Home हेल्थ रोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या

रोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या

by Patiljee
171227 views

तुम्हाला माहीतच आहे हळद हा मासाल्यातील पदार्थ यामुळे भाजीला एक चव आणि रंग ही येतो. त्याचबरोबर याचे अनेक प्रकारचे फायदे ही आहेत त्यासाठी तुम्ही ही हळद रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यातून प्या. याचे फायदे नक्की मिळतील. तुमच्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी सूज असो ती या हळदीच्या पाण्याच्या सेवनाने कमी होते. कारण हळदी मध्ये करक्युमिन नावाचे रसायन असते जे आपली सूज कमी करण्यासाठी मदत करते.

कॅन्सर सारख्या रोगाशी लढण्यास ही हळद खूप मदत करते. या हळदी मध्ये अँटीऑक्साइड भरपूर प्रमाणात असतात. जे कॅन्सर सारख्या रोगाशी लढण्यास उत्तम उपाय आहे.

मधुमेह या आजारावर हळद अत्यंत उपयोगी आहे. मधुमेह या आजारावर तुम्ही रोज हळदीचे पाणी पिल्ल्याने तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते.

शिवाय हृदयाच्या आजारावर ही हे उत्तम आहे. कारण हळदीचे पाणी पिल्याने रक्त गोठण्याची क्रिया बंद होते. त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

रोज हळदीचे पाणी पिण्याने तुमचे लिव्हर एकदम तंदुरुस्त राहते.

तुम्ही रोज बाहेरचे खात असाल त्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडली असेल तर अशा वेळी हळदीचे पाणी उत्तम आहे यामुळे तुमचे पित्त निर्माण होते आणि तुमचे अन्न व्यवस्थित पचले जाते.

ज्या लोकांना रोज सांधेदुखीचा त्रास होत असतो अशा लोकांनी न चुकता रोज हळदीचे पाणी प्या नक्की फायदा होईल.

हळदीमध्ये रक्त शुद्ध करण्याचे घटक असतात त्यामुळे तुमच्या रक्तातील विचारी पदार्थ बाहेर फेकले जातात.

हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. कधी शरीरावर जखम झाल्यास आपण लगेच स्वयंपाक घरातील हळद आणून लावतो. हळदीच्या सेवनाने आपले शरीराचे थंडी, फ्लू सारख्या इंफेक्शनपासून संरक्षण होते. यासोबतच या व्हायरसपासून लढण्यास शरीरास मदत होते. आणि म्हणून हळद ही अनेक आजारांवर गुणकारी औषध आहे.

हळद ही तशी नैसर्गिक असल्यामुळे तिचे सहसा लक्षणीय दुष्परिणाम दिसत नाहीत नाही पण काही लोकांना पोटात अस्वस्थता, मळमळ, चक्कर येणे किंवा अतिसार अनुभवू शकतात. ज्यांनी जास्त प्रमाणात हळद घेतली असेल. त्यामुळे कोणताही पदार्थ सेवन करताना मर्यादा ही असायला हवी.

सवय करून घ्या रात्री झोपताना चेहऱ्यावर तेल लावायची, वाचा कारण

Please follow and like us:

Related Articles

4 comments

शरीराच्या कोणत्याही भागाला हाताला किंवा बोटाला कापल्यास प्रथम उपचार » Readkatha July 14, 2020 - 11:06 am

[…] घ्या. घरात कोणतीच क्रीम नसेल तर हळद एक सर्वोत्तम आणि गुणकारी औषध आहे. हे […]

Reply
कोथिंबीर खाण्याचे फायदे » Readkatha July 19, 2020 - 6:20 pm

[…] तर ह्यावर कोथिंबीरचा रस घेऊन त्यात हळद मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर […]

Reply
आंबेहळदचे हे उपयोग तुम्हाला माहीत नसतील » Readkatha July 22, 2020 - 6:13 am

[…] तर आंबे हळदीला आपल्या नॉर्मल हळदी सारखी बाजारपेठ नाही आहे. त्यामुळे ही […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल