Home कथा चाळीतले घर

चाळीतले घर

by Patiljee
1055 views
चाळ

एक चांगला दिवस बघून आम्ही आमची रूम बदलली, पहिली रूम चांगली होती पण कामाच्या ठिकाणी पप्पांना जायला खूप अडचण यायची म्हणून मग ही रूम घेतली. पप्पा आमचे मुंबईला कामाला जायचे आणि त्यांना जवळ पडेल म्हणून ही चाळीत रूम छान होती. आजूबाजूला बिऱ्हाड ही होती पण आमच्या आजूबाजूला एकही बिऱ्हाड नव्हतं, म्हणजे आमची रूम सोडून तीन ते चार रूम सोडून मग बिऱ्हाड राहायला होती. वर खाली ही तशीच परिस्थिती होती, पण त्या ठिकाणी आम्ही नवीन असल्यामुळे आणि आम्हाला ही रूमची खूप गरज असल्यामुळे आम्ही तिथे कोणाला काहीही विचारले नाही.

पहिलाच दिवस घरात आई बाबा मी आणि माझी लहान बहीण सगळेजण मिळून आमचं घर साफ करत होतो. दोनच रूम होते त्यामुळे आम्ही काय कोणाला साफ वगैरे करायला बोलावले नाही. सकाळी दहा वाजता आम्ही बरोबर त्या रूमच्या दरवाजाजवळ थांबलो. शेजारी पाजारी नजर फिरवली पण आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते. पप्पांनी लॉकची चावी खिशातून काढली आणि लॉक उघडला. खूप दिवस हा लॉक कोणी उघडलेलाच नाही असे वाटत होते. कारण तो खोलताना कर कर असा आवाज आला. आवाज थोडा मोठाच होता आणि हा आवाज ऐकल्यावर मात्र आजूबाजूला राहणाऱ्या काही स्त्रिया आमच्याकडे जशा काय आश्चर्याने पाहत होत्या, त्यांच्याकडे पाहून आम्ही जसं काय नरकात राहायला आलोय.

तो विषय तिथेच सोडला कडी उघडली कडीचा आवाज ही कर्ण कर्कश होता, मनाशी म्हटलं एकदा चार ते पाच दिवस झाले की पाहिले ही कडी बदलून घेइन. आता मात्र पप्पा दरवाजा उघडायला गेले तर दरवाजा इतका जाम झालेला की उघड तच नव्हता, मग बाबांना मागे खेचून मी जोरात धक्का मारला आणि दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर एक कुजकट असा वास सगळ्यांच्या नाकात भिनायला लागला, सगळं घर धूळ आणि कचरा यांनी भरलेला होता आणि घरातील वातावरण खूप थंड होत. मी ही शंका बाबांना ही विचारली पण ते म्हणाले काहीही नाही घर खूप दिवस बंद होत म्हणून असेल. आम्ही चौघांनी मिळून संपूर्ण घर साफ केले पण का कुणास ठाऊक त्या घरात आमच्या चौघांशिवाय ही आणखी कोणीतरी वावरत आहे अशी शंका मला आली. ही शंका मी बहिणीला ही विचारली आणि पहिल्यांदा तिला माझं म्हणणं पटलं ती म्हणाली हो दादा मलाही असेच वाटते.

साफ सफाई करता करता संध्याकाळ झाली बाबांनी बाहेर जाऊन वडापाव वैगेरे सर्वांसाठी आणले. कारण जेवण बनवायला आम्ही तसेच आई खूप दमलो होतो, आम्ही चौघेजण बाहेरच्या रूममध्ये खायला बसलो आणि किचन मधून धडाधड भांडी पडल्याचा आवाज आला. खिडकी तर लावलेली होती मग काय उंदीर मांजर नाही की अन्य प्राणी ही नाही की तो भांडी पाडेल. आम्ही सर्व आता गेलो तर भांडी अवास्तव पडलेली होती, माझी बहिण तर खूप घाबरली होती. तसे आम्ही सर्वच घाबरलो होतो पण एक मेकांना सांगायची हिम्मत होत नव्हती.

काय चाललंय काहीच काळात नव्हतं, थोड्या वेळातच संपूर्ण घरात एक घाणेरडा वास पसरला होता, इतका की श्वास घेणे कठीण झाले होते. वाटलं घरात काहीतरी उंदीर वैगेरे मेला असेल पण सगळा घर आताच तर साफ केला होता, तरीही आम्ही सर्वांनी सगळीकडे पाहिले काहीच नव्हते. अजूनही देवांचे मंदिर आम्ही लावले नव्हते म्हणजे काय आहे माहीत आहे आम्हाला ते मंदिर लावायची इच्छाच होत नव्हती, का कुणास ठाऊक.. संध्याकाळ झाली बाहेर काळोख पडायला सुरुवात झाली आणि आमच्या घरातील वातावरण अधिक पटीने कोंदट झाले. वाटायचं कोणीतरी आमच्या सोबत अजुन त्या घरात आहे पण कोणाला विचारणार कारण आजूबाजूला कोण नव्हते.  राहत होते ते थोडे लांब होते, शिवाय आम्ही नवीन त्यामुळे लगेच कसं विचारायला जाणार ना..!

आई रात्रीचा जेवण बनवत होती तिला अचानक कोणीतरी ओट्याजवल उभ असलेले दिसले आणि ती जोरात किंचाळली, आम्ही जगले आईला विचारतो पण ती इतकी घाबरलेली की तिच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. मग बहिणीने जेवण बनवले तिच्यासोबत मी सुद्धा होतो पण तरीही घरात एकप्रकारची भीती वाटत होती. पुढल्या क्षणी काय होईल हे सांगू शकत नव्हतो. जेवायला बसलो तरी मनात भीती होतीच कसेतरी जेवलो, आणि आम्ही चौघेजण बाहेरच्या गॅलरीत बसलो. आजूबाजूला अनेक जण फिरत होते पण आमच्याही कोणी बोलायला येत नव्हते. आमच्याकडे लांबूनच बघत होते, वाटत होते त्यांना या रूम बद्दल पहिलेच काहीतरी माहीत असेल.

म्हणून मीच चालत चालत एका व्यक्तीजवळ गेलो आणि त्याला आमच्या रूम बद्दल विचारले. पण तो काहीच न बोलता घाबरतच निघून गेला  मी किती वेळा विचारले पण तो काहीच बोलला नाही. काय करू आता तर काहीच सुचत नव्हते, तसाच घरी निघून गेलो आणि घरात पाय ठेवताच पाहतो तर काय सगळे टेन्शन मध्ये बसलेले. मी विचारलं तर म्हणाले आपल्याला हे घर लवकरात लवकर सोडायला लागेल. या घरात एका आत्म्याचा वास आहे आणि तो आपल्याला जगून देणार नाह., मी तरीही विचारले हे आणखी कोणी सांगितले तुम्हाला? त्या खालच्या आजीबाई आताच येऊन गेल्या. म्हणाल्या लवकरात लवकर ही रूम सोडा या घरात एका बाईला तिच्या नवऱ्याने संशय घेऊन तिच्यावर खूप अत्याचार केले आणि शेवटी शेवटी तिला उपाशी ठेऊन बांधून या घरातच ठेवले. रोज तिला पहायचा पण जेवायला मात्र द्यायचा नाही वरून मारायचा, खूप अत्याचार केलं त्या बीचारीवर म्हणे.

तिचा आत्मा या घरात वावरतोय त्या आत्म्याने तिच्या नवऱ्याला ही मारले, आणि आता ती जो कोण या घरात येईल त्याला मात्र जिवंत सोडत नाही, असे ती आज्जी म्हणाली. आता मात्र सगळ्यांनाच भीतीने ग्रासले होते. सगळे एकत्र बसले होते तहान लागली तरी पाणी पिण्यासाठी कोणी एकटा स्वयंपाक घरात जात नव्हते. कारण तिथेच तिला बांधून ठेवले होते, यायला ती संपूर्ण घरात येतच असेल पण हॉल मध्ये एकत्र असल्यामुळे आमच्या मध्ये थोडा धीर होता.

पण आजची रात्र कशीतरी काढायची होती पण तीच रात्र आम्हाला जवळ जवळ खूप मोठी वाटत होती. घड्याळात पाहतो तर ११ वाजले होते आम्ही सोबतच बसलो होतो, आणि स्वयंपाक घरातून रडण्याचा आवाज येऊ लागला हा आवाज हळू हळू इतका वाढला की आमच्या सगळ्यांच्या कानाला ठणका बसू लागला. खूप त्रास होत होता तिच्या रडण्याचा, पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. कदाचित आज आमचीही शेवटची रात्र आहे हे आता आम्हाला समजायला लागले होते.

स्वयंपाक घरातील सर्व भांडी इकडून तितके फेकली जात होती, काही आमच्या अंगावर येऊन पडत होती. बाबांच्या डोक्यावर तर मोठी परात येऊन पडली. त्यांचं डोकं भनभणायला लागले होते. शिवाय जखम होऊन रक्त वाहायला लागले होते, आईला ही खूप ठिकाणी लागले होते. इतक्यात स्वयंपाक घरातून एक आकृती बाहेर येताना दिसली. अतिशय कुरूप अशी ती स्त्री होती. शरीराची हाड राहिली होती, केस मोकले सोडलेले आणि डोळे स्थिर नव्हते, गर गर फिरत होते. तोंडातून लाळ गळत होती. संपूर्ण शरीराची कातडी कुजली होती. ती जसजशी जवळ येत होती आमच्या पोटात गोळा यायला लागला होता. विचित्र आवाज काढत होती ती पण त्या आवाजाने खूप त्रास होत होता. ती आता माझ्या जवळ आली आणि हळू हळू हात माझ्या मानेजवल आणला, पण आश्चर्य हात माझ्या जवळ आला पण माझ्या शरीराला तिचा हात स्पर्श होताच ती लांबवर फेकली गेली. असे जवळ जवळ चार ते पाच वेळा झाले मला कळत नव्हते असे का होत आहे.

तेव्हा ती कर्णकर्कश आवाजात बोलली म्हणाली ते गळ्यातल ताईत काढून टाक नाहीतर ह्या घराला आग लावेन आणि तुम्ही सगळे भस्म व्हाल, आता माझ्या लक्षात आमच्या सगळ्यांचं गळ्यात ताईत होत स्वामी समर्थांचे, आम्ही पहिल्यापासून स्वामी समर्थांचे भक्त त्यांच्यावर आमच्या सगळ्या कुटुंबाचा विश्वास आहे आणि नेहमीच राहणार. आता आम्हाला देवाची आठवण झाली काय करायचे ते कळले. आईने बांधून ठेवलेलं देव काढले त्यातील स्वामी समर्थांची मूर्ती समोर ठेवली आणि आम्ही सर्व हात जोडून स्वामी समर्थाच्या नावाचा जोरजोरात धावा करू लागलो. त्यामुळे संपूर्ण घरात त्या स्त्रीच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. ती खूप अक्राळ विक्राळ होऊ लागली पण तरीही आम्ही आमच्या नामस्मरणाचा जप सोडला नाही, अधिक जोरात आम्ही नामस्मरण करू लागलो. आता आम्ही फक्त नामस्मरण करू शकत होतो बाकी काहीच आमच्या हातात नव्हते.

आम्ही फक्त डोळे मिटून फक्त डोळ्यासमोर स्वामी समर्थांचे अस्तित्व बघत होतो, आमच्या नामस्मरणाने खरंच तिच्यावर परिणाम होत होता तिला याचा त्रास होत होता. ती खूप जोरजोरात ओरडत होती तडफडत होती, पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. काही वेळाने ती अदृश्य झाली घड्याळात पाहिले तर पहाट झाली होती. सहा वाजले होते आम्ही आमचा सगळं बिऱ्हाड गुंडाळला, तोपर्यंत स्वामींचे नाव तोंडातच होते. आम्हाला तिला त्रास द्यायचा नव्हता पण आमचा जीव आम्हाला प्यारा होता, म्हणून आम्ही ते घर सोडायचे ठरवले आणि सात वाजता सगळं समान घराच्या बाहेर आणून जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत बाहेरच बसलो. बाबांनी दुसरी रूम लगेच बघितली आणि आम्ही गाडी आल्यावर तिथून लगेच निघालो, अजूनही आम्हाला ती रात्र आठवली की अंगावर काटा येतो. पण आम्हाला हे ही विसरून चालणार नाही की आमचे स्वामी समर्थ कोणत्याही संकटात आमच्या सोबत कायमचे असणार श्री स्वामी समर्थ.

लेखक : पाटीलजी आवरे उरण, रायगड

ह्या पण Horror कथा वाचा.

Please follow and like us:

Related Articles

1 comment

अनोळखी मित्र » Readkatha December 5, 2021 - 7:13 am

[…] चाळीतले घर […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल