Home हेल्थ चिंच तुम्हाला माहीतच असेल पण त्याच्या चिंचोक्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

चिंच तुम्हाला माहीतच असेल पण त्याच्या चिंचोक्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

by Patiljee
42431 views

चिंच हे आपल्या आहारातील एक फळ आहे रोजच्या जेवणात आपण हीचा वापर करतो किंवा ही चिंच नुसतीच खायला ही खूप जनांना आवडते. आपण लहान होतो शाळेत जाताना दुकानात भाजलेले चिंचोके खायला मिळायचे. एकदा तोंडात टाकले ही चघळत बसायचे असे किती जणांनी केले असे माहीत नाही पण आमच्या नशिबात आलेय. पावसाळ्यात हे भाजलेले चिंचोके खायची काही वेगळीच गंमत असते. आमच्याकडच्या बायका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून हे चिंचुके शेतावर जाताना घेऊन जायच्या म्हणजे शेतातातील काम करताना एक चींचुका सोलून तोंडात टाकायचा आणि चघळत बसायचा.

चिंचेच्या बियांमध्ये आढळून आलेलं लॅक्टिन ग्लाइकेन्स आणि शुगर मॉलीक्यूल्ससोबत एकत्र करण्यात येतं. ज्यामध्ये एन एसिटिलग्लूकोसामीन (एनएजी) असतं. त्यामुळे शरीरातील पेशींमध्ये जीवाणू प्रवेश करत नाहीत. बहुतेक लोक टाईम पास म्हणून हे चींचुके खात असतील पण याचे आपल्याला शरीराला मिळणारे उपयोग बघा कोणते कोणते आहेत.

चिंचेच्या बियांमध्ये बियामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अमीनो सिड असतात. ज्या लोकांना संधिवाताशी समस्या आहे अशा लोकांनी ह्या बियांची पावडर करावी ही पावडर दिवसातून दोन वेळा पाण्या सोबत सेवन करा तुमची सांधेदुखी कमी होईल.

चिंचोक्या मध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांच्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशांनी चिंचोके किंवा त्याची पावडर खावी.

चींचोक्यांमधे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो त्यामुळे न्यूमोनिया जीवाणू, टायफस यांपासून आपले संरक्षण करू शकतो. तसेच आतड्यांसंबंधी आणि मूत्रमार्गाच्या संसर्गास ही रोखते.

तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर या चिंचेच्या बियांची पावडर खा त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर संतुलित राहण्यास मदत होईल.

घसा खवखवणे यावर चिंचेच्या पियांचे पाणी याने गुळण्या केल्यास आराम मिळतो शिवाय

चींचोके या नपुसंक ते वर गुणकारी आहेत या
बियांची पावडर, गूळ, ओवा आणि हे सगळं तूपा मध्ये भाजून घ्या रोज एक चमचा याचे सेवन करा.

चिंचेच्या बियाण्याचे लाल बाह्य आवरण अतिसारावर प्रभावशाली औषध आहे.

त्याच प्रमाणे या बियांमध्ये पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाबाच्या आजारांवर अत्यंत उपयोगी आहे.

चिंचेच्या बियांमध्ये अँटी एजिंग चे गुण असतात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर लवकरच सुरकुत्या पडल्या लागल्या असतील त्यांनी याचा उपयोग करा.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल