Home हेल्थ खेकडे, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यांच्यात आहेत हे पौष्टीक घटक पहा

खेकडे, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यांच्यात आहेत हे पौष्टीक घटक पहा

by Patiljee
13509 views
खेकडे

चिंबोरे(Crab) आणि मुठे हे पावसाळ्यात खाण्याची मजाच काही वेगळी असते. चिंबोरे आणि मुठे पकडण्यासाठी रात्री फिरावे लागते. शेतात, गवतात, वहलात नदीत आणि समुद्रात अशा ठिकाणी हे मिळतात. पण गावठी मुठे मात्र शेतात मिळतात. खायला ही तितकेच चवदार लागतात याचा बेसन भरून रस्सा एकदम झकास लागतो.

त्यासाठी नेहमीचाच कांदा, लसूण, मसाला फोडणीला आणि कांदा खोबऱ्याचे वाटण टाका साफ केलेल्या कवट्या मध्ये बेसन भरा. हे बेसन थोडे भाजून घ्या. त्यात एक चमचा तांदळाचं पीठ, कांदा, आणि वाटलेले थोडे वाटण मसाला, मीठ आणि गरम मसाला घेऊन पाणी टाकून मिसळा. या कवट्या मध्ये भरा आणि त्या रश्श्या मध्ये त्यात वरून गरम मसाला टाका आणि भाता सोबत मस्त ताव मारा.

खेकडे खाण्याचे फायदे

त्यांच्यात कॅल्शियम भरपूर प्रमाणत असते. त्याच बरोबर कार्बोहाइड्रेट आणि शुगर अगदी नसल्यासारखे असते.

खेकडे

या खेकड्या मद्ये असणारे फॉस्परस सारखे घटक तुमच्या शरीराला मुख्यतः तुमची हाडे मजबूत करतात शिवाय दात ही मजबूत राहतात.

खेकड्या मध्ये उच्च प्रतीचे क्रोमिन आढळते आणि शिवाय खेकड्या मद्ये कर्बोहेद्रेड ही कमी प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा व्यक्तींसाठी खेकडा खाणे उत्तम आहे.

ज्यांना हृदय रोग आहे अशा लोकांनी खेकडा खाणे उत्तम या खेकड्यामधे असणारे ओमेगा ३ फॅटी असिड असते. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतात त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशांनी नेहमी खेकडे खावे.

कॅन्सर सारख्या रोगावर ही खेकडे खाल्याने गुणकारी आहे. शिवाय याच्या खाण्याने ओमेगा ३ फॅटी असिड आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकण्यास मदत करते. त्यामुळे खेकडे कॅन्सरसाठी लढण्यासाठी पूरक असतात.

खेकडे

तुमच्या शरीरात जर रक्तपेशी यांची कमतरता असेल तर खेकड्यांमधे असणारे बी१२ रक्त वाढण्यासाठी मदत करते.

खेकडे खाल्याने एखाद्या व्यक्तीला संधिवाताचा त्रास होत असेल तर तो हो कमी होतो.

तुम्हाला आवडतात का खेकडे? गावठी मुठे? (Crab) आम्हाला नक्की कळवा. तिसऱ्या म्हणजे शिंपले कधी खाल्ले आहेत का तुम्ही? वाचा त्याचे फायदे

Please follow and like us:

Related Articles

3 comments

शरीराच्या कोणत्याही भागाला हाताला किंवा बोटाला कापल्यास प्रथम उपचार » Readkatha July 14, 2020 - 5:19 pm

[…] हे पण वाचा खेकडा, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यां… […]

Reply
कोळंबी खाणे बहुतेक जणांना आवडते पण तिच्यात कोणते गुणधर्म असतात हे माहीत नसतील » Readkatha July 14, 2020 - 6:04 pm

[…] हे पण वाचा खेकडा, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यां… […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल