Home संग्रह घोरपड ने शेपटी का मारते माहीत आहे का तुम्हाला

घोरपड ने शेपटी का मारते माहीत आहे का तुम्हाला

by Patiljee
995 views

घोरपड हा सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. ही पाल, सारडा , यांच्या वर्गातील प्राणी आहे तर घोरपड ही सापा प्रमाणे आपली कातडी सोडत असते. हिला मराठीमधे घोरपड तर इंग्लिश मध्ये मॉनिटर असे म्हणतात तर व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते. घोरपड ही अंगाने तशी जाडसर कातडीची असते या प्राण्याला उष्ण आणि ओलसर हवा मानवते त्यामुळे हा प्राणी नदी नाल्यांच्या आवारामध्ये राहतो. तसेच तिचे वजन हे जास्तीत जास्त 100 किलोपर्यंत तर उंची ही पाच फुटापर्यंत वाढू शकते.

Source Google

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही या घोरपडी चा उपयोग झाला आहे. कातळाला किंवा जमिनीला घट्ट चिकटून राहण्याचा गुण घोरपडीत असतो. घोरपड तिच्‍या नखांनी खडकाळ कठिण भागास घट्ट धरून राहू शकते. म्हणून पूर्वीच्‍या काळी किल्ल्यांवर, अथवा उंच भूस्‍तरांवर चढताना घोरपडीच्‍या कमरेस दोर बांधून तिचा चढाईसाठी उपयोग करून घेत होते. हिच्या पायाच्या नख्यांमुळे ही कुठेल्याही भिंतीवर दगड आणि डोंगरावर सहज रित्या चढू शकते आणि याचा उपयोग त्या काळी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना झाला होता. तान्हाजी ज्यांनी सुद्धा हिचे नाव यशवंती असे ठेवले होते त्याचप्रमाणे ते हिच्या मदतीने सिंहगड चढले होते.

घोरपड़ीपासून एक प्रकारचे तेल बनवण्यात येते. हे तेल सांधेदुखी वर लावल्यास सांधेदुखी पूर्णपणे बरी होते असा समज आहे. घोरपडीचे तेल वातविकारांवर उपयोगी पडते अशा गैरसमजुतीतून घोरपडीला मारले जाते. पण हे चुकीचे आहे. आता घोरपड शेपटी का मारते हे तुम्हाला माहीत आहे का तर तिला कोणी डिवचले किंवा तिच्यावर हल्ला होणार आहे असे तिला वाटल्यास ती मागचे दोन्ही पाय वर करुन आपली शेपटी आपल्या शत्रूवर मारत असते का मारते तर आपले समोरच्या शत्रुंपासून रक्षण करण्याकरिता. पण आपल्या समाजात जुन्या आणि कालबाह्य झालेल्या काही गोष्टी आहेत त्यामुळे असे म्हणतात की घोरपड ने शेपटी मारल्यास ती व्यक्ती कधीही बाप होऊ शकत नाही अशी समज आहे पण हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि ही अफवा ही खोटी आहे.

घोरपडीला मारणे हे कायद्याने गुन्हा आहे तसे दिसून आल्यास तुम्हाला तीन वर्ष कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल