मी काल खूप जास्त चींचा खाल्या आणि थोड्याच वेळात मला खोकला सुरू झाला. तसा अगोदर पासूनच माझा घसा खवखवणे होत होते पण इतकं होईल म्हाईत नव्हतं. मी खोकायला लागले तसे माझा नवरा घाबरला कारण सध्याची परिस्थितीच तशी आहे. थोडा सर्दी आणि खोकला झाला की आपल्या जीवाची घालमेल चालू होते. पण यागोदर मला खोकला आणि सर्दी काही नवीन नव्हती, नेहमी व्हायची पण तेव्हा नॉर्मल आजार म्हणून आपण सोडून द्यायचो. डॉक्टरकडे न जाता गोळ्या आणि औषध घेऊन हे सगळं बर व्हायच.
पण सध्याचा काळ असा आहे की थोडा जरी खोकला आला की समोरचा माणूस आपल्याकडे संशयाने बघतो मग तो नवरा असो किंवा बायको असो. तुमच्याही बाबतीत असेच झाले असे ना? संशय तर येणारच कारण तुम्हाला तर माहीतच आहे पण खरं सांगू जेव्हापासून हा व्हायरस आलाय तेव्हापासून मला जवळ जवळ पंधरा वेळा खोकला झाला असेल आणि तो लगेच एका दिवसात बरा ही झाला आहे. मला समजत नाही माझ्या मनातील भीती आहे की शरीराने ही मान टाकली आहे माझ्या मनातील भितीपुढे.
आपण मध्यमवर्गात कुटुंबात जन्माला आलेलो आहोत त्यामुळे सुख आणि दुःख या दोन्ही घटना आपल्या मनाला खूप लागून जातात. सुख आपण पचवतो पण दुःख पचवायला खूप कठीण जाते. आमच्या घरात इन मीन तीन माणसे मी माझा नवरा आणि एक तीन वर्षाचा मुलगा मला खोकला झाला म्हणून मी त्याच्यापासून थोड लांब पळते पण याची जाणीव त्या लहान जीवाला नाही की आई आपल्यापासून लांब का राहते. पण तरीही लहानच तो सारखा माझ्याकडे यायला बघतो त्याला मी एक दोन वेळा हाताने धक्का ही दिला तो खाली पडला तसा माझा नवरा माझ्यावरच खेकसला म्हणाला कशाला त्याच्यावर ओरडते आहेस त्याला काय कळते.
काही गरज नाही नुसता खोकला तर झाला आहे होईल बरा तू कुठे बाहेर ही जात नाहीस काय नाय होणार तुला. पण माझ्या मनातील भीती मलाच माहीत मला फक्त खोकला होता बाकी काहीच नाही ताप नाही की सर्दी नाही पण तरीही माझ्या मनात त्या व्हायरसची भीती घर करून होती. तसा आमच्या गावात अजुन एकही पेशंट सापडला नाही पण तरीही काय भरवसा याचा.
आज थोड बर वाटत आहे काल खोकला होता पण इतकाही नव्हता की मी सतत खोकत बसायचे कधीतरी उमलस यायची मग नवऱ्याने गावातल्याच मेडिकल मधून जाऊन औषध आणले तो घेतला सतत गरम पाणी प्याले, गरम पाणी आणि मिठाच्या गुळण्या केल्या आणि आता थोड बर वाटत आहे. मला खर खर सांगा कोणकोणत्या या आजाराची भीती वाटत आहे आणि असा खोकला ही तुम्हाला झाला असेल ना कमेंट करून सांगा.
लेखक : पाटीलजी
(आवरे- उरण)
समाप्त
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत. लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही.
1 comment
खोकल्याचीच खूप भीती वाटते कारण करोनमुळे
मराठी माहिती