Home संग्रह दिवाळीचा पहिलाच दिवस म्हणजे धनत्रयोदशी, जाणून घेऊया आजच्या दिवसाचे महत्त्व

दिवाळीचा पहिलाच दिवस म्हणजे धनत्रयोदशी, जाणून घेऊया आजच्या दिवसाचे महत्त्व

by Patiljee
282 views

आपण सगळेच दिवाळी या सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो! कारण दिवाळी ही सोबत आनंद आणि उत्साह घेऊन येते तर हा दिवाळीचा पहिलाच दिवस म्हणजेच, अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणारा अश्विन कृष्ण त्रयोदशी दिवस म्हणजेच धनत्रयोदशी यालाच धनतेरस असेही म्हणतात..!! आयुर्वेदाच्या देवता धन्वंतरी यांचा जन्म या दिवशी झाला त्यामुळे या दिवशी धन्वंतरी जयंती ही साजरी केली जाते.

धनत्रयोदशी म्हणजे नक्की आहे तरी काय जाणून घेऊया.

याची कथा “अशी की, महर्षी दुर्वास यांनी दिलेल्या शापातून मुक्ती मिळण्यासाठी देव आणि दानव मिळून समुद्र मंथन करतात आणि त्यातून धन्वंतरी या आयुर्वेद देवतेची निर्मिती होते… धन्वंतरी देवता अमृत कुंभ घेऊन बाहेर येते. धन्वंतरी देवतेच्या चारी हातामधे चार वस्तू होत्या म्हणजेच एका हातामधे अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख, आणि चक्र घेऊन ते जन्माला आले.

या चारही गोष्टीचा उपयोग करून धन्वंतरी देवता व्याधी, असाध्य रोग बरे करतो असे मानले जाते..! म्हणूनच धन्वंतरी देवतेची ही या दिवशी पूजा केली जाते. आयुर्वेदामध्ये या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे, वैद्य या दिवसाची मनोभावे पूजा करतात. प्रसाद म्हणून कडुलिंबाच्या पानांचे तुकडे आणि साखर लोकांना वाटतात कारण कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे असे मानण्यात आले आहे.

वैद्दिक युगात निरोगी शरीराला सगळ्यात मोठ धन मानले जायचे आणि ते खर आहे आजही सुदृढ, निरोगी शरीर हीच खरी संपत्ती मानली जाते. या दिवशी दीप आणि सोन्या चांदी समवेत यमाची ही पूजा केली जाते. वर्षातील या एकाच दिवशी यमाची पूजा केली जाते. कारण हेमा नावाचा एक राजा असतो त्याच्या मुलाला अकाली मृत्यूचा शाप मिळालेला असतो. या शापामुळे त्याचा मुलगा हा वयाच्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो..! !

राजा, राणी आपल्या मुलाला मिळालेल्या या शापामुळे खूप दुःखी असतात..! त्यांनी ठरवल जितके दिवस राहिलेत तितके त्याचे दिवस आनंदात कसे घालवायचे याचा विचार करू लागले आणि त्यासाठी त्याच लग्न करण्यात आले जेणेकरून आपल्या मुलाला या जगातील सगळी सुखं मिळावी. लग्न झाल्यावर बरोबर चार दिवसांनी राज्याच्या मुलाचा मृत्यू होणार असतो. आणि म्हणूनच त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याला सतत जागे ठेवण्याचा ती प्रयत्न करते!! त्याच्या अवती भोवती सगळीकडे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, मोहरा, वस्तू असे सगळं काही ठेवले जाते इतकाच काय अख्खा महाल, महालाचे प्रवेशद्वार ही सोन्या चांदीच्या वस्तूंनी व्यापून टाकले जाते.

पूर्ण महाल दिवे लावून लखलखीत करण्यात आला जेणेकरून मृत्यूची देवता आत येऊ नये. आणि नेमके तसेच होते जेव्हा यम एका सापाच्या रूपाने राजाच्या मुलाचे प्राण घेण्यासाठी महालात प्रवेश करतो तेव्हा तेथील सोन्या आणि चांदीच्या वस्तूंनी आणि दिव्याच्या प्रकाशने त्याचे डोळे दिपून जातात. त्याला समोरचे काहीच दिसत नाही आणि त्यामुळे यम आल्या पावली परत निघून जातो. आणि राजकुमाराचे प्राण वाचतात. आणि म्हणूनच या दिवशी यम दीप दान केले जाते त्यामुळे आपल्या वरील आलेले संकट टळते असे मानले जाते.

हिंदू धर्मात ही सुख समृद्धी, ऐश्वर्य वर्षानुवर्ष घरात नांदत राहावी यासाठी या दिवशी लोक घरातील धन, पैसा, सोन, चांदी यांची लक्ष्मीच्या रूपात पूजा केली जाते!! संध्याकाळी दिव्याची पूजा करून संपूर्ण घर, घराच्या बाहेरील बाजूला दिव्यांची सजावट केली जाते. घराबाहेरील अंगणात रांगोळी काढली जाते. लक्ष्मी देवीची पूजा करून गोडाचा प्रसाद वाटला जातो.

शेतकरी त्याच्या अवजारांची पूजा करतात तर कारागीर ही त्यांच्या रोजच्या हत्यारांची पूजा करतात, व्यापारी ही दुकानाची तिजोरीची पूजा करतात. धने आणि गूळ याचा नैवेद्य या दिवशी केला जातो. या दिवशी सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते हा दिवस सोन, चांदी म्हणजेच धातूच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अत्यंत पवित्र मानले जाते.

©All Rights Reserved Readkatha

Please follow and like us:

Related Articles

1 comment

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल