हा डाटा मिळवावा लागत होता. पण आता ह्या अँप मार्फत हे सोयीस्कर झालं आहे.

आता पर्यंत पुण्यात २ लाख वयस्कर लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. गरज असेल तिथे ऑक्सीमीटर सुद्धा पुरवले गेले आहेत. त्यामुळे प्रौढ लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्यांची काळजी मोठ्या प्रमाणात घेतली पाहिजे.

तुमच्या शरीरात रोगप्रतिकार शक्तीची कमतरता आहे हे तुम्ही कसे ओळखू शकता? वाचा पूर्ण मग कळेल

दवाखान्यात किंवा इतर गरजेचे असलेले काम असल्यासच घराबाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका असे आवाहन पुणे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तुमच्याही घरात ६० किंवा त्याहून अधिक वयोगटातील व्यक्ती असतील तर तुम्ही त्यांची योग्य काळजी घ्या.

Please follow and like us:

Related Articles

1 comment

sneha patil April 5, 2021 - 7:13 pm

वयस्कर व्यक्तीं साठी खूप फायदेशीर पोस्ट आहे

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल